पोटाचे विकार

ॲसिडीटी होऊ नये यासाठी उपाय काय?

2 उत्तरे
2 answers

ॲसिडीटी होऊ नये यासाठी उपाय काय?

3

ॲसिडीटीला आवरा

पित्ताचा म्हणजेच ॲसिडीटीचा त्रास अनेकांना होतो. सध्या तर उन्हात वणवण केल्याने, पुरेसं पाणी न प्यायल्यानेे‌ पित्त अधिकच खवळून उठतं. पण या अॅसिडीटीला तुमची सवय बनवू नका. तिला वेळीच आवर घाला.

पित्ताचा म्हणजेच ॲसिडीटीचा त्रास अनेकांना होतो. सध्या तर उन्हात वणवण केल्याने, पुरेसं पाणी न प्यायल्यानेे‌ पित्त अधिकच खवळून उठतं. पण या ॲसिडीटीला तुमची सवय बनवू नका. तिला वेळीच आवर घाला.

आपण किती आरोग्यदक्ष आहोत हे डॉक्टरांना सांगताना अनेक जण मोठ्या अभिमानाने सांगतात, ‘पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून मी रोज सकाळी दात घासून झाल्यावर, घशात बोटं घालून उलटी काढतो आणि पित्त पाडतो.’ रोजच्या रोज सकाळी उलटी काढून पित्त पाडल्यानं आपल्याला आम्लपित्ताचा म्हणजे अॅसिडिटीचा त्रास होणार नाही, हा अनेकांचा पक्का गैरसमज असतो. आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद या दोन्हीनुसार ही पद्धत चुकीची आहे.
आम्लपित्त
आम्लपित्त किंवा हायपर ॲसिडीटी होऊन छातीत जळजळणं हा सध्याच्या धावपळीच्या जीवनात जवळजवळ प्रत्येकाला छळणारा विकार असतो. इंग्रजीमध्ये संक्षेपानं म्हणायचे झालं तर, ‘हरी, करी आणि वरी’ ही याची कारणं असतात. ‘हरी’ म्हणजे अनियमितता, सतत पळापळ, अपुरी विश्रांती व जागरणांनी भरलेली दिनचर्या; ‘करी’ म्हणजे चमचमीत मसालेदार पदार्थ, हॉटेलमधील खाणं, धूम्रपान, मद्यपान, अतिप्रमाणात चहा-कॉफी घेणं आणि ‘वरी’ म्हणजे चिंता, काळजी, ताणतणाव, असमाधान.

आपल्या जठरात शरीरातील अन्नपचनासाठी जे पाचक रस स्रवतात, त्यातला एक घटक म्हणजे आम्ल. जठर नेहमी पचनाच्या प्रक्रियेस आवश्यक तितकं आणि तेवढंच आम्ल स्रावत असतं. पचन क्रियेत अन्नाचं विभाजन करण्यास हे आम्ल मदत करत असतं. या हरी, करी आणि वरीमुळे हे आम्ल जास्त प्रमाणात स्रवते. काही कारणांमुळे जठराच्या पुढे असलेल्या लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागातून स्रवणारा पित्त रस त्यामध्ये मिसळला जातो. या असंतुलनामुळे साहजिकच ते आम्ल जठराच्या वर असलेल्या अन्ननलिकेकडे उसळ्या मारू लागतं. यालाच ‘हायपर अॅसिडिटी’ म्हणतात. असा प्रकार वरचेवर होत असल्यास त्याला वैद्यकीय भाषेत गॅस्ट्रो-इसोफेजिअल-रिफ्लक्स-डिसिज असं म्हणतात.

पित्त पाडण्यामुळे होणारे विकार
रोज उलटी काढून हे आम्लपित्त बाहेर काढलं, तर आम्लपित्ताचा विकार मुळीच कमी होत नाही. जठरातून उलट्या मार्गानं वर येणाऱ्या तीव्र आम्लामुळे, अन्ननलिकेच्या आतल्या अस्तराला सूज येते.
उलटी काढण्याचा प्रकार खूप काळ केला, तर ही सूज वाढत जाऊन अन्ननलिकेच्या अस्तरामध्ये लक्षणीय बदल होऊन, ‘बॅरेट्स इसोफेगस’ हा आजार होतो. अशा व्यक्तीला अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते.
पित्त तोंडातून पाडण्याच्या सवयीमुळे हे आम्ल दातांच्या बाह्य आवरणावर म्हणजे इनॅमलवर दुष्परिणाम करतं. अशा व्यक्तींचे दात कमकुवत होऊन ते लवकर पडू शकतात.
स्वरयंत्रावर दूरगामी परिणाम होऊन आवाज घोगरा होऊ शकतो. श्वासाला दुर्गंध येतो.
उलटी करताना जोर लावताना, चेहऱ्यावरील त्वचा आणि डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांतील रक्तदाब वाढतो. त्याचा परिणाम होऊन डोळ्यात आणि त्वचेवर छोटे रक्तस्त्राव होतात.
नेहमी उलटी काढण्याच्या सवयीनं शरीरातील क्षारांचं प्रमाण बिघडू शकतं.
आयुर्वेद चिकित्सेबाबत अज्ञान
पित्ताची उलटी काढण्याच्या या गैरसमजामागे, सर्वसामान्य लोकांचा आयुर्वेदातील पंचकर्मांपैकी ‘वमन क्रिये’ बाबतचा गैरसमजदेखील कारणीभूत आहे. मुळात वमनक्रिया ही कफदोषाकरता केली जाते. वमन म्हणजे उलटी करणं हे खरं असलं, तरी फक्त पित्त पाडणं म्हणजे वमन नव्हे. वमन चिकित्सेत आधी स्नेहन (भरपूर तूप पाजणे आणि तेलानं मालिश करणे) आणि स्वेदन (औषधी वाफारे देणं) ही क्रिया केली जाते. त्यानंतर एक विश्रांतीदिन घेऊन, तिसऱ्या दिवशी रुग्णाला सकाळी उलटीचं औषध देऊन आमाशयात संचित झालेले दोष उलटीवाटे बाहेर काढले जातात. हे झाल्यावर संसर्जनकर्म केल्यावर ते पूर्ण होतं. ही प्राधान्यानं कफदोषाची आणि नाभीच्या वरील शरीराच्या भागातील व्याधीची चिकित्सा आहे.
पित्तदोष दूर करण्यासाठी पंचकर्मातील विरेचन चिकित्सा वापरली जाते. यात स्नेहन-स्वेदन पूर्ण झाल्यावर दोन विश्रांतीदिन देऊन, चौथ्या दिवशी रुग्णाला जुलाबाचं औषध दिले जातं व ग्रहणी (लहान आतड्याच्या सुरुवातीचा भाग) या स्थानात संचित झालेले पित्तप्रधान दोष गुदमार्गानं बाहेर काढले जातात.
आम्लपित्त टाळण्यासाठी
शरीरातील आम्लता वाढवणाऱ्या गोष्टी उदा. तिखट, मसालेदार पदार्थ, मिरची, डाळीचे पदार्थ, पचायला जड अन्न, मांसाहार टाळावे.
दर तीन ते चार तासांनी थोडं थोडं खावं. उपास टाळावेत. खूप काळ पोट रिकामं ठेवू नये.
धूम्रपान, तंबाखूसेवन, मद्यपान, अतिरिक्त चहा-कॉफी घेणं, सोडावॉटर, कोलड्रिंक्स व इतर सोडायुक्त शीतपेयं टाळावीत.
ठराविक तासांची, पुरेशी आणि नियमित झोप हवी. जागरणं वर्ज्य करावीत.
मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी एकाग्रता, ध्यान यांसारख्या गोष्टी जरूर कराव्या.
जाहिरातीतील अंगदुखीची, डोकेदुखीची पेनकिलर औषधं, स्टिरॉइड्स टाळावीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंच अशी औषधं घ्यावीत.
‘हायपर अॅसिडीटी’ झाल्यास
थंड पाणी, गार दूध, लस्सी, खायचा सोडा टाकून घेतलेलं सरबत, इनो, व्हॅनिला आईस्क्रीम अशा गोष्टी प्राथमिक स्वरूपात क्वचित घ्यायला हरकत नाही.
सतत वरचेवर असा त्रास होत असल्यास माहिती असलेली औषधं स्वतःहून घेण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
'
एलिसीडीटी ही हल्लीची सामान्य गोष्ट आहे. आनंदाची बातमी, अपरिहार्यता, जंक फूड, चाहा आणि कॉफी व्हीडन किंवा मसालेदार खाणे यांसारख्या गोष्टींचा आनंद होतो. हे हिसारी करणे आवश्यक नाही. पण सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. अप्सीडीटीमुळं होणारी दुरदुखी, जळजळ, उलट्या, अपचन यांसारखी सुरक्षा करायची नाही

हल्ली परिवर्तन आणि धावपळी जीवनशैलीचा जन्म पित्ताचा स्पर्श जाणतो. पूर्ण न होणे, तणावग्रस्त जीवनशैली, तसेच मोठ्या प्रमाणावर फास्ट फूड खाल्ले पित्तदोष निर्माण होतो. शालेय विद्यार्थी जळजळ, उलट्या, अपचनाचा अनुभव. पण तुम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाही. आजच्या पित्ताचा त्रास होत असेल तर त्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु.

व्हॅनिला आयस्क्रीम - इस्क्रीम मध्ये असणारे घटक एसिडीटी कमी योग्य असतात. त्यामध्ये असमाधानकारक दुधाचा किंवा दुधाचा पावडरचा अंश एसिडीटी कमी योग्य आहे. तुमचा पित्त कधी समजेल हे व्हॅनिला आयस्क्रीम खाणे फायद्याचे ठरवते

तुळस आणि तुळशीचे बी - तुळशीमध्ये अँटी अल्सर घटक असतात. तुमची पोटनिवडणूक कमी होण्यास तुमचा उत्तम उपाय आहे. तुळशीची कडून खाल्ल्याची एसिडीटी कमी होण्यास मदत होते. या हल्ली बाजारात तुळशीचे बी सहज उपलब्ध होते. त्याचा उपयोग एसिडीटी कमी होण्यास होतो. तुळसांचा सामना करण्याचा प्रयत्न केला जातो. तुझे पित्ताचा अनुभव असेल तर ४-५ तुळशीची खावीत किंवा ग्लासभर पावन भिजवले तुझे पाणी प्यावे.

केळी - केळी कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. या घटकांमधील पोटशूळांवर प्रक्रिया कमी होण्यास मदत होते. त्यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता आहे. केलिला लाभदायक पचनक्रिया सुलभ होण्यास उपयुक्त असते. किलिअरी पित्तचालाचा कमी होतो.

दूध - दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम स्थानिक. पित्ताचा त्रास होत असेल. मोठ्या प्रमाणात जळजळ कमी होण्यास मदत होते. शुक्रवारी गार दूध प्रकरण पित्ताची तक्रार कमी होती.

बडिशेप - बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. अँटी अल्सर घटक नेहमी पचनक्रिया सुधारतात. बद्धकोष्ठतेवरही बडिशेप खाणे हा उत्तम उपाय आहे. त्यांच्या पित्ताची गरज असेल त्या व्यक्तींना


उत्तर लिहिले · 1/9/2021
कर्म · 121725
2
आम्लपित्त किंवा हायपर ॲसिडीटी होऊन छातीत जळजळणं हा सध्याच्या धावपळीच्या जीवनात जवळजवळ प्रत्येकाला छळणारा विकार असतो.

 इंग्रजीमध्ये संक्षेपानं म्हणायचे झालं तर, ‘हरी, करी आणि वरी’ ही याची कारणं असतात.
 ‘हरी’ म्हणजे अनियमितता, सतत पळापळ, अपुरी विश्रांती व जागरणांनी भरलेली दिनचर्या; ‘करी’ म्हणजे चमचमीत मसालेदार पदार्थ, हॉटेलमधील खाणं, धूम्रपान, मद्यपान, अतिप्रमाणात चहा-कॉफी घेणं आणि ‘वरी’ म्हणजे चिंता, काळजी, ताणतणाव, असमाधान.
ॲसिडीटी होऊ नये या साठी वरिल गोष्टी टाळल्या पाहिजेत. 


आम्लपित्त टाळण्यासाठी खालील गोष्टी उपाय करावेत :

1. शरीरातील आम्लता वाढवणाऱ्या गोष्टी उदा. तिखट, मसालेदार पदार्थ, मिरची, डाळीचे पदार्थ, पचायला जड अन्न, मांसाहार टाळावे.

2.दर तीन ते चार तासांनी थोडं थोडं खावं. उपास टाळावेत. खूप काळ पोट रिकामं ठेवू नये.
धूम्रपान, तंबाखूसेवन, मद्यपान, अतिरिक्त चहा-कॉफी घेणं, सोडावॉटर, कोलड्रिंक्स व इतर सोडायुक्त शीतपेयं टाळावीत.

3. ठराविक तासांची, पुरेशी आणि नियमित झोप हवी. जागरणं वर्ज्य करावीत.

4. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी एकाग्रता, ध्यान यांसारख्या गोष्टी जरूर कराव्या.

5. जाहिरातीतील अंगदुखीची, डोकेदुखीची पेनकिलर औषधं, स्टिरॉइड्स टाळावीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंच अशी औषधं घ्यावीत.


‘हायपर ॲसिडीटी’ झाल्यास
थंड पाणी, गार दूध, लस्सी, खायचा सोडा टाकून घेतलेलं सरबत, इनो, व्हॅनिला आईस्क्रीम अशा गोष्टी प्राथमिक स्वरूपात क्वचित घ्यायला हरकत नाही.
सतत वरचेवर असा त्रास होत असल्यास माहिती असलेली औषधं स्वतःहून घेण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 1/9/2021
कर्म · 25790

Related Questions

पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
पोट फुगीवर उपाय काय आहे?
पोटातील गॅस मुळे चक्कर येतात का?
मुतखड्यामुळे आपली किडनी खराब होऊ शकते का?
पित्त खूप होत असेल तर दररोज पाणी पिऊन उलटी काढणे बरोबर आहे का ?
रात्री अपचन होऊन सकाळी उल्टी(omate) झाल्यास काय करावे?
मी थोडंस जरी मसालेदार खाल्लं की खूप ऍसिडिटी होते काय करावं ?