1 उत्तर
1
answers
झाडाने प्राण वायू मिळतो का?
1
Answer link
जगात विविध मार्गानी प्रदूषण वाढतंय व या विविध मार्गानी पसरणा-या वेगवेगळ्या प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी अनेक संस्था व लोक हजारो उपाय करतायत. आज हिमालय पर्वताची शिखरं, जिथं प्राणवायू कमी प्रमाणात आढळतो व हवा विरळ असते, चक्क तिथेही मानवाने आपल्या प्रदूषणाचा संसर्ग करून ठेवलेला आहे. असं हे प्रदूषण टाळण्यासाठी, वातावरणातला कार्बन शोषूनप्रदूषणाचा संसर्ग करून ठेवलेला आहे. असं हे प्रदूषण टाळण्यासाठी, वातावरणातला कार्बन शोषून घेण्यासाठी झाडं आपल्याला बहुमोल मदत करतात. परंतु गेली काही र्वष वृक्षतोडीचं प्रमाण जगभरात वाढलंय, जसं ते आपल्याही देशात बरंच आहे. त्याचाच परिणाम म्हणून हवेतकार्बन डाय ऑक्साईड अधिक साठून राहतोय, अधिक रेंगाळतोय.
शहरी भागात तर याचं प्रमाण खूपच जास्त आहे. महामार्गावर व शहराच्या आतील रस्त्यांवर देखील तुम्ही दुतर्फा हिरवी झाडं लावलेली पाहिली असतील. ती वाहनांमधून सोडला जाणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेण्यासाठीच असतात. जेणेकरून रस्त्यांवरील प्रदूषणाचा टक्का कमी व्हावा. याचा काही अंशी उपयोग होतो देखील, मात्र पृथ्वीतलावरील सर्व झाडं मिळून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण घटवण्यात कमी पडतपृथ्वीवर जी जैविक साखळी अस्तित्वात आहे तिचे प्रमुख घटक व तेवढंच प्रमुख कारण आहेत ते वृक्ष. त्यासाठीच नुकतीच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व वृक्षांची गणना करण्यात आली. येल स्कूल ऑफ फॉरेस्ट्री अँड एनव्हॉयर्नमेंटल स्टडीजमध्ये पोस्टडॉक्टरेट करणारे थॉमस क्रोदर यांनी व त्यांच्या संशोधक सहका-यांनी ही वृक्षगणना केली. या वृक्षगणना संशोधनात येल युनिव्हर्सटिीशी संबंधित असणा-या १५ देशातील १४ संशोधकांचाही समावेश होता. त्यासाठी ५० देशांमध्ये ४२९, ७७५ प्रकारे गणना करण्यात आली. तसंच अनेक संशोधन संस्थांची देखील मदत घेण्यात आली.
ज्यामध्ये स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, नॅशनल फॉरेस्ट इनव्हेंटरी यांचा समावेश होता, शिवाय अनेक पूर्वीच्या संशोधनांमधील संदर्भाचीही मदत घेण्यात आली. अशाप्रकारे जमवलेल्या गणनेची वआधीच्या अस्तित्वात असलेल्या झाडांच्या संख्येचा पडताळा करून नेमकी संख्या ठरवण्यात आली. अर्थात ही संख्या अगदी अचूक आहे असं म्हणता येणार नाही तरीही विश्वासार्ह आहे.
जिथे मनुष्य पोहोचू शकत नाही अशा ठिकाणची वृक्षराजीची घनता लक्षात घेण्यात आली. यात क्रोदर आणि त्यांच्या सहका-यांनी चार लाखांहून अधिक वृक्षराजी असणा-या विभागांचा अभ्यास केला. तिथे ही गणना केली. या गणनेत अगदी रोपटी असलेली किंवा छोटी झाडं मोजली गेली नाहीयेत. तर फक्त मोठी झाडंच मोजदादीत धरण्यात आली आहेत.
क्रोदर यांनी मिळवलेली डेटा हा इको सिस्टम, तापमान बदल, जंगलांचं पुनरुज्जीवन, कार्बन सायकिलग, वनस्पती व प्राणी यांच्यावरील अभ्यास इ. अनेक शास्त्रीय धोरणांना व संशोधकांना दिशादाखवण्यात उपयोगी पडणार आहे. तसंच जगात कुठे कुठे झाडांची अधिक गरज आहे व ती किती प्रमाणात आहे हे देखील यातून स्पष्ट होणार आहे. एक झाड वातावरणातला किती कार्बन थोपवू शकेल हा अंदाज येईल. या अभ्यासात लाकडाची घनता मोजलेली नाही तर केवळ वृक्षराजीची घनता मोजण्यात आली आहे.
पृथ्वीवरील सर्व झाडांची संख्या पाहता एका झाडाकडून शोषलं जाणारं कार्बनचं प्रमाण हे फारच लहान आहे हे या अभ्यासातून लक्षात आलं. तरी देखील कार्बनच्या स्थिरीकरणात वृक्षांचा मोलाचा वाटा हा दुर्लक्ष करून चालणार नाही. हा अहवाल 'नेचर' या जैवविज्ञानविषयक मासिकात प्रसिद्ध झाला आहे. उत्तर अमेरिका, स्कँडीनव्हिया व रशियामध्ये पसरलेल्या सब आर्क्टिक प्रांतातील बोरिअल प्रकारातील जंगलांची घनता ही सर्वात अधिक आढळली आहे.इथल्या झाडांची घनता ७४ टक्केइतकी आहे. त्याखालोखाल ट्रॉपिक्स प्रदेशांमध्ये ४३ टक्केइतक्या घनतेची जंगलं आढळली आहेत. वास्तविक शास्त्रज्ञांनी झाडांच्या संख्येबाबत पूर्वी केलेल्या अंदाजापेक्षा या नव्या गणनेत आलेली वृक्षांची संख्या ही खूपच जास्त आहे. ही संख्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा अंदाजे साडेसात पटीने जास्त आहे. मात्र यातील काळजीची गोष्ट अशी की मानव उत्क्रांतीच्या आधी पृथ्वीवर झाडांची जी संख्या होती ती आता मानवी युगात ४६ टक्क्यांनी घसरली आहे.
या वृक्षगणनेला कारण ठरली ती 'प्लँट फॉर प्लॅनेट' ही जागतिक स्तरावर काम करणारी तरुणांची एक संस्था. ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'बिलिअन ट्री' मोहिमेवर काम करत आहे. या तरुणांना त्यांच्या वृक्ष लागवडीचं ध्येय निश्चित करायचं होतं. त्यासाठी त्यांनी दोनवर्षापूर्वी क्रोदर यांच्याकडे मदत मागितली व प्रादेशिक तसंच जागतिक स्तरावर झाडांची संख्या नेमकी किती असेल याबाबत विचारणा केली. त्यांच्या या चौकशीने क्रोदर यांना ही जागतिक वृक्षगणना करण्यासाठी प्रवृत्त केले.
त्यावेळी जगातील सर्वच तज्ज्ञांचा असा अंदाज होता की जगभरात सुमारे ४०० कोटी झाडं असावीत, म्हणजे एका माणसापाठी सुमारे ६१ झाडं. उपग्रहांमार्फत मिळवलेल्या इमेजेस व प्रत्येक देशामधली जंगलांची घनता यावर आधारित पूर्वीची संख्या तज्ज्ञांनी मांडली होती. मात्र थॉमस क्रोदर व त्यांच्या सहका-यांनी अनेक गणना पद्धतींनी ही नवी वृक्षगणना नुकतीच पूर्ण केली व सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या गणनेत पृथ्वीतलावरील मोठया वाढलेल्या झाडांची संख्या ही जवळपास ३ अब्ज असल्याचं आढळलं.