तंबाखू
चुना तंबाखूमध्ये घालून का खाल्ला जातो?
1 उत्तर
1
answers
चुना तंबाखूमध्ये घालून का खाल्ला जातो?
3
Answer link
लोक मुळात तंबाखू का खातात?
प्रत्येकाला काही ना काही करण्यासाठी उत्तेजक आवश्यक असते याने कामे लवकर होतात. जसे काही लोकांना कॅफिनेटेड कॉफी( कॅफिन) किंवा चहा (टॅनिन) आवडतो.
जसे रासायनिक क्रियेचा वेग वाढविण्यासाठी उत्प्रेरक आवश्यक असते, तसे तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला निकोटिन हे उत्प्रेरक आवश्यक असते.
तसं तंबाखूमध्ये निकोटीन असते, ते एक सौम्य उत्तेजक आहे जे बर्याच लोकांना आवडते. तंबाखू चघळणे हे धूम्रपान करण्यापेक्षा बरे आहे आरोग्या संबंधीजोखीम कमी असते.
आता तुमचा प्रश्न चुना तंबाखू मध्ये घालून का खाल्ला जातो?
लोक चुना (कॅल्शियम हायद्राओक्साईड) तंबाखूमध्ये मिसळतात आणि ओठ आणि दात यांच्या दरम्यान ठेवतात. मी ऐकले की चुना ओठांच्या त्वचेला एक्सफोलीएट्स / मऊ करते आणि थेट रक्तवाहिन्यांमध्ये तंबाखूचे पदार्थ शोषण्यास सोपी करते. रक्तवाहिन्यांमध्ये थेट तंबाखूच्या पदार्थांचे शोषण करणे सुलभ करते.
आता तर रेडी मिक्स काँक्रिट सारखी रेडी मिक्स तंबाखू (उदा. मीराज, चैनी खैनी इत्यादी) येतायेत त्यात चुना मिसळायची गरज नाही.
. तंबाखू वेळापत्रक

.
तळटीप :- तंबाखू चघळणे शरीरासाठी धोकादायक आहे. तंबाखू खाल्याने मुखाचा कर्करोग होऊ शकतो.