पर्वत हिमालय

हिमालय पर्वत रांगा कोणत्या सांगा ?

1 उत्तर
1 answers

हिमालय पर्वत रांगा कोणत्या सांगा ?

1


हिमालय पर्वताच्या रांगा
प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे करतात. १) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश २) उत्तर भारतीय मदानी प्रदेश ३) भारतीय व्दिपकल्पीय पठारी प्रदेश ४) भारतीय किनारी मदानी प्रदेश



प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे करतात. १) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश २) उत्तर भारतीय मदानी प्रदेश ३) भारतीय व्दिपकल्पीय पठारी प्रदेश ४) भारतीय किनारी मदानी प्रदेश ५) भारतीय बेटे.
उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश : हिमालय, भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. सिंधू नदी व ब्रह्मपुत्रा नदीच्या घळ्यांदरम्यान हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा असून त्यांना बहिरवर्क आकार प्राप्त झाला आहे.
हिमालय पर्वताच्या रांगा : १) ट्रान्स हिमालय : ब्रहद् हिमालयाच्या उत्तरेस ट्रान्स हिमालयाच्या रांगा आहेत. ट्रान्स हिमालयाचा विस्तार
पश्चिम – पूर्व दिशेने असून त्याची सरासरी लांबी १००० किमी इतकी आहे. ट्रान्स हिमालयात खालील रांगांचा समावेश होतो. अ) काराकोरम रांगा, ब) लडाख रांगा, क) कैलास रांगा.
अ) काराकोरम रांगा : भारतातील सर्वात उत्तरेला असलेल्या या रांगांमुळे भारताची अफगाणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण होते.
काराकोरमचा विस्तार पामीरपासून पूर्वेकडे गीलगिट नदीच्या पूर्वेला ८०० किमी. पर्यंत आहे. जगातील सर्वात उंचीचे २ नंबरचे आणि भारतीय सरहद्दीमधील सर्वात उंच शिखर के – २ ( गॉडविन ऑस्टीन) याच रांगेमध्ये आहे. जगातील काही मोठय़ा हिमनदीची निवासस्थाने या रांगेत आहेत. उदा. सियाचीन, बाल्टेरो, बायाफो, हिस्पर. काराकोरम रांगेत अतिशय उंच अशी शिखरे आहेत. काही शिखरांची उंची ८००० मी. पेक्षा जास्त आहे.
लडाख रांग : सिंधू नदी आणि तिची उपनदी श्योक यांच्यादरम्यान लडाख रांग आहे. लडाख रांगेची लांबी ३०० किमी आणि सरासरी उंची ५८०० मी. आहे.
कैलास रांग : लडाख रांगेची शाखा पश्चिम तिबेटमध्ये कैलास रांग या नावाने परिचित आहे. सर्वात उंच शिखर कैलास आहे.
बृहद् हिमालय (Greater Himalaya) : वैशिष्टय़े : १) लेसर हिमालयाच्या उत्तरेकडे भिंतीसारखे पसरलेले बृहद् हिमालयाची रांग आहे. बृहद् हिमालय हा मुख्य मध्यवर्ती प्रणोदामुळे (MCT-Maincentral Thrus) लेसर हिमालयापासून वेगळा झाला आहे. बृहद् हिमालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या रांगेत जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. यातील बरीचशी शिखरे ही ८००० मी. पेक्षा जास्त आहे. या रांगेमध्ये जगातील सर्वात उंच शिखर मांऊट एव्हरेस्ट आहे. या रांगेतील अन्य शिखरे उतरत्या क्रमाने १) एव्हरेस्ट, २) कांचनगंगा, ३) मकालू, ४) धवलगिरी, ५) अन्नपूर्णा, ६) नंदा देवी, ७) कामेत, ८) नामच्या बरवा, ९) गुरला मंधता, १०) बद्रीनाथ
लेसर हिमालय/मध्य हिमालय ((Lesser or Middle Himalaya) : मध्य हिमालयालाच हिमाचल, हिमालया असे देखील संबोधले जाते. दक्षिणेकडील शिवालीक रांगा व उत्तरेकडील बृहद् हिमालय या दोघांना समांतर असा, लेसर हिमालय पसरलेला आहे. लेसर हिमालयाची रचना ही गुंतागुंतीची असून, या पर्वताची सरासरी उंची ३५०० ते ५००० मी. यांदरम्यान आहे. लेसर हिमालयात पुढील रांगांचा समावेश होतो.
१) पीरपंजाल, २) धौलाधर, ३) मसुरी व नागतिब्बा, ४) महाभारत
१) पीरपंजाल : काश्मीरमधील ही सर्वात लांब रांग असून हिचा विस्तार
झेलमपासून उध्र्व बियास नदीपर्यंत सुमारे ४०० किमीपर्यंतचा आहे. रावी नदीच्या आग्नेयकडे ही रांग पुढे धौलाधर म्हणून ओळखली जाते.
२) धौलाधर रांग : पीरपंजाल रांग पूर्वेकडे धौलाधर या नावाने प्रसिध्द आहे. ही रांग पुढे धर्मशाळा व सिमलामधून जाते.
३) मसुरी, नागतिब्बा रांग : लेसर हिमालयाच्या पूर्वेकडे जाताना फक्त काही रांगाच स्पष्टपणे ओळखल्या जातात. यांपकी मसुरी आणि नाग तिब्बा या रांगा आहेत.
४) महाभारत रांग : मसुरी रांग पुढे नेपाळमध्ये महाभारत रांग म्हणून ओळखली जाते.
महत्त्वाच्या खिंडी : पीरपंजाल, बिदिल खिंड, गोलाबघर खिंड, बनीहल खिंड
महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे : लेसर हिमालयात सिमला (हिमाचल प्रदेश), मसुरी, राणीखेत, ननिताल, अल्मोडा ( उत्तराखंड), दार्जिलिंग
( पं.बंगाल).
महत्त्वाच्या दऱ्या :
१) काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिध्द काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रूंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.
२) कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचलेली आहे.
३) कुलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.
४) काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.
शिवालीक रांगा / बाहय़ हिमालय (Outer Himalaya) : हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग ही शिवालीक रांग आहे. या रांगेलाच बाहय़ हिमालय असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालीक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली. यालाच डून ((Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उदमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर).

  
उत्तर लिहिले · 11/12/2021
कर्म · 121725

Related Questions

हिमालयातील वनांचे प्रकार किती व कोणते आहेत?
हिमालय पर्वताची उंची?
हिमालयात शंबला ठिकाण कुठे आहेत?
ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडील आहे?
हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती आहे ?
हिमालय कोणता पर्वत आहे?
हिमालयात राहणारे लोक भुकंपाला आधिक संवेदनशील असतात?