दुकान
एकछती दुकान म्हणजे काय?
1 उत्तर
1
answers
एकछती दुकान म्हणजे काय?
2
Answer link
जेव्हा एकाच छपराखाली व व्यवस्थापनाखाली दुकानाचे अनेक विभाग पाडून प्रत्येक विभागातून विशिष्ट वस्तूंची विक्री केली जाते तेव्हा अशा दुकानाला एकछत्री दुकाने किंवा ⇨ विभागीय भांडारे असे म्हणतात. हे बहुविभागीय दुकान म्हणजे एक भव्य विक्रीकेंद्रच होय. टाचणीपासून मोटारीपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू या दुकानांत विकल्या जातात. ग्राहकांच्या क्रय-प्रेरणांना आवाहन करण्यासाठी वस्तु-दालने (शोकेस), वस्तूंची आकर्षक मांडणी, अत्याधुनिक फर्निचर, तत्पर सेवक व भव्य सजावट यांवर मोठा खर्च केला जातो. दूरध्वनीवरून मालाची मागणी स्वीकारली जाते. माल घरपोच करण्यासाठी दुकानाची गाडी असते. थोडक्यात, गिऱ्हाईकांच्या जास्तीत जास्त सुखसोयींकडे लक्ष पुरविण्यात येते. पाश्चिमात्य देशांत बहुविभागीय दुकाने अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. या दुकानांना मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. मालांच्या किमती वाजवीपेक्षा जास्त असल्याने छोटी गिऱ्हाईके या दुकानांकडे फारशी फिरकत नाहीत. धंद्याचा पसारा प्रचंड असल्याने मालक आणि ग्राहक यांच्यात जिव्हाळा निर्माण होणे अशक्य होते. अनेकदा व्यवसायाचा व्याप आटोक्याबाहेर जातो, माल पडून राहतो आणि व्यवस्थापनाला प्रचंड नुकसानही सोसावे लागते. वाढती स्पर्धा, मोठ्या प्रमाणावरील वाहतूक समस्या, मोटारगाड्या ठेवण्यासाठी अपुरे वाहनतळ, प्रदूषण यांमुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली एकछत्री दुकाने अनेक देशांमध्ये ग्राहकांना आकृष्ट करण्यात अपयशी ठरली आहेत. त्यामुळे अशा दुकानांनी आपल्या शाखा उपनगरांमध्ये उघडण्यास सुरुवात केली आहे. अनेक वस्तूंची विक्री एकाच ठिकाणी न करता केवळ विशिष्ट वस्तूंचीच विक्री शहरातील निरनिराळ्या भागांत करणाऱ्या दुकानांना बहुशाखा अगर साखळी दुकाने असे म्हणतात. जसजसे धंद्यात यश मिळत जाईल, तसतशा दुकानांच्या शाखा शहराच्या विविध भागांत उघडण्यात येतात. शहरभर विखुरलेल्या सर्व दुकानांवर मध्यवर्ती कार्यालयाचे नियंत्रण असते. स्वत: उत्पादक साखळी दुकाने सुरू करून ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध ठेवू शकतो. त्यामुळे मध्यस्थाचे उच्चाटन होते. अशा दुकानांतून भपक्यापेक्षा चांगल्या दर्जाचा नित्योपयोगी माल शहराच्या विविध भागांतील रहिवाशांना माफक किमतीत देण्यावर अधिक कटाक्ष असतो. ग्राहकांच्या तक्रारी असतील, तर मुख्य कचेरी तक्रारीचे निवारण करते. मात्र ग्राहकांना बहुविभागीय दुकानांत मिळतो, तसा विविध प्रकारचा वैविध्यपूर्ण माल येथे मिळत नाही. साखळी दुकाने चालविण्यासाठी कार्यक्षम नोकरवर्गाची गरज भासते. अन्यथा ही दुकाने ग्राहकांच्या सदिच्छा गमावतात.
कराराने बांधलेली दुकाने वेगळ्या तत्त्वावर चालविली जातात. किरकोळ व्यापारी एरवी स्वतंत्र असला, तरी उत्पादकाचे नियंत्रण तो काही विशिष्ट बाबतींत स्वत:वर लादून घेतो. हा किरकोळ दुकानदार वरकरणी सर्व उत्पादकांचा माल विकत असला, तरी तो एकदोन उत्पादकांचा माल अधिक प्रमाणात खपविण्याचा प्रयत्न करतो. या उत्पादकांकडून दुकानदारास उधारीवर वा स्वस्त किमतीत माल मिळत असतो म्हणून दुकानदार उत्पादकाशी अलिखित कराराने बांधलेला असतो. मात्र हा करार गुप्त असतो. दुकानात माल ठेवणाऱ्या इतर उत्पादकांना त्याची कुणकुण लागणार नाही, याची खबरदारी घेतली जाते.
स़कल्पना
भारती एंटरप्रायझेस लिमिटेड यांनी संयुक्त उपक्रमाद्वारे 10 ते 15 'कॅश अॅण्ड करी येत्या सात वर्षात सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यातील पहिले दुकान ग्रोसरी, ग्राहकोपयोगी वस्तू, फळे, भाजीपाला व किरकोळ छोटे व्यवसाय असलेले 2008 या अखेरीस उत्तर भारतात सुरू केले आहे. जगातील 5 व्या क्रमांकाची किरकोळ व्यापार क्षेत्रातील कंपनी कोस्टको होलसेल कार्पोरेशन भारतात येण्यासाठी उत्सुक असून योग्य त्या संधीची वाट पाहत आहे. परंतु आजही भारतीय किरकोळ व्यापार क्षेत्रात काही आव्हाने आहेत. ती म्हणजे
1. किरकोळ व्यापरी क्षेत्रातील गुंतवणूकीला आपोआप मान्यता दिली जात नाही.
2. 3. रियल इस्टेट खरेदी करण्यावरील नियंत्रण अतिशय कडक आहेत. भारताची कररचना लहान व्यवसायांच्या हिताचीच आहे.
4. देशामध्ये विकसित वितरण साखळी व एकात्मिक माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा अभाव आहे.
5. प्रशिक्षित कामगार वर्गाचा अभाव आहे..
6. किरकोळ व्यापार व्यवस्थापनाचा दर्जा सामान्य आहे.
7. किमतीत वारंवार होणारे चढ उतार, नफ्याचे कमी अधिक प्रमाण ही देखील ह्या क्षेत्रातील आव्हाने आहेत. ही आव्हाने असली तरी आज भारतातील किरकोळ व्यापारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासाला संधी उपलब्ध आहेत आणि म्हणूनच भारतीय तसेच अंतरराष्ट्रीय कंपन्यांची पावले या क्षेत्राकडे वळत आहेत. भारताची वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर सेवा क्षेत्राकडे वळत आहे. शेती व्यवसाय व उत्पादन क्षेत्रात उपलब्ध असणारा अल्प रोजगार यामुळे सेवा क्षेत्राचे महत्व दिवसेंदिवस वाढत असून भारताच्या संघटीत किरकोळ व्यापार क्षेत्रात दरवर्षी 35 टक्क्याने वाढ होत आहे तर त्या तुलनेने असंघटीत व्यापार क्षेत्रात फक्त 6 टक्के वाढ होत आहे. भारतातील किरकोळ व्यवसाय सध्या विकासाच्या टप्प्यावर आहे. ओ. टी. किअरनर्स (A. T. Kearneys) यांनी प्रसिद्ध केलेल्या 'ग्लोबल रिटेल डेव्हलपमेंट इंडेक्स च्या अहवालानुसार सलग तीन वर्ष भारतातील किरकोळ व्यापार जगात आघाडीवर आहे तसेच गुतंवणूकीचे आकर्षक क्षेत्र राखण्यात देखील आघाडीवर आहे. 2011 पर्यंत भारतात 900 मॉल्स