व्यवसाय
दुकान
मी एक १७ वर्षाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर मला कापडाचे दुकानाचा व्यवसाय सुरू करायचा आहे, माझी दहावी झाली आहे, आमची परिस्थिती फार गरीब आहे, मी हॉटेलमध्ये काम करत आहे. मी व्यवसाय सुरू करू का नको,याची माहिती मिळेल का, त्याला किती खर्च येईल?
1 उत्तर
1
answers

Answer link
माझ्यामते, तुम्ही आधी आपले शिक्षण पूर्ण करावे किमान 12 वी पर्यंत तरी नंतर पुढे व्यवसाय किंवा लहान- मोठी नोकरी किंवा व्यवसाय करावा, जे फक्त स्वतः वरील खर्च भरू शकतील. शिक्षण करता करता सुरवातीला जर कापड दुकानात थोडे दिवस काम केलं तर बरे होईल म्हणजे तेथील अनुभव कामी येईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागते, त्यासाठी मार्केट जवळ गाळा व इतर सुविधा पाहिजे. व्यवसाय कोणत्या भागात सुरू करता यावर भांडवल अवलंबून आहे. शहरी भागात जास्त निमशहरी भागात कमी तर ग्रामीण भागात त्यापेक्षा कमी लागेल. व्यवसाय करणे चांगलेच आहे पण आपली परिस्थिती पाहता कमी भांडवलात छोट्या दुकानाने सुरवात केलेली चांगली म्हणजे तोटा कमी होईल आणि नफा जर झाला तर व्यवसाय वाढवता येईल. पण आधी लक्ष शिक्षणावर द्यावे असे मला वाटते.