रसायनशास्त्र विज्ञान

पाणी हे एक संयुग आहे याचे शास्त्रीय कारण काय?

2 उत्तरे
2 answers

पाणी हे एक संयुग आहे याचे शास्त्रीय कारण काय?

4
पाणी : सर्वांच्या परिचयाचा एक सामान्य द्रव पदार्थ. पाणी हे मूलद्रव्य आहे असे पूर्वी समजले जात असे परंतु १७८१ मध्ये हेन्‌री कॅव्हेंडिश यांनी ज्यात हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या घनफळाचे प्रमाण २ : १ आहे अशा मिश्रणात विजेची ठिणगी पाडली, तर पाणी बनते, असे दाखविले. त्यानंतर डब्ल्यू. निकल्‌सन आणि ए. कार्लाइल यांनी विद्युत् प्रवाहाने पाण्याचे विच्छेदन (रेणूचे तुकडे करणे) केले तेव्हा हेच वायू याच प्रमाणात निर्माण होतात असे त्यांना दिसून आले. या प्रयोगावरून पाणी हे मूलद्रव्य नसून ते हायड्रोजन व ऑक्सिजन यांपासून बनलेले संयुग आहे, हे सिद्ध झाले. याचे रेणुसूत्र (रेणूमध्ये असणाऱ्या अणूंचे प्रकार व त्यांची संख्या दर्शविणारे सूत्र) H2O आहे, हे १८६७ मध्ये निश्चित करण्यात आले.

उपस्थिती व कार्य: पृथ्वीवरील जीवांची उत्पत्ती पाण्यात झाली व त्यामुळे ते जीवोत्त्पत्तीच्या काळाच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जवळजवळ ३/४ भाग त्याने व्यापिलेला आहे.

प्राणी व वनस्पती यांमध्ये पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. मानवी शरीरात सु. ७०%, जमिनीवरील वनस्पतींत ५०–७५% आणि पाण्यातील वनस्पतींत ९५ ते ९९% पाणी असते. काही खनिज पदार्थांमध्ये पाणी संयोगित अवस्थेत असते [⟶ जलसंयोग].

पृथ्वीवर समुद्र, नद्या, ओढे, सरोवरे, झरे, विहिरी इ. रूपाने पाणी आढळते. कित्येक ठिकाणी जमिनीखाली पाणी अस्तित्वात आहे, पण फार खोल असल्यामुळे ते बाहेर काढणे परवडत नाही [⟶ भूमिजल]. घनरूप पाणी उत्तर व दक्षिण ध्रुवांकडील सतत हिमाच्छादित असलेल्या प्रदेशांत, शीत कटिबंधात व इतरत्र उंच पर्वतराजींवर आढळते. गारा पडतात आणि हिमवर्षाव होतो तेव्हाही त्याचे अस्तित्व प्रत्ययास येते. बाष्परूप पाणी वातावरणात कमी-जास्त प्रमाणात नेहमीच असते.

सूर्याच्या उष्णतेने समुद्र व इतर जलाशय यांच्या पाण्याची वाफ बनते आणि ती वातावरणात शिरून तिचे ढग बनतात. ढगांपासून पावसाच्या, हिमाच्या किंवा गारांच्या रूपाने पाणी परत पृथ्वीस मिळते. असे जलावर्तन किंवा जलस्थित्यंतरचक्र अव्याहत चालू असते
भौतिक गुणधर्म: शुद्ध पाणी रुचिहीन व गंधहीन असते. पाण्याचा पातळ थर वर्णहीन असतो परंतु त्याच्या जाड (२ मी. पेक्षा जास्त) थरातून आरपार पाहिले, तर ते निळसर दिसते. थंड करू लागल्यास ४° से. तापमान येईपर्यंत पाणी आकुंचन पावते. तापमान त्याच्या खाली जाऊ लागले म्हणजे ते प्रसरण पावू लागते व ०° से. तापमानास गोठते. पाण्याच्या या गुणधर्माला पाण्याचे असंगत प्रसरण असे म्हणतात. ४° से. तापमान असलेले पाणी इतर तापमानाच्या पाण्यापेक्षा जड असते म्हणजे त्याची घनता या तापमानाला सर्वांत अधिक असते. या तापमानाच्या १ घ. सेंमी. पाण्याचे वजन हे प्रमाणित १ ग्रॅम वजन मानण्यात आले आहे.

पाण्याचा हा एक विशेष गुण असून त्याला निसर्गात फार महत्त्व आहे. एखाद्या जलाशयाचे पाणी थंड होऊन त्याचे तापमान ४° से. च्या खाली जाऊ लागते तसतसे कमी तापमानाचे पाणी हलके असल्यामुळे पृष्ठभागावर येते व गोठते तेव्हा त्याचा थर पृष्ठभागावर पसरतो. त्याखाली पाणी द्रवरूपच राहते म्हणजे संपूर्ण जलाशय गोठू शकत नाही व त्यामुळे त्यात जलचर प्राणी जिवंत राहू शकतात. 
उत्तर लिहिले · 27/10/2021
कर्म · 720
0
पाणी एक संयुग आहे, या विधानासाठी शास्त्रीय कारण खालीलप्रमाणे आहे:

पाण्याची रासायनिक रचना: पाणी दोन घटकdrंनी बनलेले आहे: हायड्रोजन (H) आणि ऑक्सिजन (O). पाण्याचा प्रत्येक रेणू (molecule) दोन हायड्रोजन atoms आणि एक ऑक्सिजन atom यांच्या संयोगाने बनतो.

रासायनिक बंध (Chemical bond): हायड्रोजन आणि ऑक्सिजन atoms विशिष्ट रासायनिक बंधांनी (chemical bonds) जोडलेले असतात. हे बंध त्यांना एकत्र ठेवतात.

निश्चित गुणधर्म: पाणी नेहमी त्याच्या निश्चित गुणधर्मांनी ओळखले जाते. उदाहरणार्थ, पाण्याचा गोठणबिंदू 0° सेल्सियस असतो आणि उकळबिंदू 100° सेल्सियस असतो. हे गुणधर्म दर्शवतात की पाणी एक विशिष्ट रासायनिक रचना असलेले संयुग आहे.

घटकांचे विभाजन: विद्युत अपघटन (electrolysis) प्रक्रियेद्वारे पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजित केले जाऊ शकते.

उदाहरण:

  • पाणी (H2O): हायड्रोजनचे दोन atoms आणि ऑक्सिजनचा एक atom.

म्हणून, पाणी हे एक संयुग आहे कारण ते दोन वेगवेगळ्या घटकांनी विशिष्ट रासायनिक बंधांनी बनलेले आहे आणि त्याचे स्वतःचे निश्चित गुणधर्म आहेत.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 220

Related Questions

वन्यजीवन म्हणजे काय?
लाईटी चा शोध कोणी लावला?
तांब्याच्या मूर्ती साफ करण्यासाठी लिंबू का वापरतात?
प्रतिजैविके म्हणजे काय?
कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हेलोजन मूलद्रव्य कोणते आहे?
न्यूलँडच्या अष्टकाचा नियम काय आहे?
नॉन स्टिक भांडी वापरावीत का?