चेक
नुकतेच माझ्या भावाचे निधन झाले आहे,त्याचे sbi आणि state bank of maharashtra या दोन बँकेत अकाऊंट आहे पण पासबुक नाही तसेच atm आहे पण पिन माहीत नाही तर त्याच्या बँकेचा तपशिल कसा चेक करता येईल?
1 उत्तर
1
answers
नुकतेच माझ्या भावाचे निधन झाले आहे,त्याचे sbi आणि state bank of maharashtra या दोन बँकेत अकाऊंट आहे पण पासबुक नाही तसेच atm आहे पण पिन माहीत नाही तर त्याच्या बँकेचा तपशिल कसा चेक करता येईल?
4
Answer link
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
यासाठी ज्या शाखेत खाते होते तेथे जा. तुमचे प्रकरण सांगा. बँक तुम्हाला एक अर्ज देईल. तो अर्ज भरून, तुम्हाला मृत्यूचा दाखला, मृत्यूपत्र(असेल तर), आणि इतर जे कागदपत्रे सांगतील तसे द्यावे लागतील.
जर मृत्युपत्र नसेल तर कायदेशीर वारसाला सर्व रक्कम मिळते. म्हणजे भाऊ विवाहित असेल तर पत्नीला व मुलांना, आणि अविवाहित असेल तर पालकांना हे पैसे दिले जातील.