गुन्हा

दहशतवाद म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

दहशतवाद म्हणजे काय?

1
आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराधी नागरिकांना व्यवस्थेच्या विरोधात धमकी देणे किंवा समाजामध्ये भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे 'दहशतवाद' होय.

स्वरूप : 

१. संघटित, नियोजित, हिंसात्मक कृती.
२. राजकीय हेतूने प्रेरित
३. बळजबरी व धमक्या देण्यासाठी शस्स्त्रांचा वापर
४. लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असते.
५. लोकशाहीविरोधी कृत्य, मानवीहक्कांचा भंग
६. स्थानिक ते वैश्विक स्वरूप

उपाय :

१. मानवतावादी तत्त्वज्ञानामुळे जागतिक शांतता स्थापण्यासाठी प्रयत्‍न करणे.

२. जमातवाद कमी करणे. 

३. काळ्या पैशाच्या निर्मितीवर प्रतिबंधक उपाययोजना करणे.

४. दहशतवाद संपविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन प्रयत्‍न करणे.

५. शस्त्रास्त्राचा खणखणाट अर्थपूर्ण राजकीय धोरणाला पर्याय ठरू शकत नाही ही समजूत आचरणात आणणे.

६. दशतवादाविरुद्ध कडक कायदे व नियम बनविणे व त्यांची कठोर अंमलबजावणी करणे.

७. दहशतवादास खतपाणी घालणारी देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.

८. सरकाने व नागरिकांनी एकत्र येऊन लढा उभारणे जमातवाद कमी करणे. 


दहशतवाद रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे :

१. महाराष्ट्र स्थानबद्धता प्रतिबंधक कायदा (१९७०)

२. राजकीय सुरक्षा कायदा (१९८०)

३. महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करणारा कायदा (१९८१)

४. विमान अपहरणविरोधी कायदा (१९८२)

५. दहशतवाद प्रभावित क्षेत्रांसाठी विशेष न्यायालयांची तरतूद (१९८४)

६. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (१९९९) MCOCA

७. टेलिफोन टॅपिंग

उत्तर लिहिले · 8/8/2021
कर्म · 25790

Related Questions

रेकॉर्डींग करणे गुन्हा आहे का?
फोन रेकॉर्डींग करणे गुन्हा आहे का?
घराच्या वादातून खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असेल तर यावर उपाय आहे का?
एखाद्या व्यक्तीने सुसाईट नोट लिहुन सुसाईट न करता तो परार झाला तर पोलीसाना सापडला तर व्यक्ती वर काय गुन्हा दाखल होऊ शकतो?
मी पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणुकीची एक तक्रार केली आहे,सगळे पुरावे देखील दिले आहेत,पण पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत,तर कोणाला भेटले पाहिजे?
माणसाने किती गुन्हे केल्यास, तो आरोपी म्हणून सिध्द होतो?
स्मगलर कैदी लोक नवस करतात ते मंदिर कोणते?