Topic icon

गुन्हा

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
नाही

उत्तर लिहिले · 6/8/2023
कर्म · 0
0
फोन रेकाॅडिंग करणे गुन्हा आहे.

तुम्ही एखाद्याशी फोन वर संभाषण करीत असतांना कॉल रेकॉर्ड करणे हा कायद्याने गुन्हाच असून एखाद्याच्या परवानगी शिवाय केलेल्या फोन    रेकाॅडिंग केल्यामुळे गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होतं असल्याने कॉल रेकॉर्ड करणे हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१मधील घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन आहे. एका प्रकरणात याबाबत स्पष्टीकरण देतांना दिल्ली उच्च न्यायालयाने  फोन रेकाॅडिंग करणे गुन्हा असल्याचे अधोरेखित केलं आहे.

 

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७२


 

कॉल रेकॉर्डिंग आज खूप सोपे आहे. गुगल प्ले स्टोअरवर अनेक App सापडतील, अगदी सहज कॉल रेकॉर्डिंग App मोफत उपलब्ध करून दिले आहेत. आपले संभाषण समोरच्याला न कळवता रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर किंवा स्वतःच्या मित्रांना पाठवण्याची सवयही अनेकांना असते. मग रेकॉर्ड केलेला कॉल मुलाचा असो की मुलीचा. कारण आपल्यापैकी बहुतेकांना हे बेकायदेशीर आहे हे देखील माहित नाही.

 

 

जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी तुमचे संभाषण रेकॉर्ड करत आहे ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा, गोपनीयतेला हानी पोहोचू शकते किंवा फक्त याच उद्देशाने तो तुमचे संभाषण रेकॉर्ड करत असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करू शकता कारण तुमच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाले आहे, त्यामुळे तुम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाऊ शकता.




 
.


 

 



 

हायकोर्टाने असेही म्हटले आहे की, एखाद्या अधिकाऱ्याने ‘आयटी कायदा किंवा त्याखालील नियमांनुसार मिळालेले इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड (संभाषण, कॉल डिटेल्स, मेल, मेसेज) संमतीशिवाय दुसऱ्या व्यक्तिला देणे, हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७२ नुसार गुन्हा आहे.

 



 

एखाद्याच्या संमतीशिवाय फोन टॅप करणे किंवा कॉल रेकॉर्ड करणे हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. घटनेच्या अनुच्छेद २१नुसार निहीत गोपनीयतेच्या अधिकाराप्रमाणे फोन कॉल रेकॉर्ड करता येत नाही. केवळ संबंधित व्यक्तींच्या संमतीनेच अशा प्रकारची कृती केली जाऊ शकते. संमतीशिवाय फोन टॅप करणे आणि रेकॉर्ड करणे, हे भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायद्याच्या विविध कलमांतर्गत दंडनीय अपराध आहे.



उत्तर लिहिले · 6/8/2023
कर्म · 48425
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही