2 उत्तरे
2
answers
पेट्रोल पंपावर डिझेल पण मिळते, मग त्याला डिझेल पंप का म्हणत नाहीत?
6
Answer link
असे शब्द बोलीभाषेतून प्रचलित होतात.
जेव्हा दुचाकी गाड्या पहिल्यांदा बाजारात आल्या त्यावेळेस त्या पेट्रोलवर चालत. आणि बहुतांशी लोकांकडे दुचाकी असत आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या फार कमी लोकांकडे असे.
अशा वेळेस पंपातून पेट्रोल टाकण्यासाठी लोक ज्या ठिकाणी जात त्याला पेट्रोल पंप म्हणू लागते. आणि काही पंपांवर फक्त पेट्रोलच विकले जायचे. हाच शब्द प्रचलित झाला आणि आपण त्याला आजही पेट्रोल पपंच म्हणतो.
तसाच प्रकार मोबाईल या शब्दाचा आहे, मोबाईल म्हणजे जी गोष्ट एक जागेवरून दुसऱ्या जागी सहज हलवता येते. तरी पण मोबाईल म्हणलं तर आपल्या समोर फक्त मोबाईल फोन उभा राहतो.
तसे पाहता पेट्रोल पंपाला अचूक शब्द फ्युएल स्टेशन म्हणजे इंधन स्थानक असा होईल. मग इंधनात पेट्रोल, डिझेल, सीएनजी हे सर्व प्रकार येतात.
0
Answer link
पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही उपलब्ध असतात. तरीही त्याला डिझेल पंप न म्हणता पेट्रोल पंप म्हणतात, याची काही कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत:
- ऐतिहासिक कारण: सुरुवातीला जेव्हा हे पंप सुरू झाले, तेव्हा पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे 'पेट्रोल पंप' हे नाव रूढ झाले.
- लोकप्रियता: पेट्रोल हे डिझेलच्या तुलनेत अधिक प्रसिद्ध आणि जास्त वापरले जाणारे इंधन आहे. त्यामुळे लोकांना ते नाव अधिक सोपे वाटते.
- विपणन (Marketing): 'पेट्रोल पंप' हे नाव ग्राहकांच्या मनात लवकर येते आणि ते लक्षात ठेवणे सोपे जाते.
या कारणांमुळे डिझेल मिळत असले तरी बहुतेक लोक याला पेट्रोल पंप म्हणूनच ओळखतात.