नैसर्गिक ऊर्जा
1
Answer link
सौर ऊर्जेचे सगळ्यात सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. ही ऊर्जा नैसर्गिकरीत्या आणि विनामूल्य उपलब्ध असते. सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळत असते. शिवाय सूर्यापासून येणारे जंबुपार प्रारण, सौरवाताचा स्थिर प्रवाह आणि मोठ्या उज्ज्वालांची कणमय वादळे यांचा पृथ्वीवर परिणाम होतो.
सौरऊर्जा
सौरऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सूर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीत वाढेल आणि सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाहीनाहीघ बढती समजून रोजी गमभन डोळे गमती. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी बऱ्याच संशोधनाची आवश्यकता आहे. अपारंपारिक आणि विशेषतः सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनावरील निधी तसेच जागरूकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या पारंपारिक ऊर्जास्रोतांचे पर्याय फक्त अजून काही वर्षेच उपलब्ध असणार आहेत. शिवाय त्यांच्या अनेक नकारात्मक बाजूही आहेत. अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात सौरऊर्जेशिवाय वायुऊर्जा, टायडल, जिओथर्मल असे पर्याय आहेत. मात्र, भविष्यकाळातील ऊर्जेची गरज काही अंशीच भागवण्याची क्षमता त्यात आहे. सध्या सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधन हे मुख्यतः सौरऊर्जा ही पारंपरिक ऊर्जास्रोतांपेक्षा कमी खर्चिक करण्यासाठी चालू आहे. जपान, जर्मनी या सौरऊर्जेतील परंपरागत शिलेदारांसकट अमेरिका शिवाय चीन आणि भारतानेही याबाबत पुढाकार घेतला आहे. सौरऊर्जा निर्मितीत आणि नंतर वापरातही कुठल्याही भारतभ म्हणून प्रकारचे अपायकारक वायू वातावरणात सोडले जात नाहीत. त्यामुळे प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगसारखे इतर ऊर्जाक्षेत्रांशी निगडित वादांचे विषय सौरऊर्जेपासून मात्र चार हात दूरच आहेत.
सौरऊर्जेचा वापर संपादन करा
प्रकाशसंश्लेषण
हरितद्रव्य असणारी सर्व झाडे, सुक्ष्मजीव इत्यादी.
उष्णता
बाष्पीभवन
प्रकाश
मनुष्यप्राण्यात ड-जीवनसत्व बनवण्यासाठी, सौरविद्युत
ऊर्जा संसाधने संपादन करा
ऊर्जा संसाधनाचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते
पारंपारिक ऊर्जा संसाधने
सरपण, शेणाच्या गोवऱ्या, पेंढा हे पारंपारिक इंधन वर्षानुवर्षे वापरले जात आहे. याशिवाय कोळसा, खनिज तेल, जल ऊर्जा, अणुऊर्जा इत्यादींचा पारंपारिक ऊर्जा संसाधनांत समावेश होतो
'अपारंपारिक ऊर्जा संसाधनेcbcghyugjf'
सौरऊर्जेचा महत्व संपादन करा
सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचा मीटर बसवावा लागत नाही व कुठलेही बिल भरावे लागत नाही.
मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याचा आपण जर उपयोग करू शकलो तर निसर्गातील झाडांची तोड थांबू शकेल. त्यामुळे पर्यावरण र्हासालाही आळा बसेल.
दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही