गडदुर्ग
कुगावचा किल्ला बद्दल माहिती दया?
2 उत्तरे
2
answers
कुगावचा किल्ला बद्दल माहिती दया?
0
Answer link
सोलापूर जिल्ह्यातील ऊजनी धरणात कुगावचा किल्ला सामावला आहे.१९७६ साली धरणात पाणी अडविण्यास सुरूवात झाल्यावर अनेक गावे धरणात गडप झाली,तयात कुगाव या भुईकोट किल्लाचा सामावेश होता.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव हे गावही असेच पाण्याखाली गेले होते. गावातील घरे, रस्ते, पूल, शाळा, मंदिरे अगदी गावातील ४०० वर्षांपूर्वीचा इनामदार संस्थानिकांचा भुईकोट किल्लाही पाण्याच्या उदरात गडप झाला.
उन्हाळ्यात धरणातील पाणी कमी झाले की,याचे दर्शन होते.पण ही स्थिती प्रत्येक वर्षी येईलच असे नाही.माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची टीम म्हणजे आम्ही दोघेच,मी अनिल पाटील व विक्रम धनवडे कुगावला गेलो असता असे समजलेकी,इंदापूरपासून १८ किमी अंतरावरील कळाशी या गावातून जाणाऱ्या नदीच्या पात्रात सुमारे १ ते १.५ कि.मी.अंतरावर हा किल्ला. भीमेच्या पात्रात जलसमाधी मिळालेल्या वास्तूत ऐतिहासिक भुईकोट किल्ला आपल्या खास शैलीमुळे आपली वेगळीच ओळख करून देतो.हैद्राबादच्या निजामाने जिजाबा इनामदार, नागोबा इनामदार, देवराव इनामदार या तीन भावडांना कुगाव हे गाव व त्याच्या पंचक्रोशीतील पाच गावे जहागिरी म्हणून दिली होती. या इनामदार बंधूनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी प्रसिध्द भीमा नदीच्या तीरावर पश्चिमेला हा भुईकोट किल्ला बांधला. ह्या किल्याचा विस्तार सुमारे २.५ एकरात विस्तारलेले असून याच्या चार ही बाजूस सुमारे १५ टे २० फुट रुंदीची व ४० फुट लांबीची भव्य चिरेबंदी तटबंदी उभारलेली दिसत असून चारही दिशेला मोठमोठे वर्तुळाकृती बुरूज असल्याचे निदर्शनात दिसून येते त्यापैकी एक बुरुज आजही चांगल्या स्थितीत आहे.

हनुमानाची जन्मभूमी म्हणून कुगावची ओळख आहे. याबाबतचा ‘भीममहात्म्य’ या पौराणिक ग्रंथातील ३३ व्या अध्यायात उल्लेख आहे.
किल्ल्याला एकूण तीन प्रवेश दरवाजे आहेत.. यातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस उंच मनोरे आहेत.. समोरून पाहताना हे मनोरे एखाद्या मिनारासारखे भासतात.. मुख्य द्वाराशेजारी देवडी असून.. तिला कमान असलेली रुंद खिडकी आहे.. बोटीवरून ६-७ फुट खाली तटबंदी च्या ढासळलेल्या दगडांच्या राशीवर उडी मारून.. गडाच्या भग्न तटबंदीवरून गडावर प्रवेश केला.किल्ल्याला एकूण सहा बुरुज असून, त्याचा आकार साधारण चौरस असा आहे.. उजवीकडे कोपरयात बुरुज आणि गडाचा दुसरा दरवाजा नजरेस पडतो.. मग पुन्हा डावीकडे काटकोनात शेवटपर्यंत जाताच.. एक चोर दरवाजा.. बुरुज.. तलाव आणि मागे एका बेटासारखे दिसणारे मंदिर नजरेस पडते.. इथे एक अर्धवट तुटलेला रांजण नजरेस पडतो.. गडाच्या मध्यभागी वाड्याचे चौथरे नजरेस पडतात.. गडाच्या मध्यभागी .. वाहून आलेली माती भरली आहे.. आणि ठिकठिकाणी पाण्याची डबकी.. त्यातून वाट काढत पुन्हा मुख्य दरवाजा जवळ येवून पोहोचलो.या किल्ल्यातून नदीच्या पात्रापर्यंत भुयारी मार्ग होता. असे म्हणतात.
या किल्ल्याच्या संरक्षक भिंती सुमारे पंधरा फुटांपेक्षा जादा रुंदीच्या आहेत. तसेच चारही बाजूला मोठमोठाले बुरूज होते. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुण्याच्या शनिवारवाड्यापेक्षाही मोठा आहे.
मुख्य दरवाजाच्या डावीकडील खिडकी तून डोकावून पाहिलं.. तर आत देवडी आणि दरवाजाच्या आतील भिंतीचे अवशेष पाहायला मिळाले ..
१९५६ व १९६१ मध्ये भीमा नदीला आलेल्या पुराच्या वेळी संपूर्ण कुगाव व परिसरातील लोकांनी या किल्ल्यात आसरा घेतला होता.''
©माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
0
Answer link
कुगाव किल्ला हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:
- स्थान: कुगाव किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.
- इतिहास: हा किल्ला फार प्राचीन आहे. किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असे.
- भौगोलिक रचना: हा किल्ला डोंगरावर असल्यामुळे त्याची रचना चढाईला अवघड आहे.
- दर्शनीय स्थळे: किल्ल्यावर पाण्याची काही टाकी आहेत.
हा किल्ला ट्रेकिंगसाठी चांगला आहे.