
गडदुर्ग
0
Answer link
महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांची माहिती सविस्तर वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा किंवा www.sopenibandh.com
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
Answer link
. मंदिराच्या शिलालेखामध्ये जगदीश्वर हे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना उल्लेखून वापरलेले विशेषण आहे. प्रत्यक्षात हे मंदिर वाडेश्वर किंवा व्याडेश्वर आहे, हे पटवून सांगणारा शोधनिंबध जोशी यांनी प्रसिद्ध केला आहे. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये जोशी यांनी रविवारी इतिहास अभ्यासकांसमोर या निबंधाचे वाचन केले. रायगडाचा विषय निघाला, की डोळ्यासमोर जगदीश्वर महादेवाचे देवालय येते. या मंदिराचे नाव जगदीश्वर आहे, असे आजपर्यंतच्या अभ्यासातून दिसत होते. पण, माझ्या संशोधनातून या मंदिराचे मूळ नाव वाडेश्वर किंवा व्याडेश्वर असल्याची माहिती मला मिळाली आहे, असे जोशी यांनी सांगितले. रायगडावरील महादेवाच्या मंदिराच्या भिंतीवर शिलालेख असून, तो संस्कृतमध्ये श्लोक या स्वरूपात लिहलेला आहे. शिलालेखामध्ये जगदीश्वर मंदिराचे बांधकाम झाले आहे, असा अर्थ आजपर्यंत अनेक अभ्यासकांनी काढला होता. पण, शिलालेखामध्ये जगदीश्वर हे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून वापरलेले विशेषण आहे. प्रासाद या शब्दाचा अर्थ वाडा किंवा राजवाडा असाही होतो. शिलालेखाचे व्यवस्थित वाचन केल्यावर यामध्ये मंदिराच्या बांधकामाविषयी नव्हे; तर शिवाजी महाराजांच्या राजवाड्याच्या बांधकामाविषयी माहिती दिली आहे, असे जोशी यांनी सांगितले. शिलालेख सध्या ज्या जागी आहे, ती त्याची मूळ जागा नाही. हा शिलालेख शिवकाळात मंदिरावर लावलेला नसून, गडावर दृश्य जागी असावा. रायगडावरील महादेव मंदिराचे नाव जगदीश्वर आहे, अशी नोंद शिलालेख वगळता इतर कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रात आलेली नाही. उलट या मंदिराचे नाव वाडेश्वर किंवा व्याडेश्वर आहे, असा उल्लेख पेशवे दप्तरातील मोडी कागदपत्रात आलेला आहे. श. ना. जोशी यांनी पेशवेकाळातील अप्रकाशित मोडी कागदपत्रांचे वाचन केले आहे. त्यामध्ये मंदिराचे नाव वाडेश्वर आले आहे. हा शिलालेख बदलल्याचे पुरावेही अनेकांना मिळाले आहेत. रायगडावर अनेकवेळा पेशवे काळात दुरुस्ती झाली होती. या दुरुस्तीच्या वेळी शिलालेख मंदिराच्या भिंतीत बसविला असावा. हा लेख मंदिरावर असल्याने आणि त्यात जगदीश्वर असा शब्द असल्याने अनेक अभ्यासकांनी जगदीश्वराचे मंदिर असल्याचा उल्लेख केला आहे,
1
Answer link
तोरणा
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला [१] असे ठेवण्यात आले. [२] महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. [३]
0
Answer link
कोल्हापूर पासून राधानगरी व त्याला लागुन जवळच दाजीपूर अभयारण्य आहे.हा रस्ता कोकणात उतरणारा असल्याने वर्दळीचा आहे.पण एका बाजूला शांत असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यात "शिवगड किल्ला" असुन अनेकांना तो अपरिचित आहे.
शिवकाळात मालवण, आचरा इत्यादी तळ कोकणातील बंदरात उतरणारा माल अनेक घाटमार्गांनी सह्याद्रीच्या पठारावरील बाजारपेठांत जात असे. अशा घाटमार्गांपैकीच फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवगडाची उभारणी करण्यात आली होती.राधानगरी व काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या व जीववैवध्यतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्याला बरेच पर्यटक भेट देतात, पण अभयारण्यातच असलेला शिवगड पाहाण्यास फारसे पर्यटक फिरकत नाहीत. खरेतर थोडासा चढ व आटोपशीर आकार असलेला किल्ला दाजीपूरच्या भेटीत आरामात पहाता येण्यासारखा आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,जुन १७३२ मधे बोलवण (ओळवण)-घोणसरीच्या डोंगरावर तटबंदी करण्यासाठी सैन्य पाठविले. हि खबर छ्त्रपतीना समजतात, त्यांनी पंत आमात्याना सावंताविरुध्द रवाना केले, त्यांनी सावंतांचे सैन्य येण्याआधीच घोणसरीचा डोंगर ताब्यात घेतला आणि शिवगडाची उभारणी केली.शिवगड पाहाण्यासाठी दाजीपूर अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून माणशी रुपये २०/ भरुन प्रवेश घ्यावा लागतो.(हा दर २०१६ ला होता) अभयारण्यातील कच्च्या रस्त्याने फॉरेस्ट रेस्ट हाऊसपर्यंत गेल्यावर एक पायवाट गगनगिरी महाराजांच्या आश्रमापाशी जाते. गुरे चारणारे गुराखी सोडले तर या वाटेवर फार वर्दळ नसते.शिवगडावर पाणी नाही त्यामुळे या चौकीत पाणी भरुन घ्यावे.या वाटेने अर्धातास चालल्यावर आपण शिवगडासमोरील पठारावर येतो. पठार व शिवगड यांच्यामध्ये एक टेकाड आहे.पठारावरुन खाली उतरुन मधल्या टेकाडाला वळसा घालून थोडासा चढ चढून शिवगडावर जाता याते. येथे तटबंदीचे काही अवशेष दिसतात.तटबंदी ओलांडून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक बुरूज दिसतो. पुढे एका चौथर्यावर एक सतीशिळा दिसते.शिवगडाच्या वायव्य दिशेकडे तोंड करुन असलेल्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो.प्रवेश द्वाराचे बुरुज अजून शाबूत आहेत.प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर एक लांबलचक तटबंदी दिसते.गडाचे संरक्षण करण्यासाठी या दुहेरी तटबंदीची योजना केली असावी. तटबंदी ओलांडून पूढे गेल्यावर उजव्या बाजूस एक बूरुज दिसतो. गडाच्या पठारावर एक सुंदर सती शिळा आहे. स्थानीक लोक तीला ‘उगवाई देवी’ म्हणतात. तेथून उत्तरेच्या बुरुजावर गेल्यावर खाली कुर्ली धरण दिसते. तटबंदीच्या कडेकडेने दक्षिण बुरुजापाशी गेल्यावर बुरुजा खालून कोकणातील गडगे सखल गावातून येणारी वाट दिसते, तर दक्षिणेला फोंडा गाव दिसते. या शिवाय गडावर वाड्याचे काही अवशेष आहेत.गडाचा आकार आटोपशीर असल्यामुळे गड पाहाण्यास अर्धातास पुरतो.गड उतरुन परत येताना टेकडाला वळसा घातल्यावर समोरच्या कातळावर धबधब्यांच्या खुणा दिसतात. या धबधब्याजवळ पाण्याचे एक टाक आहे.धबधब्याचे पाणी पाटाने टाक्यात वळवलेले आहे. गडावर पाण्याची व्यवस्था आढळत नाही. या कुंडातील पाण्याचा वापर गडासाठी होत असावा. गडावरुन आजूबाजूचा परिसर पाहात असतांना पूर्वेला दाजीपूरच्या जंगलात एका मंदिराचे शिखर दिसते. मंदिर असलेल्या या परिसराला ‘झांजेचे पाणी’ म्हणतात. गड पाहून परत उगवाईच्या पठारावर येऊन कच्च्या रस्त्यावरुन जंगलाच्या दिशेने चालत गेल्यावर १० मिनिटात आपण मंदिरापाशी पोहोचतो. गगनगिरी महाराज येथे तपसाधनेसाठी बसत असत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही घरे आहेत. ती ओलांडून पूढे गेल्यावर एक बारामाही वाहणारा झरा आहे. त्यास झांजेचे पाणी म्हणतात. येथून शिवगडाचे दर्शन होते.गडावरून उत्तरेकडे पाहिल्यास सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून अलग झालेला, एखाद्या शिवलिंगासारखा दिसणारा गगनगड दिसतो. तर पुर्ण उत्तर आणि ईशान्येला दाजीपुर अभयारण्य पसरले आहे. येथून अर्ध्या तासात परत अभयारण्याच्या प्रवेश द्वाराशी जाता येते. याशिवाय दाजीपूर अभयारण्याची भटकंती सुध्दा करता येते. अभयारण्यात भटकंतीसाठी २१ किमी चा कच्चा रस्ता आहे. गाईड सोबत घेऊन जंगल पाहाणे सोईचे आहे.
*किल्यावर कसे जाल*
🚩१) कोल्हापूर ते दाजीपूर अभयारण्याचे ८० किमी वर आहे.कोकणात जाणाऱ्या गाडया येथे राधानगरीला थांबतात.
⚡ कोकणातून जायचे असेल तर फोंडा घाट-आयरेवाडी-चवथीरामाची वाडी-दारवळ- सपाटवाडी- हेळ्याचा माळ किंवा घोणसरी
🚩२) शिवगडाच्या पायथ्याशी गडगेसखल गाव आहे. कोकणातील फोंडा घाटाच्या पायथ्याशी असलेले हे गाव; फोंड्यापासून ६ किमी वर आहे. या गावातून दोन तासात दक्षिण बुरुजाच्या खालून शिवगडावर प्रवेश करता येतो.दाजीपूर अभयारण्य जून ते ऑक्टोबर बंद असते.अभयारण्यात गाईड घेऊन गेल्यास किल्ला व अभयारण्य एका दिवसात व्यवस्थित पाहता येते.कधीतरी अनुभवावी अशी ही सफर कायमची लक्षात राहते.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
संदर्भ: १)शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध -सतीश अक्कलकोट
२) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले.
आम्ही गेलो त्यावेळी आमचेकडे चांगला मोबाईल
नव्हता

0
Answer link
निवती गावाच्या नावावरून या किल्याला निवतीचा किल्ला म्हणतात. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेला, मालवण पासून जवळच निसर्गरम्य कोकणाच्या पार्श्वभुमीवर निवती गाव आहे.
या गावाजवळ असलेल्या समुद्रात शिरलेल्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी निवतीचा किल्ला बांधला. मालवणजवळ असलेली कर्ली खाडी ते वेंगुर्ला ह्या सागरी भागावर निवतीच्या किल्ल्यातून लक्ष ठेवता येते.

*किल्याचा इतिहास*
सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा ताबा पुढे सावंतवाडीकर सावंतांकडे गेला. या किल्यावर पोर्तुगीजांचा डोळा होता.१७४८ साली पोर्तुगिजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माईल खानने निवतीवर हल्ला करुन तो जिंकून घेतला. १७८७ साली करवीरकर छत्रपती व सावंत यांच्यात झालेल्या लढाईत करवीरकरांनी हा किल्ला जिंकला.१८०३ मध्ये गडाचा ताबा परत सावंतांकडे आला. ४ फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला.
*किल्यावर काय पहाल*
किल्यावर असलेल्या लालभडक चिरेबंदी दगडी पायर्यांच्या वाटेने गड चढतांना आपल्याला प्रथम पायर्र्यांच्या दोंन्ही बाजूस असलेला खोल खंदक दिसतो. सध्या तो झाडीने झाकलेला आहे.काही ठिकाणी तो मुजुन गेला आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट, याच वाटेने आपण भग्न तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश करतो. येथे डाव्या बाजूला दोन भव्य बुरुजांमध्ये प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आहेत, पण प्रवेशद्वारा पुढील मार्ग तुटल्या मुळे त्यातून प्रवेश करता येत नाही. तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन पायवाटा फूटतात. समोर जाणार्या पायवाटेने गेल्यास उजव्या बाजूस एक भव्य बुरुज दिसतो. तिथून पुढे गेल्यावर अजून एक भव्य़ बुरुज त्यावरील जंग्यासह पाहायला मिळतो. या बुरुजा जवळून खालच्या बाजूस अप्रतिम भोगवे बिच व कर्ली खाडी पर्यंतचा परिसर दिसतो. येथून डाव्या हाताला वळून समुद्राच्या दिशेला चालत गेल्यावर गडाच्या पश्चिम टोकावरुन पायथ्याला समुद्रात असलेले नारींगी रंगाचे खडक पहायला मिळतात. याच ठिकाणाहून उजव्या बाजूस समोर अरबी समुद्र व दूरवर वेंगुर्ल्याचे बर्न्ट रॉक्स हे दिपगृह दिसते. येथे एक खड्डा व त्यात उतरणार्या कातळात खोदलेल्या पायर्या पाहायला मिळतात. येथे खोदीव टाक असण्याचा संभव आहे. हे पाहून परत प्रवेशव्दारा पाशी येऊन डाव्या बाजूच्या पायवाटेने गेल्यावर आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. गडाचा बालेकिल्ला खंदक खोदून संरक्षित केलेला आहे. बालेकिल्ल्याची प्रवेशव्दारे, देवड्या, तटबंदी अजूनही शाबूत आहेत. तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. बालेकिल्ल्यात जुन्या वास्तूंचे चौथरे आहेत.निवती किल्ल्यावर आपल्याला पाण्याची व्यवस्था कुठेही दिसत नाही, ती किल्ल्याखाली केलेली आहे त्याला स्थानिक लोक ‘शिवाजीची तळी‘ या नावाने ओळखतात. ती पाहाण्यासाठी किल्ला उतरतांना सरळ रस्त्याने गावात न जाता, उजव्या बाजूला समुद्राकडे उतरणार्या रस्त्याने खाली उतरावे. येथेच ‘शिवाजीची तळी‘ नावाची पाण्याची टाकी आहेत. पुन्हा मुळ रस्त्याने निवती किनार्यावर गेल्यास छोटीशी पुळण व त्यावरुन समुद्रात घुसलेला २० फूटी खडक पाहायला मिळतो. याला ‘जुनागड‘ म्हणतात. पुळणीच्या बाजूने त्यावर चढता येते. निवती पासून ८ किमी वरील परूळे गावात वेतोबा मंदीर संकुल आहे. त्यातील प्रमाणबद्ध कोरीव मूर्ती व वीरगळ पहाण्यासारखे आहेत.किल्ला फिरून झाल्यावर लक्षात येते की हा किल्ला समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला आहे.समुद्रावर पोर्तुगीज,डच लोंकाचा होणारा उपद्रव याला प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या किल्याचा जोडीला असे लहान किल्ले बांधले असावेत.सिंधुदुर्ग किल्ला पाहिल्यानंतर शिवप्रेमीनी हा किल्ला आवर्जून पहावा.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
0
Answer link
सोलापूर जिल्ह्यातील ऊजनी धरणात कुगावचा किल्ला सामावला आहे.१९७६ साली धरणात पाणी अडविण्यास सुरूवात झाल्यावर अनेक गावे धरणात गडप झाली,तयात कुगाव या भुईकोट किल्लाचा सामावेश होता.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव हे गावही असेच पाण्याखाली गेले होते. गावातील घरे, रस्ते, पूल, शाळा, मंदिरे अगदी गावातील ४०० वर्षांपूर्वीचा इनामदार संस्थानिकांचा भुईकोट किल्लाही पाण्याच्या उदरात गडप झाला.
उन्हाळ्यात धरणातील पाणी कमी झाले की,याचे दर्शन होते.पण ही स्थिती प्रत्येक वर्षी येईलच असे नाही.माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची टीम म्हणजे आम्ही दोघेच,मी अनिल पाटील व विक्रम धनवडे कुगावला गेलो असता असे समजलेकी,इंदापूरपासून १८ किमी अंतरावरील कळाशी या गावातून जाणाऱ्या नदीच्या पात्रात सुमारे १ ते १.५ कि.मी.अंतरावर हा किल्ला. भीमेच्या पात्रात जलसमाधी मिळालेल्या वास्तूत ऐतिहासिक भुईकोट किल्ला आपल्या खास शैलीमुळे आपली वेगळीच ओळख करून देतो.हैद्राबादच्या निजामाने जिजाबा इनामदार, नागोबा इनामदार, देवराव इनामदार या तीन भावडांना कुगाव हे गाव व त्याच्या पंचक्रोशीतील पाच गावे जहागिरी म्हणून दिली होती. या इनामदार बंधूनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी प्रसिध्द भीमा नदीच्या तीरावर पश्चिमेला हा भुईकोट किल्ला बांधला. ह्या किल्याचा विस्तार सुमारे २.५ एकरात विस्तारलेले असून याच्या चार ही बाजूस सुमारे १५ टे २० फुट रुंदीची व ४० फुट लांबीची भव्य चिरेबंदी तटबंदी उभारलेली दिसत असून चारही दिशेला मोठमोठे वर्तुळाकृती बुरूज असल्याचे निदर्शनात दिसून येते त्यापैकी एक बुरुज आजही चांगल्या स्थितीत आहे.

हनुमानाची जन्मभूमी म्हणून कुगावची ओळख आहे. याबाबतचा ‘भीममहात्म्य’ या पौराणिक ग्रंथातील ३३ व्या अध्यायात उल्लेख आहे.
किल्ल्याला एकूण तीन प्रवेश दरवाजे आहेत.. यातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस उंच मनोरे आहेत.. समोरून पाहताना हे मनोरे एखाद्या मिनारासारखे भासतात.. मुख्य द्वाराशेजारी देवडी असून.. तिला कमान असलेली रुंद खिडकी आहे.. बोटीवरून ६-७ फुट खाली तटबंदी च्या ढासळलेल्या दगडांच्या राशीवर उडी मारून.. गडाच्या भग्न तटबंदीवरून गडावर प्रवेश केला.किल्ल्याला एकूण सहा बुरुज असून, त्याचा आकार साधारण चौरस असा आहे.. उजवीकडे कोपरयात बुरुज आणि गडाचा दुसरा दरवाजा नजरेस पडतो.. मग पुन्हा डावीकडे काटकोनात शेवटपर्यंत जाताच.. एक चोर दरवाजा.. बुरुज.. तलाव आणि मागे एका बेटासारखे दिसणारे मंदिर नजरेस पडते.. इथे एक अर्धवट तुटलेला रांजण नजरेस पडतो.. गडाच्या मध्यभागी वाड्याचे चौथरे नजरेस पडतात.. गडाच्या मध्यभागी .. वाहून आलेली माती भरली आहे.. आणि ठिकठिकाणी पाण्याची डबकी.. त्यातून वाट काढत पुन्हा मुख्य दरवाजा जवळ येवून पोहोचलो.या किल्ल्यातून नदीच्या पात्रापर्यंत भुयारी मार्ग होता. असे म्हणतात.
या किल्ल्याच्या संरक्षक भिंती सुमारे पंधरा फुटांपेक्षा जादा रुंदीच्या आहेत. तसेच चारही बाजूला मोठमोठाले बुरूज होते. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुण्याच्या शनिवारवाड्यापेक्षाही मोठा आहे.
मुख्य दरवाजाच्या डावीकडील खिडकी तून डोकावून पाहिलं.. तर आत देवडी आणि दरवाजाच्या आतील भिंतीचे अवशेष पाहायला मिळाले ..
१९५६ व १९६१ मध्ये भीमा नदीला आलेल्या पुराच्या वेळी संपूर्ण कुगाव व परिसरातील लोकांनी या किल्ल्यात आसरा घेतला होता.''
©माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498