भारताचा इतिहास संभाजी महाराज महाराष्ट्राचा इतिहास

संभाजी महाराजांच्या मुलाविषयी माहिती मिळेल का?

1 उत्तर
1 answers

संभाजी महाराजांच्या मुलाविषयी माहिती मिळेल का?

6
छत्रपती संभाजी महाराजांचे एकमेव पुत्र म्हणजेच छत्रपती शाहू महाराज. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराणी येसूबाई व शाहू महाराजांना नजरकैदेत ठेवले.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की मराठा साम्राज्य हे नेस्तनाबूत होईल. मात्र तसे झाले नाही. राजाराम महाराजांच्या पत्नी राणी ताराबाईंनी मराठा साम्राज्य सांभाळत मुगल साम्राज्याला कडवी झुंज दिली. मराठा साम्राज्य परत उभे राहू लागले. औरंगजेब अस्वस्थ झाला. अशा वेळेस संधी साधावी म्हणून औरंगजेबाने शाहू महाराजांना नजरकैदेतून मुक्त केले. औरंगजेबाला वाटले मराठा साम्राज्य मध्ये आता दुफळी तयार होईल आणि त्याचा फायदा घेऊन आपण मराठा साम्राज्याचा नायनाट करू. मात्र तसे झाले नाही सुटकेनंतर शाहू महाराजांनी सातारा येथून राज्य चालवायला सुरुवात केली आणि कोल्हापूरला राणी ताराबाई व छत्रपती शिवाजी दुसरे(महाराज राजरामांचे पुत्र) यांची गादी सुरू राहिली व दोघांनीही संगनमताने मराठा साम्राज्य पुढे चालू ठेवले.
शाहू महाराज यांच्या दरबारात धनाजी जाधव, पेशवे बाळाजी विश्वनाथ व पेशवे बाजीराव हे धूरंधर योद्धे होते झाले व त्यांनी अखंड भारतभर मराठा साम्राज्याची पताका झळकावली. मराठा साम्राज्य अटकेपार(सध्याचे पाकिस्तान) पोहचले ते छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीतच.
उत्तर लिहिले · 6/3/2021
कर्म · 282915

Related Questions

वसाहत वाद म्हणजे काय?
क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणती चळवळी व आंदोलने केली?
पोर्तुगीजांना नाविक परवाना कुणी दिला?
पेट्रोल इंजिनचा शोध कोणी लावला?
भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटीश इतिहासकार कोणते आहे?
गांधी व जिना यांना किती पत्नी होत्या?
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने?