1 उत्तर
1 answers

अभियंता म्हणजे काय ?

2
     अभियंता  वर तुम्ही अगदी योग्य वेळी प्रश्न विचारला आहे का माहितीये? कारण आज (१५ सप्टेंबर) अभियंता दिवस आहे.

      अभियंता म्हणजे अशी व्यक्ती की जी एखाद्या क्षेत्रामध्ये एखादे साधन किंवा उपकरण, मशीन वापरण्यासाठी कुशल, प्रशिक्षित, पारंगत आहे. अभियांत्रिकी मध्ये बरेच प्रकार येतात जसे की मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकेल इत्यादी.

     अभियंता बनणे काही सोपे काम नाहीये, ४ वर्ष, ८ सेमिस्टर, ४० विषय, ४०० प्रॅक्टिकल्स, ४००० असाइनमेंट, ४०००० तास हे करणे ज्याला जमले तो व्यक्ती म्हणजे अभियंता. अभियंता म्हणजे तो ज्याला जग बदलायचे आहे. अभियंता म्हणजे तो ज्याला नवीन वस्तू बनवायला आवडतात. अभियंता म्हणजे तो ज्याला दुसऱ्याचं जीवन सहज करायला आवडते. अभियंता म्हणजे तो ज्याला निरनिराळे शोध लावायला आवडतात. अभियंता म्हणजे तो ज्याला अशक्य म्हणजे काय ते माहीत नसते. अभियंता म्हणजे तो जो एक गोष्ट करायचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतो.

  


      आज १५ सप्टेंबर ला अभियंता दिन साजरा केला जातो कारण आज भारताचे पहिले अभियंता भारतरत्न सर एम. व्ही. विश्वेश्वरय्या यांची आज जयंती असते. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे इथून सिव्हिल इंजिनीरिंग ची पदवी घेतली होती. सर विश्वेश्वरय्या हे कृष्ण सागर धरण जे की भारतामधील सर्वांत मोठ्या धारणांपैकी एक आहे त्याचे आर्किटेक्ट होते. तसेच ते सिंचन आणि पूर व्यवस्थापन तज्ञ होते. त्यासोबतच ते म्हैसूर चे दिवाण पण होते.

     भारतात दरवर्षी १५ लाखाहून अधिक अभियंता निर्माण होत आहेत. हा आकडा अमेरिका आणि चीन यांच्या देशातील अभियंताच्या आकड्यांची तुलना केली तर त्याहूनही अधिक आहे. सिलिकॉन व्हॅली मधील १६℅ स्टार्टअप चे मालक भारतीय अभियंते आहेत. पण इंजिनीरिंगची एक बाजू पूर्णपणे काळोखात ठेवली जाते ती म्हणजे बेरोजगारी. एक आकड्यानुसार ७५℅अभियंते हे बेरोजगार आहेत. याला बरीच कारणे आहेत कामाची कमतरता, कौशल्याचा अभाव, अयोग्य शिक्षण व्यवस्था.

     आपल्या इथे गलेलठ्ठ पॅकेज च्या आमिषाने मुलांना जबरदस्तीने इंजिनीरिंग ला ऍडमिशन घ्यावे लावतात.  परिणामी ईच्छा नसताना अभियंता बनावे लागते. एवढे करून पण नंतर जॉब भेटत नाही त्यामुळे दुसऱ्या क्षेत्रात जॉब बघावा लागतो यामुळेच आज बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करणारे अभियंतेच आहेत.

     पण ज्यांनी कोणी पण इंजिनीरिंग केली असेल ना त्यांना एक गोष्ट तर नक्की जाणवली असेल की इंजिनीरिंग मध्ये आपण काही शिकलो असेल किंवा नसेल पण इंजिनीरिंग ने आपल्याला आयुष्यं जगायला शिकवलं हे नक्की. आणि अभियंता म्हणून जो एक आम्ही आयुष्यात काहीही करू शकतो हा स्वाभिमान या ४ वर्षांमध्ये येतो ना तो कुठेच भेटत नाही .

      सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐





Happy Engineer's Day!! 😊✌️

उत्तर लिहिले · 15/9/2020
कर्म · 7975

Related Questions

जर मी माझा नावावर घरासाठी लोन काडल , आणि मला उच्च शिक्षण करायला परदेशात जायचं असेल तर मला काही प्रोब्लेम येतील का?
सावित्रीबाई विद्यापीठ कुठे आहे?
मुक्त विद्याीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर llb साठी प्रवेश मिळतो का?
B.sc + B.ed विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहेत?
मला AIIMS नागपूर कॉलेज मध्ये MBBS साठी ऍडमिशन घ्यायचं आहे? पण जर मला 130 ते 200 ते 300 मार्क्स मिळाले तर तिथे मला ऍडमिशन मिळेल का?
मी एमसीव्हीसी हे क्षेत्र निवडले आहे,पण मला पुढे कोणत्या क्षेत्रात जाता येईल?
एमसीव्हीसी म्हणजे काय? त्यामध्ये उत्तम करीअर कोणते आहे?