शेती आंबा लागवड

मला आंबा लागवड करायची आहे माहिती द्या?

1 उत्तर
1 answers

मला आंबा लागवड करायची आहे माहिती द्या?

4
आंबा लागवड
पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यांत आंबा लागवड करताना 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि तीन घमेली शेणखत आणि दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मिश्रणाने भरून ठेवावेत. आंब्याच्या हापूस, केसर, रत्ना, सुवर्णा, साईसुगंध या जाती लागवडीसाठी निवडाव्यात. पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य किंवा शासकीय, कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून आणून लागवड पूर्ण करावी. लागवड करताना कलमांची पिशवी अलगद कापून, मातीच्या हुंडीसह खड्ड्याच्या मध्यभागी लावावे. लागवड करताना कलमांचा जोड जमिनीवर राहील याची काळजी घ्यावी. कलमांना काठीचा आधार द्यावा. हापूस जातीची लागवड करायची असल्यास परागीकरण व उत्पादनाच्या वाढीसाठी 10 ते 15 टक्के झाडे केसर, रत्ना, सिंधू किंवा गोवामानकूर या जातीची कलमे बागेत लावावीत.
उत्तर लिहिले · 15/6/2020
कर्म · 7285

Related Questions

शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी?
सहकारी शेती पध्दती विषयी सविस्तर लिहा.?
शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी कोणत्या?
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे शेती सुधार व सहकारी चळवळी विषयी विचार स्पष्ट करा?
केली पण शेती विनायक पाटील या लेखाचा समारोप?
. ' केली पण शेती ' या लेखातील गांधीजींचे शेती विषयक विचार स्पष्ट करा.?
'केली पण शेती' या लेखाचा आश्रय तुमाया शब्दात लिहा?