छायाचित्रण मोबाईल अँप्स

जुने फोटो स्कॅन करण्यासाठी कोणते अँप वापरावे?

1 उत्तर
1 answers

जुने फोटो स्कॅन करण्यासाठी कोणते अँप वापरावे?

4
🇦  दुर्मिळ आठवणींचा खजिना सांभाळून ठेवायचा असेल तर हे अॅप वापरण्याखेरिज तुमच्याकडे पर्याय नाही!  🇦 

🇦 जीवनातील आनंदी क्षण फोटोंमध्ये कैद करून ठेवण्याची संकल्पनाच किती सुरेख आहे ना! सध्या मोबाईल आणि कॅमेऱ्याच डिजिटल युग आहे त्यामुळे फोटो वर्षानुवर्षे जसे आहेत तसेच राहतात, फक्त डिलीट झाले नाही म्हणजे मिळवलं!
पण अगदी १०-१२ वर्षांपूर्वी देखील आपण फोटोजच्या कॉपीज काढून ठेवायचो. तेव्हा मोबाईल कॅमेरा वैगरे जास्त प्रचलित नव्हता.
आजही या फोटोंकडे पाहताच त्या जुन्या अमुल्य आठवणींना उजाळा मिळतो. म्हणूनच हा फोटोंच्या रूपातील अमुल्य ठेवा आजही प्रत्येकाने सांभाळून ठेवलेला असेल.
पण कधीकधी हे फोटो अधिक काळ पडून राहिल्यास जुने होतात किंवा खराब होतात. मग अश्यावेळेस पुन्हा डिजिटल माध्यमांचा आधार घ्यावा लागतो आणि ते जुने-खराब फोटो डिजिटल करून घ्यावे लागतात. यात खर्च देखील बराच होतो.

🇦 अश्याच सुखद आठवणींचे आणखी काही जुने किंवा खराब फोटो तुम्ही अजूनही जपून ठेवले असतील, तर बॉस तुम्ही अगदी योग्य काम केलं आहे, कारण आता या जुन्या आणि खराब फोटोंना डिजिटल करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे आणि तो देखील अगदी मोफत..!
https://m.facebook.com/story.php?story_fbid=993681481029775&id=100011637976439
गुगलने त्याचं Google Photoscan App लॉन्च केलं आहे. या app च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जुन्या किंवा खराब फोटोंना स्कॅन करून अगदी मिनिटांच्या आता या फोटोंना डिजिटल रूप देऊ शकता.
---------------------------------------
शेअरचॅट https://sharechat.com/post/AgRPXJa?referrer=copiedLink
---------------------------------------
आणि मग हे फोटो अगदी वर्षानुवर्षे जसे आहेत तसेच राहतील.
अर्थात या प्रक्रिया अत्यंत जलद गतीने आणि मोफत होते.
Google Photoscan App वापरण्यासाठी अगदी सोपे आहे.
तुम्ही हवे ते पर्याय निवडून तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या फोटोला नवीन डिजिटल रूप देऊ शकता.
अश्याप्रकारचे अनेक app तुम्हाला प्लेस्टोरवर मिळतील परंतु गुगलने नवीन features add करत अगदी सुधारित app आपल्यासमोर सादर केलं आहे.
या app मध्ये flash चा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजे जर कमी प्रकाश असेल तरी देखील flash च्या सहाय्याने उत्तम qualityचा फोटो स्कॅन होईल.
यात डिजिटल केलेले फोटो तुम्ही थेट गुगल ड्राईव्ह मध्ये save करू शकता, म्हणजे जरी फोनमधून डिलीट झाले तरी तुम्हाला ते परत मिळवता येतील.
     इनमराठी वरून साभार


Related Questions

गुगलवर फोटो कसे अपलोड करावेत?
भारतीय चित्रपट सृष्टीचे मुहूर्तमेढ कोणी रोवली?
कॅमेरा चा शोध कोणी लावला?
मोबाईल चे डिलिट फोटो परत कसे मिळणार?
मोनालिसाचे चित्र कधी पूर्ण झाले ?
अटल बोगदयाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो खरा आहे का?
कलायोगी जी कांबळे यांच्या पेटींगचा रिमेक बद्दल सांगा? फोटो सह?