2 उत्तरे
2
answers
मोनालिसाचे चित्र कधी पूर्ण झाले ?
6
Answer link
मोनालिसा हे एक जगप्रसिद्ध चित्र. इटालियन प्रबोधनकालीन श्रेष्ठ चित्रकार ⇨ लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) याने १५०३ ते १५०५ या कालावधीत हे व्यक्तिचित्र फ्लॉरेन्स येथे रंगविले. ते ला जोकोन्दा या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तिचित्रासाठी बैठक देणारी स्त्री (जन्म १४७९) ही फ्रांचेस्को देल जोकोन्दो या फ्लॉरेन्समधील व्यापाऱ्याची पत्नी (विवाह १४९५) होती व तत्कालीन कलासमीक्षक व्हाझारीच्या मतानुसार, जोकोन्दोनेच आपल्या पत्नीचे व्यक्तिचित्र रंगविण्याचे काम लिओनार्दोकडे सोपविले. कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते. त्याने व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ, खोल, अथांग भाव दर्शविले आहेत, त्याने लक्षावधी रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले. त्यायोगे काळाच्या ओघात उत्तरोत्तर चित्राविषयीचे आकर्षण व लोकप्रियता वाढतच गेली आहे. विशेषतः मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गूढ मंदस्मित, डोळ्यात लपलेली किंचित खिन्नतेची झाक व पार्श्वभूमीदाखलचे काल्पनिक निसर्गदृश्य हे घटक चित्राच्या गूढतेत अधिक भरच घालतात