2 उत्तरे
2
answers
विषाणू आणि जीवाणू यांतील फरक काय?
8
Answer link
विषाणू आणि जीवाणू हे दोन्ही सूक्ष्मजीव आहेत हे आपण पहिले समजून घेतले पाहिज. विषाणू ला इंग्लिश मध्ये व्हायरस म्हणतात तर जिवाणू ला इंग्लिश मध्ये बॅक्टेरिया म्हणतात. विषाणू हा स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करू शकत नाही, तो परावलंबी असतो म्हणूनच तो आपल्या शरीरावर आणि शरीराच्या पेशींवरती आक्रमण करतो. याउलट जिवाणू स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करतो.
विषाणू परावलंबी असल्याकारणाने जवळपास प्रत्येक विषाणू हा शरीरासाठी घातक असतो. या उलट प्रत्येक जिवाणू हा शरीरासाठी घातक नसतो, जसे की पोटामध्ये असलेले काही जिवाणू पचनक्रियेत मदत करतात. आणि आपल्याला विविध जीवनसत्वे मिळवून देण्यास मदत करतात. याउलट विषाणू आपल्या शरीराला कुठलीही मदत करत नाही. मात्र सर्व जिवाणू हे चांगले असतात असे नाही, जसे की काविळीसारखा रोग हा जीवाणूंमुळेच होतो.

1
Answer link
जिवाणू एकपेशीय आणि सजीव असतात. त्यांच्यापाशी जगण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी लागणारी सगळी यंत्रणा असते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र अस्तित्व असतं. जिवाणूंमुळे विषमज्वर, पटकी, धनुर्वात वगैरे रोग होऊ शकतात. त्यांच्यावर प्रतिजैविकांनी (अँटिबायॉटिक्स) इलाज करता येतो.
विषाणूंना सजीव म्हणता येत नाही. त्यांच्यापाशी काही जनुक आणि प्रथिन-मेदाचं पांघरूण इतकीच मालमत्ता असते. अस्तित्वासाठी, ऊर्जेसाठी आणि पुनरुत्पादनासाठी ते इतर जिवांच्या पेशींवर अवलंबून असतात. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसतं. विषाणूंमुळे फ्लू, गोवर, कांजण्या यांसारखे रोग होऊ शकतात. त्यांच्यावर इलाज करायला प्रतिजैविकं चालत नाहीत.