भारत केंद्रशासित प्रदेश

भारतातील नवीन केंद्रशासित प्रदेश त्यांचे क्षेत्रफळ, आणि त्यांच्या सीमा कोणत्या देशाला लागून आहेत त्याबाबत माहीत द्यावी?

1 उत्तर
1 answers

भारतातील नवीन केंद्रशासित प्रदेश त्यांचे क्षेत्रफळ, आणि त्यांच्या सीमा कोणत्या देशाला लागून आहेत त्याबाबत माहीत द्यावी?

6
भारताचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ पासून नव्याने केंद्रशासित प्रदेश म्हणून उदयास आले  जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत.

जम्मू-काश्मीर चे ४२,२४१ वर्गकिमी क्षेत्रफळ हे भारत प्रशासित आहे. आणि १३,२९७ वर्गकिमी क्षेत्रफळ हे पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखले जाते. या जागेला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणून संबोधतो तर भारत याला अजूनही भारताच्या जम्मू-काश्मीरचा अविभाज्य भाग मानत आहे.यावरून अजूनही दोन्ही देशांत वाद चालू आहेत.

जम्मू काश्मीर ची लोकसंख्या १२,२५८,४३३ एवढी आहे.

जम्मू-काश्मीर ला लागून पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान हि राष्ट्रे आहेत.

तर लडाख चे ५९१४६ वर्गकिमी क्षेत्रफळ हे भारत प्रशासित आहे. आणि ७२९७१ वर्गकिमी एवढे क्षेत्र हे पाक प्रशासित गिलगिट-बाल्टीस्तान या प्रदेशात येते. या क्षेत्रावरही भारताने दावा केला आहे की, हे क्षेत्र लडाखचाच भाग आहे. याव्यतिरिक्त लडाखचे ५१८० वर्गकिमी एवढे क्षेत्र हे चीनव्याप्त आहे, जे त्यांनी १९६२ च्या युद्धात व्यापले होते.

लडाख ची लोकसंख्या २,९०,४९२ आहे.

लडाखच्या सीमेला लागून चीन, तिबेट आणि पाकिस्तान हि राष्ट्रे आहेत.

(स्रोत: विकिपीडिया)
उत्तर लिहिले · 29/12/2019
कर्म · 18160

Related Questions

महाराष्ट्रातील कोणते शहर कापड उद्योगाचेे प्रमुख केंद्र आहे?
अनु केंद्र पासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉनिक कवच कोणते आहे?
केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असतात तर मग त्या प्रदेशांना मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री का असतात ? उदा.दिल्ली.
नवीन केंद्रशासित प्रदेश कोणते ?
अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात 5star hotels आहे का? व असल्यास किती?
केंद्रशासित प्रदेश आणि राज्य यात नक्की काय फरक काय?
केंद्रशासित प्रदेश आणि राज्य यामधील फरक काय आहे?