1 उत्तर
1
answers
काश्मिरमध्ये गणपती बसवतात का?
2
Answer link
काश्मीरमधला गणेशोत्सव: श्रीनगरमधल्या लालचौकात 37 वर्षांपासून होतो गणेशोत्सव साजरा ⭕*_
काश्मीर म्हटलं की तणाव, पोलीस, लष्कर हे चित्र नेहमी समोर येतं. पण काश्मीरच्या लाल चौकात अतिशय भक्तिभावाने गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. दहा दिवस अतिशय आनंदोत्सवात गणेशोत्सव साजरा केला जातो.
या उत्सवात काश्मिरी मुस्लीम, पंडित, शीख, बंगाली आणि मराठी माणसांचा मोठा सहभाग असतो. लाल चौकात असलेल्या पंचमुखी मारुती मंदिरात गणेशोत्सवात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गेल्या 37 वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून ही परंपरा असल्याची माहिती श्रीनगरचे अमित वांछो देतात.
गणपती उत्सव हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील महत्त्वाचा उत्सव मानला जातो. मग श्रीनगरमध्ये गणेशोत्सव कसा असा प्रश्न आपल्या पडणं साहजिकच आहे.
*🎗सांगलीतील सूवर्णकारांचा पुढाकार*
सांगली जिल्ह्यातले सोने -चांदीच्या दागिन्यांचे कारागीर गेल्या साठ वर्षांपासून श्रीनगरमध्ये व्यवसायानिमित्त राहतात. लाल चौकातील हरिसिंग हायस्ट्रीटजवळ मोठी सराफ पेठ( ज्वेलरी मार्केट) आहे. याच मार्केटमध्ये मराठी कारागीर सोनं रिफायनींगचं काम करतात.
श्रीनगरसहित संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये जवळजवळ शंभर महाराष्ट्रीयन कुटुंब राहतात. त्यांनीच लाल चौकातल्या हनुमान मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली. गणपती म्हणजे विघ्न दूर करणारा, सुख शांती देणारा, त्यामुळे काश्मीरमध्ये गणपतीचं आगमन आनंद देणारं, चेतना निर्माण करणारं असल्याची भावना अमित वान्छो व्यक्त करतात.
सराफ पेठेतील बहुतांश कारागीर हे सांगली, माण, खटाव, कडेगाव ,पलूस, सांगोला या तालुक्यांमधले आहेत. हे कारागीर वर्षभर काम करतात हिवाळ्यात डिसेंबरअखेरीस महाराष्ट्रात परत येत असतात. यंदा मात्र 370 कलम रद्द झाल्यानंतर अनेक कारागीर वेळेआधीच महाराष्ट्रात परतले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, त्यात सांगलीतील परतलेले कारागीर अतिवृष्टी मुळे संपर्कात नव्हते. अनेकजण पुरात अडकले होते. तसंच काश्मीरमध्ये संपर्क बंद होता. त्यामुळे कोणाचाच संपर्क होत नव्हता.
*🎗पुण्यातून गेली गणेशमूर्ती*
अशा स्थितीमुळे यंदा गणपतीची स्थापना होईल की नाही अशी शंका श्रीनगरमध्ये होती. कारण दरवर्षी मूर्ती महाराष्ट्रातून आणली जायची. यंदा ही परंपरा खंडित होईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
श्रीनगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुण्यातील सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्याशी संपर्क साधला. संजय नहार यांनी मूर्ती महाराष्ट्रातून पाठवण्याच ठरवलं. पुण्यातील बाबू गेणू गणपती मंडळाने ही मूर्ती दिली. सामाजिक कार्यकर्ते काश्मीरचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी ही मूर्ती श्रीनगरला पोहोचवली.
अनेक मराठी कारागिरांना उर्दू बरोबर काश्मिरी भाषा देखील येते. गणेशोत्सवात महाप्रसाद केला जातो. मराठी माणसं वर्गणी काढून गणपती बसवायचे, यंदा मराठी माणसं नसल्याने काश्मिरी मुस्लीम, पंडित, शीख पुढाकार घेऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत.
____________________________