वाहने राज्य परिवहन प्रादेशिक परिवहन कार्यालय

कार किंवा बाईक(दुचाकी)चालवताना हे नियम लक्षात ठेवा?

1 उत्तर
1 answers

कार किंवा बाईक(दुचाकी)चालवताना हे नियम लक्षात ठेवा?

1
*_🚗कार किंवा  🛵बाइक चालवताय? मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच_*

_मोदी सरकारनं लोकसभेत मोटर वाहन कायदा लोकसभेत सादर केलाय. रस्ते अपघाताच्या कारणांना दूर करणं, जे वाहतूक नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करणं यासाठी हा कायदा येतोय. जुन्या मोटर वाहन कायद्यात 88 बदल करून हा नवा कायदा आणला जातोय. जुन्या कायद्यात अपघातात मृत्यू झाला तर 5 लाख रुपये आणि जखमी झाले तर अडीच लाख रुपये मिळतात. आता नव्या कायद्यात काय काय आहे ते पाहा_

*_🚗नव्या कायद्यातले प्रस्ताव_*

◼नव्या कायद्यात दारू पिऊन कार चालवणाऱ्याला दंड 10 हजार रुपये आहे. अगोदर तो 2 हजार रुपये होता.

◼रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही तर 10 हजार रुपये दंड

◼कार चालवताना मोबाइलवर बोलत असाल तर 5 हजार रुपये दंड आहे. अगोदर तो 1 हजार रुपये होता.

◼धोकादायक पद्धतीनं गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड, यापूर्वी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता.

◼ओव्हरलोडिंगवर 20 हजार रुपयांचा दंड

◼सीट बेल्ट न बांधल्यास एक हजार रुपये दंडात्मक कारवाई होईल. पूर्वी तो 100 रुपये होता.

◼रहदारीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास आता 500 रुपयांचा दंड

◼अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन न केल्यास 2 हजार रुपयांचा दंड

◼वाहनांचा अनधिकृतरित्या वापर केल्यास 5 हजार रुपयांचं दंड, पूर्वी तो 500 रुपये होता

◼18 वर्षापेक्षा लहान वयाची व्यक्ती कार चालवत असेल तर कारचा मालक दोषी मानला जाईल. अशा वेळी 25 हजार रुपये दंड आणि 3 वर्षाच्या तुरुंगावासाची तरतूद आहे.

◼लायसन्स किंवा कार रजिस्ट्रेशनसाठी आधार नंबर आवश्यक आहे.

◼लायसन्स संपलं तर तुम्ही नवं लायसन्स  वर्षभराच्या आत बनवू शकता. अगोदर 1 महिन्याच्या आत बनवावं लागायचं.

◼रस्त्याच्या चुकीच्या बांधणीमुळे अपघात झाला, तर ठेकेदारापासून संबंधितांवर कारवाई होईल. सहा महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळेल.

*_📍कारच्या डिझाइनमुळे अपघात झाला, तर सर्व कार्स बाजारातून परत घेतल्या जातील. कारच्या कंपनीला 500 कोटींचा दंड बसू शकतो._*

मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळली. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. साधारण ४० ते ४५ जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असताना पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

🧐 *सावधान! या गोष्टी केल्यास वाहन परवाना होईल जप्त*


🔊 *गाडीत म्युझिक वाजविल्यास* : गाडीमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक लावल्यास होऊ शकतो दंड. आवाजाचा त्रास इतर वाहन चालकांना झाल्यास परवाना होऊ शकतो जप्त.

🚘 *वेग मर्यादा ओलांडल्यास* :  एखाद्या ठिकाणी वेग मर्यादेचा फलक लावलेला असेल आणि तेथील वेग मर्यादा न पाळल्यास परवाना होईल जप्त.

📵 *फोनचा वापर केल्यास* : गाडी चालवताना फोनचा वापर केल्यास दंड भरावा लागतो. चालक नेव्हिगेशन सर्व्हिसशिवाय इतर कोणत्याही कामासाठी मोबाईलचा वापर करू शकत नाही.

💁‍♂ *ब्लूटूथचा वापर केल्यास* :  कार चालवताना बोलण्यासाठी ब्लूट्थचा वापर केल्यास दंडासोबतच ड्रायव्हिंग लायसन्सही जप्त होऊ शकतं.

🧐 *फुटपाथवर गाडी चालवल्यास* : रस्त्यावर ट्राफिक असल्यास अनेकजण फूटपाथवर चालवितात, असे केल्यास वाहन परवाना जप्त होईल.

🚑 *रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास* : अनेकजण रस्त्यावर रुग्णवाहिका आल्यानंतरही तिला जाण्यासाठी रस्ता देत नाहीत असे केल्यास होईल परवाना जप्त.
उत्तर लिहिले · 23/7/2019
कर्म · 569205

Related Questions

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ बाबत माहिती कोणती आहे?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
भारतात प्रादेशिक विकासामध्ये विषमता आढळते भौगोलिक कारणे कोणते आहे?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
भारतात प्रादेशिक विकासामध्ये विषमता का आढळते?
भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेल्या भारतीय जवानांची माहिती मिळवा व त्यावर उपक्रम लिहुन दाखवा?
प्रादेशिक ग्रामीण बँका खालीलपैकी कोणाला कर्जपुरवठा करतात.? * 2 points A) लघु व सीमांत शेतकरी B) भूमिहीन शेतकरी C) ग्रामीण कारागीर D) वरील सर्व