फरक आतंकवाद

आतंकवादी आणि क्रांतिकारक यामध्ये काय फरक आहे ?

1 उत्तर
1 answers

आतंकवादी आणि क्रांतिकारक यामध्ये काय फरक आहे ?

7
काही लोकांना हे उत्तर चुकीचं वाटू शकतं परंतु हे सत्य असू शकत.वरून पाहता आतंकवादी आणि क्रांतिकारी ह्यांच्यात जास्त फरक नाही असे वाटते परंतु एक खूप मोठा फरक आहे तो म्हणजे उद्देश किंवा हेतू.
आतंकवादी तो असतो जो आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंसात्मक गुन्हेगारी कृत्य करतो
आणि
क्रांतिकारी तो असतो जो अत्याचार आणि अन्याय विरुद्ध क्रांती मध्ये सक्रियपणे भाग घेते किंवा अन्याय विरुद्ध क्रांतीसाठी वकिलांची भूमिका असते. (म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध बाजूने उभा राहतो)

जसे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू , चंद्रशेखर आझाद आणि ह्यांच्या सारखे असंख्य लोक जे भारत देशाला  स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते आणि शेवटी त्यांना यश आले. ते आपल्या साठी लडले, त्यांनी आपल्या साठी जीव गमावला त्यांना आपण क्रांतिकारी मानतो, परंतु इंग्रज सरकार त्यांना आतंकवादी म्हणून शिक्षा देत असत.
एवढ्या वरून आपल्याला आतंकवादी आणि क्रांतिकारी यांच्यातील फरक लक्षात येईल अशी अपेक्षा.
उत्तर लिहिले · 21/6/2019
कर्म · 0

Related Questions

क्रांतिकारक आणि आतंकवादी यातील फरक काय?
सोशल मीडियावर अमीरखानचा दहशतवादया बरोबरचा फोटो व्हायरल होत आहे ते खरे आहे का?
आतंकवाद यांचा धर्म कोणता ?
काश्मीरमध्ये नेहमी पाकिस्तानी आतंकी मारले जातात. त्यांच्या मृतदेहांचे काय केले जाते?
दहशतवादी हल्ले का होतीत?
आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणजे काय?
इसिस दहशतवादी संघटना आपला खर्च कशी भागवते?