आंतरराष्ट्रीय संबंध आतंकवाद

आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणजे काय?

3
💣 ⚔   *आंतरराष्ट्रीय दहशतवादी' म्हणजे नेमकं काय?*

⚫   पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं हा भारताचा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयाचा नेमका अर्थ काय आणि त्याला किती महत्त्व आहे

⚫   एखादी व्यक्ती वा संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर संबंधितांच्या विरोधात युनोच्या सर्व सदस्य देशांना स्थानिक पातळीवर एक विशिष्ट यंत्रणा स्थापन करावी लागते. त्या अंतर्गत संबंधित दहशतवाद्यावर टप्प्याटप्प्यानं आर्थिक, प्रवासी व शस्त्रास्त्रांसह विविध प्रकारचे निर्बंध लादले जातात.

💁🏻‍♂  *ज्या देशात आंतरराष्ट्रीय दहशदवादी राहतात त्या काय कारवाई करावी लागते ...?*

📍 मसूद अजहर हा सध्या पाकिस्तानात आहे व पाकच्या आश्रयानंच त्याच्या सर्व दहशतवादी कारवाया सुरू आहेत. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्यामुळं पाकिस्तानवर दबाव वाढतो

📍 पाकिस्तान सरकारला आता मसूद व त्याच्याशी संबंधित व्यक्ती, संघटनांवर कारवाई करणं भाग आहे. त्याच्या पुढाकारानं चालणारे सर्व दहशतवादी प्रशिक्षण तळ, मदरसे व संस्था बंद कराव्या लागणार आहेत.
उत्तर लिहिले · 2/5/2019
कर्म · 569205

Related Questions

क्रांतिकारक आणि आतंकवादी यातील फरक काय?
सोशल मीडियावर अमीरखानचा दहशतवादया बरोबरचा फोटो व्हायरल होत आहे ते खरे आहे का?
आतंकवाद यांचा धर्म कोणता ?
काश्मीरमध्ये नेहमी पाकिस्तानी आतंकी मारले जातात. त्यांच्या मृतदेहांचे काय केले जाते?
दहशतवादी हल्ले का होतीत?
आतंकवादी आणि क्रांतिकारक यामध्ये काय फरक आहे ?
इसिस दहशतवादी संघटना आपला खर्च कशी भागवते?