Topic icon

आतंकवाद

4
क्रांतिकारक समाजात क्रांती किंवा बदल घडवून आणण्यासाठी काम करतात. आतंकवादी समाजात दहशत पसरवतात.
क्रांतिकारकाने केलेले काम हे व्यवस्थेविरोधात बंड पुकारून केलेले असते, तर आतंकवादी हे व्यवस्थेला व कायद्याला वेठीस धरून हिंसा पसरवतात.

क्रांतिकारकाने केलेल्या कार्यातून समाजात चांगले बदल होतात व ते समाजाच्या हिताचे असतात. आतंकवादी नेहमी समाजाचा विघात करतात व हानी पोहोचवतात.
उत्तर लिहिले · 7/12/2020
कर्म · 282915
0
      *️⃣ व्हायरल सत्य *️⃣

▶️  आमीर खानचा दहशतवाद्यांसोबत फोटो नाही, चुकीचा दावा व्हायरल  ◀️
▶️ सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज चुकीचा ◀️
https://bit.ly/3iaHjGY
बाॅलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचा दहशतवाद्यांसोबत फोटो असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
https://bit.ly/3iaHjGY
यात म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आमीर खानने ट्विट देखील केले नाही. त्याचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे ज्यात तो दहशतवादी तारिक जमील आणि जुनैद शमशेद यांची भेट घेत आहे. याशिवाय 15 आॅगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत टर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची मुलाखत घेतली.
▶️ Fact Check / Verification ◀️
आमीर खानने दहशतवाद्यांची खरंच भेट घेतली होती का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला एक ट्विट आढळून आले. ज्यात आमीर खानचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत यात दुसरा फोटो पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीसोबत तर पहिला फोटोत दोन व्यक्ती दिसत आहेत. या दोन व्यक्ती दहशतवादी तारिक जमील आणि जुनैद शमशेद असल्याचे म्हटले आहे.या भारतविरोधी लोकांची भेट आमीर खान घेत असल्याचे म्हटले आहे.
फेसबुकवर देखील हा दावा व्हायरल झाला असल्याचे आढळून आले.
आम्ही आमीर खानचा व्हायरल फोटो नेमका कधीचा आणि कुणासोबतचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स इमेजचा आणि यांडेक्सचा आधार घेतला असता जुनैद जमशेदच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवर व्हायरल फोटो 14 मार्च 2013 रोजी शेअर केल्याचे आढळून आले. जुनैद हे पाकिस्तानी गायक होते त्यांचे 2016 मध्ये विमान अपघातात निधन झाले. जमसेद यांचे नाव व्हायरल ट्विटमध्ये समशेद असे लिहिले आहे. शिवाय आमीर त्यांच्या सोबत असणारी दुसरी व्यक्ती मौलाना तारीक जमील हे असल्याचे म्हटले आहे. ते पाकिस्तानातील धर्म उपदेशक असून इस्लामिक स्काॅलर आहेत. शिवाय अनेक देशांत प्रसिद्ध आहेत.
आम्हाला या दोघांचे दहतवादी कनेक्शन असल्याचे एकही मीडिया रिपोर्ट आढळून आले नाही.
https://bit.ly/3iaHjGY
आमीर खानचा शाहीद आफ्रिदीबरोबरचा फोटो 2012 मधील मक्का यात्रेदरम्यानचा आहे. याबाबत एनडीटीव्ही ने देखील वृत्त दिले होते.
*Conclusion*
यावरुन हेच स्पष्ट होते की, आमीर खानचे जुने फोटो आत्ताचे म्हणून चुकीच्या दाव्याने व्हायरल करण्यात आले आहेत. शिवाय फोटोती व्यक्ती या दहशतवादी नसून गायक व धर्म उपदेशक आहेत.

Result- Misleading
Sources
एनडीटीव्ही- https://sports.ndtv.com/world-cup-2011/shahid-afridi-meets-aamir-khan-in-mecca-while-on-hajj-1546228

इकाॅनाॅमिक टाईम्स- https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/singer-turned-preacher-junaid-jamshed-feared-dead-in-pak-crash/articleshow/55857629.cms

सौजन्य checkthis@newschecker.in
_________________________

3
आतंकवाद हा कोणत्या एका धर्मातून तयार होत नसतो. आणि कोणताच धर्म आतंकवाद पसरवण्याचा संदेश मुळीच देत नाहीत.सगळे धर्म हे शांततेचा संदेश देतात.
उत्तर लिहिले · 6/8/2020
कर्म · 1275
3
बहुतांशी काश्मीरमध्ये मारले गेलेले आतंकवादी हे पाकिस्तानवरून आलेले असतात. पाकिस्तान हे कधीच मान्य करत नाही बघा. बरेचदा आतंकवाद्यांकडे आयएआय चे आयकार्ड सापडते. तसेच काहींकडे पाकिस्तानी असलेल्याचा पुरावा देखील सापडतो. कितीही पुरावे दिले तरी आतंकवादी पाकिस्तान मधून आलेले आहेत असे मान्य न केल्यामुळे ते मृतदेह भारतातच राहतात. नंतर जेव्हा त्याची विल्हेवाट लावायची वेळ येते तेव्हा काश्मीर पोलीस त्या मृतदेहांचे दफन करते बघा. शेवटी ही जबाबदारी पोलिसांची असते त्यामुळे अशा मृतदेहांचे धार्मिक विधीनुसार दफन केले जाते.
उत्तर लिहिले · 7/6/2020
कर्म · 61500
3
 का होतात दहशतवादी हल्ले. 

             *_आता काही दिवस यावर बातम्या, लेख आदी येतील. अतिरेक्यांना धर्म नसतो, असेही सांगितले जाईल. पुन्हा काही दिवसांनी हा स्फोट विस्मरणात जाईल.मूळ प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होईल दुसऱ्या स्फोटापर्यंत. काय आहे मूळ प्रश्न ?_*
*_एखाद्याने वाईट हेतूने दुसऱ्याचे घर जाळले तर त्या माणसाला शिक्षा होऊ नये. कारण काडीपेटीमुळे आग लागली. काडीपेटीला शिक्षा होणे महत्त्वाचे, अशीच भूमिका नेहमी घेतली जाते. कसाब, अफझल गुरु हे केवळ मूळ दहशतवादाचे प्रतिनिधी आहेत. पाकिस्तानात 10 हजार "कसाब' मदरशांमधून प्रशिक्षण घेत आहेत, असे वृत्त अमेरिकेहून प्रसिद्ध झाले होते हे वाचकांना आठवतच असेल._*

*"परिणाम' मोठे असतात आणि "कारण' सूक्ष्म. परिणामांची चर्चा खूप होते, कारणांची नाही. कसाबची खूप चर्चा झाली, मुंबई स्फोटाचीहि  चर्चा झाली. आता दिल्ली स्फोटाचीही खूप चर्चा होईल. परंतु हे अतिरेकी तयार होतात कसे याची चर्चा होत नाही.दहा-दहा हजार "कसाब' तयार होतात, त्यांची प्रेरणा काय?*
*इस्लाम हा शांततेचा धर्म आहे, असे विचारी लोक म्हणतात, परंतु पाकिस्तानातून भारतात येणारे अतिरेकी त्यांना शिकविलेल्या "इस्लाम'साठीच जीवावर उदार होऊन येतात, हे का समजून घेतले जात नाही. आजारच समजला नाही तर उपचार कसे करणारᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* काही दिवसांत अफजल गुरू, कसाबप्रमाणे या स्फोटाचीही चर्चा मागे पडेल. पुन्हा एखादा हल्ला... पुन्हा नवीन कसाब... हे चक्र. हा प्रश्न गेल्या 1200 वर्षांपासून आपल्या देशाला छळत आहे. घौरी-अब्दालीसारख्यांनी हजारोंची कत्तल केली. बाबराने भारतीयांचे श्रद्धाकेंद्र उद्‌ध्वस्त केले. अफजल खानाने तुळजाभवानीवर आघात केला. 1920 साली केरळात मोपल्यांनी केलेल्या नरसंहाराने प्रेते कुजून विहिरी आणि तळ्यांना दुर्गंधी सुटली. 1947 साली लाखो भारतीयांना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले.
या देशाचे तुकडे पडले. हजारोंची कत्तल झाली. संसदेवर हल्ला, अक्षरधामवर हल्ला, संकटमोचन हनुमान मंदिरावर हल्ला,  बंगळूरू, पुणे, मुंबई... दिल्ली या प्रश्नाचे वास्तव स्वरूप आणि तो सुटण्याचा व्यावहारिक मार्ग याचे इतिहासाच्या प्रकाशात आम्ही चिंतन केलेच नाही.
दुसऱ्यांच्या धर्माचा, उपासनापद्धतीचा आदर केलाच पाहिजे, नव्हे तीच आपली संस्कृती आहे, परंतु धर्माचे नाव घेत मानवतेवर घाला घातला जात असेल तर भारताने या स्वयंघोषित धर्मयोद्धयांना यमसदनी पाठविण्याची व्यापक रणनीती आखली पाहिजे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,अफजल गुरूसारख्याला फाशी दिल्याने मुसलमान दुखावतील असे येथील राज्यकर्ते समजत असतील तर तो इस्लामचा अपमान आहे. या अपमानाविरुद्ध त्याच त्वेषाने मुसलमानांनी समोर आले पाहिजे, परंतु हे सारे तेव्हाच वास्तवात येईल जेव्हा दहशतवादाची गटार असलेल्या पाकिस्तानविरोधात आणि आपल्या देशातही जिहादची विषवेल पोसणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलू.भारतीय गुप्तचर खात्यात नव्याने प्राण फुंकले पाहिजे. पोलीस दलालाही अतिरेकी विरोधी कारवायांसाठी प्रभावी प्रशिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. अमेरिकी पोलिसांनी टाईम्स चौकातील बॉंबप्रकरणी काही सेकंदांत विमानतळावर पाकी अतिरेक्याला ताब्यात घेतले. कराचीत जाऊन मशिदीतून अतिरेक्याला जेरबंद केले. अमेरिकेकडून भारतीय पोलिसांनी शिकण्यासारखा हा बिंदू आहे.
अतिरेकीविरोधी जाळे भक्कम करण्यासाठी इस्त्राईलची मदतही घेता येईल. हे सर्व करण्याची जबाबदारी अर्थातच आपल्या राज्यकर्त्यांची आहे.

7
काही लोकांना हे उत्तर चुकीचं वाटू शकतं परंतु हे सत्य असू शकत.वरून पाहता आतंकवादी आणि क्रांतिकारी ह्यांच्यात जास्त फरक नाही असे वाटते परंतु एक खूप मोठा फरक आहे तो म्हणजे उद्देश किंवा हेतू.
आतंकवादी तो असतो जो आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंसात्मक गुन्हेगारी कृत्य करतो
आणि
क्रांतिकारी तो असतो जो अत्याचार आणि अन्याय विरुद्ध क्रांती मध्ये सक्रियपणे भाग घेते किंवा अन्याय विरुद्ध क्रांतीसाठी वकिलांची भूमिका असते. (म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध बाजूने उभा राहतो)

जसे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू , चंद्रशेखर आझाद आणि ह्यांच्या सारखे असंख्य लोक जे भारत देशाला  स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते आणि शेवटी त्यांना यश आले. ते आपल्या साठी लडले, त्यांनी आपल्या साठी जीव गमावला त्यांना आपण क्रांतिकारी मानतो, परंतु इंग्रज सरकार त्यांना आतंकवादी म्हणून शिक्षा देत असत.
एवढ्या वरून आपल्याला आतंकवादी आणि क्रांतिकारी यांच्यातील फरक लक्षात येईल अशी अपेक्षा.
उत्तर लिहिले · 21/6/2019
कर्म · 0