1 उत्तर
1
answers
माणुसकीचे नाते काळानुरुप कशी बदलली आहे?
7
Answer link
नाती
माणूस जेव्हा पत्रावळीवर जेवत होता तेंव्हा तो पाहुण्यांना पाहूनच फुलून जायचा..त्याच्या पाहुण्याच्या स्वागतासाठी कुटुंबासह यजमानांच्या अंगणातली वेलीही फुलून यायची....
काळ बदलला आणि माणूस मातीच्या भांड्यात जेवण करु लागला.. सोबतच नात्यांना मातीसारखेच जपू लागला ..
काळ बदलला आणि माणसानं पितळेची भांडी वापरायला सुरवात केली... तो दर सहा महिन्यांनी नात्यांना कल्हई करु लागला....
काळ बदलला आणि माणसाला काचेची भांडी आवडू लागली.. एखादा छोटासा धक्का किंवा ओरखडा सुध्दा नात्यांना सहन होईना..
काळ बदलला आणि जेवणाची ताटंही प्लॅस्टिक आणि थर्माकोलची झाली... सगळेच नातेसंबंध जणू त्याच्या सारखेच यूज आणि थ्रो होऊ लागले...!
आहे नं खरं..?
विचार करा... या पुढे काय होईल..............?
**************************************
संकलन
आर.एम.डोईफोडे
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, पुणे.
***************************************