प्राणी इतिहास

डायनोसॉरचा इतिहास थोडक्यात सांगा?

3 उत्तरे
3 answers

डायनोसॉरचा इतिहास थोडक्यात सांगा?

30
पृथ्वी वर 23 करोड वर्षा पुर्वी पहिल्या डायनासोरचा जन्म झाला होता • 6,5 करोड वर्षा पुर्वी आखरी डायनासोर मयत पावला , डायनासोरच्या अभ्यासकला पेलिएनटोलाॅजिस्ट असे म्हणतात , डायनासोर पृथ्वीवर 16 करोड वर्ष राहीले , मानवी जीवनाचा डायनासोरच्या जीवन मर्यादाच्या तुलनेत विचार केला तर मानव आज पृथ्वी वर फक्त 0'1% ईतका मानवी रहिवास आहे , डायनासोर ज्या युगात पृथ्वीवर अस्तित्वात होते त्या काळाला मेसोजोईकएरा असे म्हणत होते , डायनासोर पृथ्वीवर जिवंत होते त्याकाळात तीन भागात जीवनमान होते (1)ट्रइऐसिक (2) जुरैसिक (3) क्रिटेशियस , संशोधनात असे आढळून आले कि डायनासोरच्या त्या युगात 2468 प्रजाती होत्या त्यातील काही उडणा-या होत्या , डायनासोर शब्द ग्रीक भाषेतून टेरिबल लिझार्ड मधुन आला या शब्दाचा अर्थ मराठी भाषेत सांगायचं झालं तर मोठी पाल / छिपकली असा होतो , डायनासोर शब्द ब्रिटिश जीवाश्म रिचर्ड ओवेन यांनी 1842 साली दिला होता , गुजरात मधील नर्मदा नदी पाञात 7 करोड वर्षा पुर्वीचे डायनासोर चे आवशेष आढळून आले , संशोधकांचा दावा आहे की डायनासोरची वयोमर्यादा 200 वर्षे होती , पृथ्वीवर DNA कमीत कमी 20 लाख वर्षे जिवंत राहते त्यामुळे डायनासोरच्या आवशेषाची DNA टेस्ट होऊ शकत नाही , जे डायनासोर पाण्याच्या जवळ होते त्याचे चांगले आवशेष मिळाले , डायनासोरच्या काही प्रजाती शाकाहारी होत्या तर काही मांसाहारी होत्या , डायनासोरच्या सर्व प्रजाती अंडी देत होत्या , डायनासोर ऐकदम नष्ट कसे झाले ? पृथ्वीवर 650 करोड वर्षा पुर्वी मॅक्सिगो मधील युकेटीन ब्रायदिप वर ऐक 10 कि,मी वाॅस ऐवढा ऐक उल्का पिंड पृथ्वीशी टक्कर झाली त्या उल्का पिंड च्या टाकरावामुळे पृथ्वीवर 180 चौरस किलोमीटर आणि 120 किलोमीटर खोल ऐवढा खड्डा पडला ती घटना ईतकी महाभयानक होती कि पृथ्वीवर खूप मोठया प्रमाणात शाॅक विज निर्माण झाली होती आणि त्याच्यात . कुञ्या पेक्षा मोठा असणाऱ्या सर्व प्रजाती नष्ट झाल्या ? पृथ्वीवर त्यामुळे अनेक प्रकारचे प्रलय आले त्यात डायनासोर सारख्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या.

           
उत्तर लिहिले · 9/8/2018
कर्म · 17515
2
डायनोसॉरjmpta हे इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे १६ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी; काही द्वीपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनोसॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते.


सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रा दरम्यान डायनोसॉरचा अस्त झाला.


हिंदी महासागरात आफ्रिका खंडाच्या पूर्वकिनाऱ्याच्या लगत असलेल्या मादागास्कर या प्रचंड बेटवजा देशांमध्ये आढळलेल्या डायनॉसॉरसच्या पायांच्या अवशेषावरून, डायनॉसॉरस मांसाहारी होते या कल्पनेला पुष्टी मिळाली आहे.

सुमारे साठ ते पासष्ट लक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर वावरणाऱ्या डायनॉसॉरसना ‘बालाऊर बोंडॉक’ शास्त्रीय संज्ञेने ओळखण्यात येते. पाय उचलून पावला मार्फत जोरदार प्रहार करण्याच्या क्षमता या जीवांमध्ये होती. डाव्या, उजव्या पावलांच्या कडेला वक्राकार नख्या असल्याने भक्ष्याला रक्तबंबाळ करून खाणे शक्य होते.

बालाऊर बोंडॉक या प्रकारच्या डायनोसॉरचे अवशेष उत्तर कॅनडा, रोमेनिया, ऑस्ट्रिया या देशांमध्येही सापडले आहेत. त्यामुळे त्यांचा वावर शीत कटिबंधातील प्रदेशात होता असे मानले जाते. भक्ष्यांची संख्या कमी कमी होत राहिल्याने उपासमार, शिकार करण्यासाठी प्रचंड भटकंती इत्यादी कारणांमुळे डायनोसॉर पृथ्वीवरून सुमारे तीस दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झाले असावेत असे मानणारे काही विचार प्रवाह आहेत.


आशिया, आफ्रिका युरोप व उत्तर अमेरिका खंडात सापडलेले जीवाश्म, अंडी, सांगाडे आणि इतरही माहिती यांचे आधारे इतिहासाचे दर्शन होते.
उत्तर लिहिले · 12/10/2020
कर्म · 6750
0

डायनोसॉरचा इतिहास: थोडक्यात

सुरुवात: डायनोसॉर सुमारे 23 कोटी वर्षांपूर्वी 'ट्रायसिक' युगात पृथ्वीवर आले.

विकास आणि विस्तार: 'जुरासिक' आणि ' Cretaceous' युगांमध्ये डायनोसॉरची वाढ झाली आणि ते पृथ्वीवर सर्वत्र पसरले. विविध प्रकारचे डायनोसॉर निर्माण झाले, काही खूप मोठे होते तर काही लहान.

विनाश: सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एका मोठ्या नैसर्गिक संकटामुळे (meteor strike) डायनोसॉर नष्ट झाले.

उत्क्रांती: शास्त्रज्ञांचे मत आहे की काही डायनोसॉर पक्ष्यांमध्ये उत्क्रांत झाले.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 860

Related Questions

मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
डायनासोरचे हात आखूड का होते?
असा कोणता प्राणी आहे की जो जन्मापासून ते त्याच्या मृत्यू पर्यंत झोपत नाही?
अथवा कोणी प्राणी येऊनि तयांना म्हणती छेडू नका?
महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानांची नावे, विभाग, स्थळ, जिल्हा, सर्वसाधारण माहिती, तेथील पशू, प्राणी, फुले आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगा.
महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानांची माहिती मिळवून त्यांची नावे, स्थळ, विभाग, जिल्हा, सर्वसाधारण पशू, प्राणी आणि फुले यांची वैशिष्ट्ये सादर करा.
द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी कोणते?