गडदुर्ग

सह्याद्री डोंगर रांगा विषयी माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

सह्याद्री डोंगर रांगा विषयी माहिती मिळेल का?

10
सह्याद्री

सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्‍याशेजारी असलेली अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगराची रांगआहे. ही रांग गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ पोचते.

हा लेख महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या भारतातीलराज्यांमधून पसरलेली सह्याद्री डोंगररांग

सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगराची रांगआहे. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्यासीमेशेजारी चालू होते आणि अंदाजे १६०० किलोमीटरलांबीची ही डोंगररांग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.[१]

सह्याद्री
सह्याद्री

पश्चिम घाटदेशभारतराज्यमहाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूसर्वोच्च_शिखरअनाई मुदी शिखरलांबी१६०० कि.मी.रूंदी१०० कि.मी.क्षेत्रफळ६०,००० वर्ग कि.मी.प्रकारबसाल्ट खडक

सह्याद्री डोंगररांग ही भारताच्या पश्चिम तटाशेजारी उभी आहे.


या डोंगररांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे [२]. अनेक उंच शिखरे ही डोंगररांग सामावून घेते, त्यामध्ये डोंगररांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी),( साल्हेर १५६७ मी )महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मीटर). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. या डोंगररांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे हा तमिळनाडू आणि केरळ यांना जोडतो.. इथे सह्याद्रीची सर्वात कमी उंची आहे (३०० मी).

पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधताअसणार्‍या आठ जागांपैकी एक आहे. सह्याद्रीवर सरीसृपांच्या १८७ पेक्षा जास्त जाती आहेत, त्यातल्या निम्म्या फक्त इथेच सापडतात; बेडकांच्या शंभर जाती आहेत, त्यातल्या ऐंशी केवळ इथे आढळतात. त्यातही वृक्षमंडूकांच्या ३५ जातींपैकी २९ निव्वळ सह्यवासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाईबंद आहेत, त्यांच्या २२ जातींपैकी २० येथेच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व ४५ जाती फक्त सह्याद्री व श्रीलंकावासी आहेत, आणि त्यातल्या ३४ केवळ सह्याद्रीत सापडतात. अर्वाचिनांपैकी सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीवरच्या ४००० जातींपैकी १४०० सह्याद्रीपुरत्या सीमित आहेत. त्यांच्यातही तेरड्यांच्या ८६ पैकी ७६ जाती पूर्णतः सह्यवासी आहेत. इथे ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.[३]

शिखरेसंपादन करा

सह्याद्री रांग उत्तरेला सातपुडा रांगेपासूनसुरू होते. नंतर दक्षिणेला गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तमिळनाडूराज्यामध्ये पसरलेली आहे. यातील मुख्य रांग म्हणजे सह्याद्री. सह्याद्री रांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागू इत्यादी थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. निलगिरी रांग, बिलिगिरिरंगन रांग, सेल्व्हराजन रांगआणि तिरुमला रांग इत्यादी काही छोट्या रांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात.

कळसूबाई शिखर

काही छोट्या रांगा उदा० कार्डमम रांग व निलगिरी रांग, या तमिळनाडू राज्याच्या वायव्य क्षेत्रात आहेत. निलगिरी रांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या रांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई रांगे मध्ये अनाई मुदी (२त,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासुर शिखर(२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी शिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मधोमध गोवा खिंड आहे व दुसरी पालघाट खिंड. ही निलगिरी व अनामलाई रांगांच्या मधे आहे.

पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्रा देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात.

पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाऊस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्यात स्वरुपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा खूप जास्त पाऊस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या इथेच उगम पावतात.

उत्तर लिहिले · 23/7/2018
कर्म · 10865
0

सह्याद्री डोंगर रांगा

सह्याद्री, ज्याला पश्चिम घाट म्हणूनही ओळखले जाते, ही भारताच्या पश्चिम बाजूकडील पर्वतांची एक लांब साखळी आहे.

सह्याद्री पर्वताची माहिती:

  • लांबी: सुमारे १,६०० किलोमीटर (९९० मैल).
  • विस्तार: तापी नदीच्या दक्षिणेस गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमेपासून सुरू होऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांतून जाते.
  • सरासरी उंची: १,२०० मीटर (३,९०० फूट).
  • सर्वात उंच शिखर: अनाई मुडी (Anai Mudi), २,६९५ मीटर (८,८४२ फूट), केरळमध्ये आहे.

महत्व:

  • नद्यांचे उगमस्थान: गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या अनेक मोठ्या नद्यांचा उगम सह्याद्रीमध्ये होतो.
  • जैवविविधता: सह्याद्री जैवविविधतेने नटलेला आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी येथे आढळतात.
  • UNESCO जागतिक वारसा स्थळ: सह्याद्रीला UNESCO ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
  • पर्यटन: अनेक सुंदर पर्वतीय स्थळे, अभयारण्ये आणि ऐतिहासिक किल्ले येथे असल्यामुळे पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

सह्याद्रीतील काही महत्त्वाची ठिकाणे:

  • महाबळेश्वर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्वतीय स्थळ.
  • माथेरान: महाराष्ट्रातील एक सुंदर डोंगराळ भाग.
  • लोणावळा-खंडाळा: मुंबई-पुणे मार्गावर असलेले लोकप्रिय ठिकाण.
  • अंबोली: महाराष्ट्रातील एक शांत ठिकाण, जिथे खूप पाऊस पडतो.
  • मुन्नार: केरळमधील चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध.

सह्याद्री पर्वत भारताच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 840

Related Questions

गडाचे रक्षण करणे का महत्त्वाचे आहे?
रायगडावरील जगदीश्वर मंदिराचे पुरातन नाव काय?
शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
शिवगड बद्दल माहिती द्या?
निवतीचा किल्ला बद्दल माहिती दया?
कुगावचा किल्ला बद्दल माहिती दया?
प्राचीन मान बद्दल माहिती द्यावी?