आजार टाचदुखीवर उपाय आरोग्य

माझा आई ची टाच खूप पेन होते काय उपाय?

1 उत्तर
1 answers

माझा आई ची टाच खूप पेन होते काय उपाय?

4
 टाचेचं दुखणं......

http://bit.ly/335NuG6




____________________________
 माहिती सेवा गृप पेठवड़गाव ____________________________
 सकाळी उठल्यानंतर हा टाचदुखीचा त्रास सुरू होतो. हळूहळू मग बसता-उठतानाही टाचांचे दुखणे वाढायला लागते. हा आजार हाडांशी संबंधित आहे. या आजारात अनेकदा घरगुती उपाय केले जातात; परंतु बराच काळ त्रस्त करणारे हे दुखणे वाढले, की मग त्यांची गंभीरता लक्षात यायला लागते.
*⚡टाचेच्या या दुखण्यामागे नेमकं कारण काय?*
आपण जेव्हा उभे असतो, तेव्हा आपले गुडघे आणि पावले यांच्यावर आपल्या संपूर्ण वजनाचा भार पडत असतो. वर्षानुवर्षे हा भार पेलता यावा यासाठी निसर्गाने आपल्या पायाचे तळव्यांची रचना किंचित वक्राकार ठेवली आहे. आपल्या टाचेच्या हाडापासून ते चवड्यापर्यंत एक जाडसर स्नायूचा पडदा ताणून बसविलेला असतो, त्यालाच प्लान्टर फेशिआ असे म्हणतात. या रचनेमुळे एखाद्या स्प्रिंग अथवा सस्पेन्शन सारखे काम या पडद्याकडून होते व आपल्या वजनाचा आपल्या पावलावर पडणारा भार हलका होण्यात मदत होते. खाच खळग्यातुन चालताना होणारी पावलाची वेडीवाकडी हालचालही या रचनेमुळे सुकर होते. असे असले, तरी त्या स्नायूच्या भार पेलण्याला काही मर्यादा आहेत. त्यावर नियमितपणे जास्त भार, दाब अथवा ताण पडत राहिला किंवा काही कारणाने त्याला इजा झाली तर या स्नायूच्या टाचेच्या बाजूच्या भागाला सूज येऊ लागते. यालाच वैद्यकीय भाषेत ‘प्लान्टर फेशिआयटीस’ असे म्हणतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या आजाराची लक्षणं म्हणजे टाचेत आणि तळव्याच्या मधल्या भागात वेदना जाणवतात. दुखण्यामुळे सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय टेकवताना त्रास होतो. जास्त वेळ बसून राहिल्यावर उठताना पंजा जमिनीवर टेकवताना टाच दुखते, मात्र थोडी पावलं चालल्यावर त्या वेदना कमी होतात.
📍कडक इन्सोलच्या बुटांमुळे किंवा सॅण्डल्समुळे पंजा आणि टाचा दुखतात. .
📍 फुटवेयरला व्यवस्थित हिल सपोर्ट नसल्यामुळे पंजा आणि टाचा दुखतात.
📍 उंच टाचेच्या चपला दीर्घकाळ वापरल्यामुळे पंजा आणि टाचा दुखतात.
📍 फ्लॅट फूट म्हणजे सपाट पाय असल्यास फेशिया सतत दुखावतो आणि टाच दुखते.
📍 पायाचे स्नायू टाइट असल्यामुळेही पंजा आणि टाचा दुखतात.
📍 ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं. अशा लोकांमधे टाचेचं नॅचरल कुशन आकसलं जातं आणि भार सहन करण्याची क्षमता कमी होते.
📍जास्त वजन असणाऱ्या लोकांनाही हा आजार होण्याचा धोका असतो.
आतून हाड वाढायला सुरुवात होते आणि मग टाच अजून जास्त दुखायला लागते. जर अधूनमधून पायांचं दुखणं जाणवत असेल तर तुमचे पाय विशेषत: पंजे तपासून घ्या. त्यानुसार ट्रीटमेण्ट करा. शूजमधे योग्य ते बदल करा. उदा. शूजमधे वॅलगस पॅड किंवा मिडिअल वेज वापरल्यास दुखण्यात बराच फरक जाणवतो. ज्यांचे पाय सपाट असतात अशा लोकांना भविष्यात पायाचा आणि गुडघ्याचा त्रास होण्याची शक्यता असते. .
*हे लक्षात ठेवा*
📍टाच १५-२० मिनिट बर्फाने शेका.
📍 जास्त वेळ उभं राहणं टाळा. त्रास जास्त असल्यास जॉगिंग, धावणं टाळा.
📍 शूजमधे हिल कप्स किंवा स्कूप्ड हिल्सचा वापर करा.
📍बेडवरून खाली उतरायच्या आधी पंजे वर-खाली करा. नंतर खाली उतरून बोटांवर उभा राहा. असं ८-१० वेळा करा. म्हणजे सकाळी पाय जमिनीवर नीट ठेवता येतील. 
*याशियावय इतर उपचार कोणते कराल?*
http://bit.ly/335NuG6
📍टाच दुखत असल्यास त्यावर रोज कोमट तीळ तेलाची पाच ते दहा मिनिटं धार धरावी. अतिकडक व सपाट चप्पल न वापरता मऊ व साधारणत: १ ते १.५ इंच उंच चप्पल वापरावी.
कुठलाही आजाराची वेळीच दखल घेतली, तर तो बरा होऊ शकतो. म्हणून दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.
*घरगुती उपाय*
टाचा दुखत असताना उकळलेले गरमच पाणी प्यायल्याने निश्चित उपयोग होतो. या व्यक्तींनी गाईचे दूध घेतल्यास बरे वाटते. दह्य़ामध्ये काळी मिरी टाकून दिवसा त्याचे सेवन करावे. ताकात आले, ओवा घालून घेतल्यानेही फायदा होतो. गहू, ज्वारी, तांबडी साल असलेला हातसडीच्या तांदळाचा आहारात समावेश करावा. स्थूल व्यक्तींना टाच दुखण्याचा त्रास होत असल्यास आहारात नाचणीचे पदार्थ खावेत. तिळाचे विविध पदार्थही टाचदुखी कमी करण्यास मदत करतात. म्हणून तिळाची चटणी नियमित आहारात घ्यावी, त्यामध्ये खोबरेल तेल वा गोडे तेल घालून घेतल्यास उत्तम! जेवणात मूग आणि कुळथाचा वापर अधिक प्रमाणात करावा. लसूण घालून फोडणी कुळथाची पिठी ही उपयोगी ठरते. या आजारात मधाचाही वापर करणे गुणकारी असते. हिरडय़ाच्या झाडावरील मध अधिक चांगली असून दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्यास आराम पडतो. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायल्यास टाचदुखी बरी होण्यास मदत होते. कोबी, भेंडी, पडवळ, सुरण, तोंडली या फळभाज्या या आजारात खाव्यात. 
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498

Related Questions

Cervical spondylitis मुळे हाताची बोटे दुखत असल्यास दुखणाऱ्या बोटांसाठी काय उपाय करावा?
माझ्या आईच्या पायाची टाच खुप दुखते कोणत्या तज्ञ डॉक्टर कडे घेऊन जायला हवे?
टाचदुखी वर उपाय आहे काय?
माझ्या वडिलांची टाच नेहमी दुखत असते तर त्यावर उपाय सांगा ?