बँक इंटरनेट बँकिंग अकॉउंटिंग

Recurring Deposit बद्दल सविस्तर माहिती मिळेल का ?

2 उत्तरे
2 answers

Recurring Deposit बद्दल सविस्तर माहिती मिळेल का ?

10
आवर्ती मुदत ठेव

आवर्ती मुदत ठेव हे एक विशेष प्रकारचे खाते आहे, ज्यात ठेवीदार, विशेषतः ठराविक उत्पन्न असलेले खातेदार एका निश्चित कालावधीदरम्यान दरमहा एक ठराविक रक्कम टाकू शकतो. याप्रकारच्या खात्यातील ठेवींवर तिमाही तत्त्वावर चक्रवाढ व्याज देण्यात येते. नियमांच्या अधीन राहून, जितक्या जास्त महिन्यांकरता ठेवी ठेवणे मान्य केले जाईल तेवढा व्याजदर जास्त असेल. 

या प्रकारच्या खात्यांकरता KYC ची पूर्तता आवश्यक आहे, त्यामुळे ठेवीदाराचे ओळख व निवास पुरावे, तसेच ताजा फोटो आवश्यक आहे. 

खात्यांचे प्रकार

या योजनेअंतर्गत फक्त एकट्या व्यक्तीच खाते सुरू करू शकतात. 
त्यामुळे आवर्ती मुदत ठेव खाती खालील नावांनी सुरू करता येऊ शकतील – 
एक व्यक्ती वा एकल खातेदोन वा अधिक व्यक्ती –जोड खातेअशिक्षित व्यक्तीअंध व्यक्तीअज्ञान मुलेखाते सुरू करणे 

तिमाही तत्त्वावर चक्रवाढ व्याज देण्यात येणारे आवर्ती मुदत ठेव खाते फक्त तीनच्या पटीतील महिन्यांच्या संख्येकरता स्वीकारले जाईल व कमाल कालावधी 10 वर्षे असेल. 

मासिक हप्त्याची किमान रक्कम 

आवर्ती ठेवी समान रकमेच्या मासिक हप्त्यांमध्ये असतील. मेट्रो व शहरी भागांमध्ये मूळ मासिक हप्त्याची रक्कम किमान रू. 500/- व त्याच्या पटीत तर ग्रामीण व निमशहरी भागांमध्ये रू. 100/- व त्यापेक्षा अधिक व त्याच्या पटीत असेल. याला कमाल मर्यादा नाही. 

कुठल्याही कॅलेंडर महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या कामकाजी दिवशी वा तत्पूर्वी भरणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास थकित हप्त्यांवर खालीलप्रमाणे दराने दंड आकारण्यात येईल – 
5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींकरता प्रत्येक रू. 100/- द.म. वर रू. 1.50/-5 वर्षांवरील कालावधीच्या ठेवींकरता प्रत्येक रू. 100/- द.म. वर रू. 2.00/-हप्ते आगाऊ भरले जात असतील, तर आगाऊ भरलेल्या हप्त्यांची संख्या समान असल्यास प्रलंबित हप्त्यांना दंड आकारणे बँक माफ करू शकते. 

या खात्यांना TDS लागू नाही 

व्याजदरः कालावधी व अंतिम तारखेनुसार मुदतठेवींना लागू असणारा व्याजदर. ठेव तीन महिन्यांच्या आत परत घेतल्यास व्याज दिले जाणार नाही. 
उत्तर लिहिले · 22/6/2018
कर्म · 4295
2
_💁 *जाणून घ्या Recurring Deposit बद्दल सविस्तर माहिती*_


_💫आवर्ती मुदत ठेव हे एक विशेष प्रकारचे खाते आहे, ज्यात ठेवीदार, विशेषतः ठराविक उत्पन्न असलेले खातेदार एका निश्चित कालावधीदरम्यान दरमहा एक ठराविक रक्कम टाकू शकतो._

_✔याप्रकारच्या खात्यातील ठेवींवर तिमाही तत्त्वावर चक्रवाढ व्याज देण्यात येते. नियमांच्या अधीन राहून, जितक्या जास्त महिन्यांकरता ठेवी ठेवणे मान्य केले जाईल तेवढा व्याजदर जास्त असेल._

_👉या प्रकारच्या खात्यांकरता KYC ची पूर्तता आवश्यक आहे, त्यामुळे ठेवीदाराचे ओळख व निवास पुरावे, तसेच ताजा फोटो आवश्यक आहे._

_▪या योजनेअंतर्गत फक्त एकट्या व्यक्तीच खाते सुरू करू शकतात.  त्यामुळे आवर्ती मुदत ठेव खाती खालील नावांनी सुरू करता येऊ शकतील :_
_▪एक व्यक्ती वा एकल खाते_
_▪दोन वा अधिक व्यक्ती –जोड खाते_

_▪तिमाही तत्त्वावर चक्रवाढ व्याज देण्यात येणारे आवर्ती मुदत ठेव खाते फक्त तीनच्या पटीतील महिन्यांच्या संख्येकरता स्वीकारले जाईल व कमाल कालावधी 10 वर्षे असेल._

_🧐 *मासिक हप्त्याची किमान रक्कम :*_

_👉आवर्ती ठेवी समान रकमेच्या मासिक हप्त्यांमध्ये असतील. मेट्रो व शहरी भागांमध्ये मूळ मासिक हप्त्याची रक्कम किमान रू. 500/- व त्याच्या पटीत तर ग्रामीण व निमशहरी भागांमध्ये रू. 100/- व त्यापेक्षा अधिक व त्याच्या पटीत असेल. याला कमाल मर्यादा नाही._

_📌 *कुठल्याही कॅलेंडर महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या कामकाजी दिवशी वा तत्पूर्वी भरणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास थकित हप्त्यांवर खालीलप्रमाणे दराने दंड आकारण्यात येईल :*_

_● 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींकरता प्रत्येक रू. 100/- द.म. वर रू. 1.50/- ● 5 वर्षांवरील कालावधीच्या ठेवींकरता प्रत्येक रू. 100/- द.म. वर रू. 2.00/-_

_👉हप्ते आगाऊ भरले जात असतील, तर आगाऊ भरलेल्या हप्त्यांची संख्या समान असल्यास प्रलंबित हप्त्यांना दंड आकारणे बँक माफ करू शकते._

_✔या खात्यांना TDS लागू नाही_

_🔸व्याजदरः कालावधी व अंतिम तारखेनुसार मुदतठेवींना लागू असणारा व्याजदर. ठेव तीन महिन्यांच्या आत परत घेतल्यास व्याज दिले जाणार नाही._
उत्तर लिहिले · 14/9/2019
कर्म · 569205

Related Questions

व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
मला टॅली कोर्स करायचा आहे, तर आता सध्या प्रवेश घेता येईल का?
अकाउंट म्हणजे काय,त्याचे फायदे/तोटे काय आहेत ?
मी 12 वी कॉमर्समध्ये शिकत आहे मी अकाउंटमध्ये टॉपर आहे मला अकाउंटमध्ये रस आहे पण माझे इंग्लिश फार कच्चे आहे तर 12 वी नंतर मी पुढे शिक्षण घेऊ का आणि पुढे शिक्षण घेतल्यावर उपयोग आहे का ?
Nationalalys बँकांमध्ये 0 balance वरती जनधन खाते खोलता येईल का?
माझ्या PF अकाऊंटवर दोन पासबुक दाखवतात एक जुने आहे मी तिथे आता काम करत नाही आणि दुसरे मी सध्या जिथे काम करत आहे तिथले तर मला माझा जुना PF काढून हवा त्यासाठी काय करावे लागेल ?
मी SY B.com ला आहे आर्थीक परिस्थिती नसल्यामुळे माझा कोणताही कोर्से झाला नाही जर मला लवकर जॉब मिळवण्यासाठी काय करू bank?