शिक्षण अकॉउंटिंग ई-कॉमर्स

मी 12 वी कॉमर्समध्ये शिकत आहे मी अकाउंटमध्ये टॉपर आहे मला अकाउंटमध्ये रस आहे पण माझे इंग्लिश फार कच्चे आहे तर 12 वी नंतर मी पुढे शिक्षण घेऊ का आणि पुढे शिक्षण घेतल्यावर उपयोग आहे का ?

5 उत्तरे
5 answers

मी 12 वी कॉमर्समध्ये शिकत आहे मी अकाउंटमध्ये टॉपर आहे मला अकाउंटमध्ये रस आहे पण माझे इंग्लिश फार कच्चे आहे तर 12 वी नंतर मी पुढे शिक्षण घेऊ का आणि पुढे शिक्षण घेतल्यावर उपयोग आहे का ?

10
sorry, या बद्दल मला काहीही माहीत नाही कारण की मे आर्ट घेतले आहे आणि सध्या मी अकरावीमध्ये शिकत आहे..
उत्तर लिहिले · 29/1/2019
कर्म · 39105
6
  जे शिकतात त्यांच्यासाठी नक्कीच उपयोगी:

मित्रा main पायाच कच्चा आहे तुझा. तुला जर घर बांधायचे असेल तर तू काय करशील? पाया भक्कम करशील ना......मग करियरच सुद्धा असच असतं बेसिक गोष्टी खूप महत्वाच्या असतात आधी ते solve करून घे आणि मगच पुढचे पाऊल टाक आधीच जर टाकलास तर मग नक्कीच आपटून पडशील so be careful.

आपण उगाच भली मोठी स्वप्ने बघत असतो आणि ती स्वप्ने पूर्ण करायला खूप मेहनत, चिकाटी, संयम या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत रे मित्रा फक्त स्वप्न बघून काही होत नसत काही काळासाठी चांगलं वाटतं पण नंतर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात कारण आपण फक्त imagine करत असतो real मध्ये नसतं. स्वप्न हे एक मृगजळासारख असत दिसतं पण तसं नसतं. त्यामुळे आधी स्वतःला ओळख की मी काय करू शकतो, मी असं नाही म्हणणार की तू खूप कमी आहेस मुळात कोणीच कमी नसतं सगळ्याला समान बुद्धी असते फक्त त्याचा योग्य रीतीने ते वापर करत नाहीत स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजेच स्वतःला ते खूप कमी समजतात आपल्याला काहीच येत नाही, नकारात्मक विचार करणे आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांचं भविष्य अंधारात जातं. त्यामुळे positive राहणे खूप महत्वाचे असते.

आता तू b.com करत आहेस आणि तू म्हणालास की माझी इंग्लिश कच्ची आहे कच्ची आहे म्हणजे नक्की काय इंग्लिश वाचता येते, इंग्लिश एक भाषा आहे, थोडीफार इंग्लिश कळते मग झालंच तर फक्त आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे आणि त्यासाठी थोडीफार मेहनत घ्यावीच लागते तरच ती गोष्ट येते इंग्लिश newspaper वाचणे, शब्द पाठ करणे, english news बघणे आणि त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करणे म्हणजे इंग्लिश बोलणे चुकलं तरी हरकत नाही pratical खूप महत्त्वाचं असतं हीच गोष्ट म्हणून नाही तर कोणतीही गोष्ट करताना.

b. com करून तू CA होऊ शकतोस किंवा 12 वी नंतर upsc ची तयारी करू शकतोस माझ्या भावाचं सुद्धा 12 वी झाली आहे आणि तो b. com करत आहे आणि तो upsc ची तयारी करतोय. तुला CA व्हायचं असेल तर cpt ची एक्साम द्यावी लागेल आणि त्यात 100 मार्क्स च्या वर पडले पाहिजेत नाही पडले तर मग डिसेंबर मध्ये सुद्धा देऊ शकतोस. आणि हो एक सांगेन या एक्साम crack करणं अवघड असतं मी असं नाही म्हणनार की होणार नाही होत पण त्यासाठी जिद्द लागते. आता बघ एखादी गोष्ट तुला आवडली आहे तू ते करशीलच कसल्याही परिस्थितीत आणि मिळवशील देखील तसंच याचं आहे जोपर्यंत आवड आणि जिद्द येणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि मग तू म्हणशील की ही आवड आणि जिद्द कशी आणि कोठून मिळणार ते मिळतं आता बघ एक तुझा मित्र किंवा कोणताही व्यक्ती अचानक ठरवतो की मला IAS व्हायचं आहे आणि ते तुम्हला कळत पण त्याला ही धमक येते कुठून तर तो एका अधिकाऱ्याला बघितलेला असतो त्याचा रुबाब, त्याचं लाल बत्तीच्या गाडीतून येणं, गाडीचा दरवाजा काढण्यासाठी सुद्धा माणसं असणं, दुसरे त्याला सॅल्युट करणं इ. गोष्टी त्याला इतक्या भावतात की तो ठरवतोच की मला IAS व्हायचं आहे आणि तो खूप मेहनत करतो, त्याचं लक्ष फक्त त्याच्या ध्येयाकडे असतं, आपल्याला हे व्हायचं आहेच, आपल्याला हे करायचं आहेच, माझी स्वप्न पूर्ण करायची आहेतच, आणि IAS झाल्यामुळे माझंच नाव नाहीतर माझ्या आई-बाबा चं नाव सुद्धा मोठं होणार आहे या आशेने तो IAS होतो. हे कशामुळे होतं हे तुम्हला समजलं असेलच. अश्या गोष्टीमुळे जिद्द येते आणि जिद्द आली की आवड ही आलीच ना.....हे उपाय सांगितले.

पण मला तर वाटतं की तू b.com करून MBA कर आणि तेही चांगला स्कोर करून जेवढा चांगला स्कोर आणि जेवढा चांगला इंटरव्ह्यू देशील तितकं तुला चांगलं. त्यासोबतच तुझं शरीर चांगलं ठेव म्हणजेच व्यायाम करणं इ.

आता बाकी तुझा निर्णय. शेवटी तुलाच करायचं आहे. Hmm पण एक सांगेन तू जर गरीब होऊन जन्माला आलास तर त्यात तुझी चुकी नाही पण मरताना गरीब होऊन मेलास तर नक्कीच त्यात तुझी चुकी असणार बघ.......

धन्यवाद😊😊😊




उत्तर लिहिले · 7/2/2019
कर्म · 21615
4
तुम्ही आधी इंग्रजी क्लासेस ला जा, क्लासेस झाल्यानंतर मग तुम्हाला परफेक्ट इंग्रजी बोलता येईल. तसेच तुम्हाला पुढचे शिक्षांसुधा करता येईल.
मी सध्या 11 वी Science ला आहे,मला जेवढी माहिती माहीत होती तेवढी मी सांगितली तरी माझ्या मते तुम्हला पुढचे शिक्षण करायला पाहिजे, पुढे तुमची मर्जी !
उत्तर लिहिले · 29/1/2019
कर्म · 95

Related Questions

व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
मला टॅली कोर्स करायचा आहे, तर आता सध्या प्रवेश घेता येईल का?
अकाउंट म्हणजे काय,त्याचे फायदे/तोटे काय आहेत ?
Nationalalys बँकांमध्ये 0 balance वरती जनधन खाते खोलता येईल का?
माझ्या PF अकाऊंटवर दोन पासबुक दाखवतात एक जुने आहे मी तिथे आता काम करत नाही आणि दुसरे मी सध्या जिथे काम करत आहे तिथले तर मला माझा जुना PF काढून हवा त्यासाठी काय करावे लागेल ?
मी SY B.com ला आहे आर्थीक परिस्थिती नसल्यामुळे माझा कोणताही कोर्से झाला नाही जर मला लवकर जॉब मिळवण्यासाठी काय करू bank?
Recurring Deposit बद्दल सविस्तर माहिती मिळेल का ?