लिखाण

अर्ज कसा लिहावा?

3 उत्तरे
3 answers

अर्ज कसा लिहावा?

2
उच्च शिक्षण संपताच तरूणवर्ग नोकरी शोधण्याच्या दिशेकडे वळतो. रोज एका ना एका संस्‍थेत नोकरीसाठी अर्ज करणे सुरू असते. काही अर्ज स्वीकारले जातत तर काहींना केराची टोपली मिळते. अनेकांच्या अर्जांमध्ये त्रुटी असल्या कारणाने त्यांचे अर्ज स्वीकारले जात नाही. तर, अशा तरूणवर्गासाठी नोकरीचा अर्ज कसा करावा, याच्या काही टिप्स आम्ही येथे देत आहोत.

*प्रति
आपण नोकरीसाठी अर्ज कोणत्या संस्थेत करत आहे. तेथील प्रमुख व्यक्तीचे नाव, पद, कंपनी हे अर्जाच्या डाव्या बाजूला सुरुवातीला असायला हवे. तसेच उजव्या कोपर्‍यात अर्ज करत असलेल्या दिवसाची दिनांक लिहिणे आवश्यक आहे.

*विषय
आपण अर्ज कोणात्या पदासाठी करत आहोत.

त्याविषयी थोडक्यात माहिती द्यावी.
उदा. विषय: मी........या पदासाठी अर्ज करत आहे.

*आदर
ज्या संस्था, कंपनीत अर्ज करणार आहोत त्यांच्याविषयी आदरणीय महोदय, किंवा सप्रेम नमस्कार असे आदरपुरक शब्द लिहावे.

*स्वतःची माहिती
पुर्ण नाव : .................................................

पत्ता : .................................................

शिक्षण : ...........................................पदवी .......

कोणत्या विघापीठातून झाले ही सर्व माहिती द्यावी

कामाचा अनुभव .................. किती वर्षांचा..............

विषयाची आवड : ........................................

ई-मेल आयडी ............................... मोबाईल नं ..............................

इतर गोष्टींचे शिक्षणः ..............................................................

*विनंती
आपल्याला नोकरीची गरज असल्याने शेवटी नोकरीच्या मागणीसाठी आदरपूर्वक विनंतीचा उल्लेख करावा. तसेच सोबत स्वत:ची व्यक्तीगत माहिती जोडत आहे, असा उल्लेख करावा. शेवटी डाव्या बाजूला कळावे, असा उल्लेख करावा.

*स्वाक्षरी
संपूर्ण अर्ज लिहून झाल्यानंतर अर्जादाराने स्वतःची सही करावी.

हल्ली नोकरीसाठी अर्ज ई-मेलवरूनच केला जातो. पण, तरीही प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळेस त्या त्या कंपनीचा लेखी अर्ज भरावा लागतोच. तो देखील अतिशय काळजीपूर्वक भरून द्यावा. विशेषतः आपल्या आवडीचे विषय, आधी केलेल्या कामाचा काही अनुभव, तेथील ओळखीच्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपला ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अतिशय बिनचूक लिहावा, जेणेकरून आपली निवड झाल्यास आपल्याशी संपर्क साधणे सोपे जाईल.
उत्तर लिहिले · 6/2/2018
कर्म · 123540
2
मी "उत्तर द्या" खाली उत्तर लिहिण्याऐवजी शिवश्री संदीप नवघरे पाटील यांनी दिलेल्या उत्तराखालील कमेंटमध्ये उत्तर लिहिले आहे. त्यामुळे मी उत्तर दिले आहे की कमेंट केला आहे याविषयी वाचकांच्या मनात प्रश्न उभा राहील. सदर चुकीबद्दल मी वाचकांची माफी मागतो. त्याचप्रमाणे शिवश्री संदीप नवघरे पाटील यांची माफी मागतो. तेव्हा मी कमेंट लिहीला नसून उत्तर लिहिले आहे हे समजून घेण्याची विनंती सर्वांना करतो.
उत्तर लिहिले · 6/2/2018
कर्म · 91065
0

अर्ज लिहिताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात:

  1. विषय (Subject): अर्ज कोणत्या विषयावर आहे ते स्पष्टपणे लिहा.
  2. संबोधन (Salutation): ज्या व्यक्तीला अर्ज लिहित आहात, त्यांना योग्य आदराने 'महोदय/महोदया' असे लिहा.
  3. परिचय (Introduction): तुमचा अर्ज कोणत्या संदर्भात आहे, हे थोडक्यात सांगा.
  4. मुख्य भाग (Main Body): अर्जाचा मुख्य भाग स्पष्ट आणि मुद्देसूद असावा. आपली समस्या किंवा मागणी स्पष्टपणे मांडा.
  5. समाप्ती (Conclusion): तुमचा अर्ज संपवताना, केलेल्या मदतीसाठी आभार व्यक्त करा.
  6. सही (Signature): अर्जदाराने आपली सही आणि नाव स्पष्ट अक्षरात लिहावे.
  7. दिनांक (Date): अर्जावर तारीख नमूद करावी.

उदाहरणार्थ, रजेसाठी अर्ज:

विषय: रजेसाठी अर्ज

महोदय/महोदया,

मी आपल्या कंपनीत [तुमचे पद] म्हणून कार्यरत आहे. मला [दिनांक] ते [दिनांक] पर्यंत काही वैयक्तिक कारणांमुळे रजेची आवश्यकता आहे.

कृपया माझी रजा मंजूर करावी, ही नम्र विनंती.

आपला/आपली विश्वासू,

[तुमचे नाव]

दिनांक: [आजची तारीख]

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 840

Related Questions

भूक या कथेतील भिका व्यक्तिरेखा स्पष्ट करा?
लिखाणाचे साहित्य ठेवण्याचे नक्षीदार काय?
शाळेतील स्वातंत्र्य दिन समारंभाचा वृत्तांत कसा लिहाल?
प्रस्तावित हालचालींचे महत्त्व कोणते?
लेखन विषयक नियम काय आहेत हे सांगून मराठी लेखनाचा आढावा घ्या?
पुस्तपालन म्हणजे काय?
मंगलाष्टका कोणी लिहिल्या?