घरगुती उपाय

जळवात वर घरगुती उपाय आहे का?

2 उत्तरे
2 answers

जळवात वर घरगुती उपाय आहे का?

7
जळवात (पायाला भेगा पडणे)

पायाला भेगा पडणे (विशेषत: उतारवयात) हे उष्ण कोरडया हवामानात सर्रास आढळणारे दुखणे आहे. अनवाणी किंवा नुसत्या चपला घालून वावरल्याने पायावर घर्षणाचा, कोरडया वातावरणाचा व धुळीचा परिणाम होऊन भेगा पडू शकतात. बुटांच्या सतत वापराने भेगांचे प्रमाण आपोआप कमी होते.

भेगा पडल्यावर तात्पुरता आराम म्हणून रोज रात्री पाय गरम पाण्यात 5 मिनिटे बुडवून ठेवावेत. यानंतर स्वच्छ धुऊन खोबरेल तेल किंवा आमसूल तेल लावावे. भेगा होऊ नयेत म्हणून बूट वापरावेत. बुटांनी पायाचा कोरडेपणा कमी होतो व त्वचा चांगली राहते.

जळवात हातापायांच्या भेगा – जळवात बर्‍याच वेळा उग्ररूप धारण करतो. कंड, तळहात, तळपायाची कातडी निघणे काही वेळा रक्त येणे असेही प्रकार आढळतात. त्यावर कोकमतेल गरम करून हळूवारपणे टाचेला, तळहातांना लावावे. हाता-पायाच्या भेगातही कोकम तेल भरावे, त्याने जळवात कमी होतो.
उत्तर लिहिले · 25/11/2017
कर्म · 458560
0
जळवात (heat rash) साठी काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  1. कोरफड (Aloe vera): कोरफडीचा गर त्वचेला लावल्याने जळवात कमी होते आणि त्वचेला थंडावा मिळतो.
  2. काकडी: काकडीचा रस लावल्याने त्वचा थंड राहते आणि जळवात कमी होते.
  3. बर्फ: बर्फाचा हलका शेक दिल्याने त्वचेला आराम मिळतो.
  4. ओटमील बाथ (Oatmeal bath): ओटमील पाण्यात मिसळून त्या पाण्याने स्नान केल्याने त्वचेची जळजळ कमी होते.
  5. चंदन: चंदन पावडर पाण्यात मिक्स करून लावल्याने जळवात कमी होते.
  6. बेकिंग सोडा: बेकिंग सोडा पाण्यात मिसळून लावल्याने त्वचेला आराम मिळतो.
हे उपाय केल्यावरही आराम न मिळाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 840

Related Questions

केसतोडा यावर औषध कोणते?
ऍसिडिटीवर घरगुती उपाय?
छातीत जळजळ होत असेल तर सोपे घरगुती उपाय काय आहेत?
गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणता आहे?
मला हाताला गजकर्णाचे चट्टे उठले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?
कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले उत्तर दाखवा?