सामान्य ज्ञान प्राणी

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे?

11


'शेकरू ' हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ती एक उडणारी खार असून  तिचे शास्त्रीय नाव 'ratufa indica 'असे  आहे.

उत्तर लिहिले · 16/5/2017
कर्म · 995
4
शेकरू (उडती खार; शास्त्रीय नाव: Ratufa indica, रॅटुफा इंडिका ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]: Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो.



राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू, एकेकाळी गोव्यातला बऱ्याच सधन जंगलांचे वैशिष्ट्य होता. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळीच्या जंगलात माडत {?), किंदळ (?), उंबर सारख्या झाडांवर हमखास आढळायची. परंतु आज त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगल तोडीमुळे संकटात सापडलेला आहे.

महाराष्ट्रात भीमाशंकर, फणसाड, आंबा घाटाजवळील जंगलात, आजोबा डोंगररांगात, माहुली व वासोटा परिसराMत शेकरू आढळतो. मेळघाट अभयारण्य, ताडोबा राष्ट्रीय उद्यान येथेही तो दिसतो.




शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजेसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते.



शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरु सहा ते आठ घरे तयार करतो. एका झाडावरून दुसर्‍या झाडावर सहज झेप घेणारा शेकरू १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकतो. शेकरू डहाळ्या व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते, जेथे अवजड परभक्षी पोहोचू शकत नाहीत.
उत्तर लिहिले · 22/10/2020
कर्म · 6750
0

महाराष्ट्राचा राज्य प्राणी भारतीयshekru (Giant squirrel) आहे.

शेकरू ही खार प्रजाती असून ती मुख्यतः भारत, विशेषतः महाराष्ट्रातील जंगलांमध्ये आढळते.

हे प्राणी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत मोठ्या प्रमाणावर आढळतात.

  • Scientific Name: Ratufa indica
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 320

Related Questions

डायनासोरचे हात आखूड का होते?
असा कोणता प्राणी आहे की जो जन्मापासून ते त्याच्या मृत्यू पर्यंत झोपत नाही?
अथवा कोणी प्राणी येऊनि तयांना म्हणती छेडू नका?
महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानांची नावे, विभाग, स्थळ, जिल्हा, सर्वसाधारण माहिती, तेथील पशू, प्राणी, फुले आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगा.
महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानांची माहिती मिळवून त्यांची नावे, स्थळ, विभाग, जिल्हा, सर्वसाधारण पशू, प्राणी आणि फुले यांची वैशिष्ट्ये सादर करा.
द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी कोणते?
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अशीच परिस्थिती हत्तींचीही आहे. तुम्ही अशा वनस्पती व प्राण्यांची माहिती मिळवा. त्यांचा अधिवास कोणता ते शोधा. या प्राण्यांच्या संवर्धनासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे? कोणत्या ठिकाणी ते शक्य आहे, याचे सादरीकरण तयार करा.