बचत गट
पुरुष बचत गट कुठे नोंदवावा व बचत जास्तीत जास्त किती असावी व रकमेवर दरमहा किती व्याज घेता येते?
1 उत्तर
1
answers
पुरुष बचत गट कुठे नोंदवावा व बचत जास्तीत जास्त किती असावी व रकमेवर दरमहा किती व्याज घेता येते?
8
Answer link
पुरुष बचत गटासाठी वेगळ्या काही सवलती नाहीत. ज्या महिला बचत गटाला मिळतात त्याच पुरुष बचत गटालाही मिळतात.
गटात जास्तीत जास्त 20 सदस्य असू शकतात.
नोंदणी:
पुरुष बचत गटाची कुठेही नोंदणी करावी लागत नाही. फक्त एक गट स्थापन करून त्या गटाला नाव देऊन, त्या नावाने बँकेत अकाउंट उघडले कि बचत गट चालू करता येतो.
कर्जाचे व्याजदर आणि इतर व्यवहार कसे ठरवले जातात:
बचत गटाच्या व्यवहारासाठी बचत गटाचे सदस्य - कर्ज द्यायचे का, द्यायचे ठरल्यास किती दराने द्यायचे, कोणाला द्यायचे, परतफेडी विषयी नियम वगैरे ठरवतात. त्यामुळे व्याजदर कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती हे सर्वस्वी बचत गटाच्या सदस्यांवर अवलंबून आहे.