बचत बचत गट

स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने पुरवठा करणे?

1 उत्तर
1 answers

स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने पुरवठा करणे?

6
🚜 *स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने पुरवठा करणे*



💫 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे राहणीमानात बदल व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून सदरची योजना दि. 6 डिसेंबर 2012 पासून सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप केले जाते.

🧐 *अटी व शर्ति* :

सदरची योजना एकूण 1 ते 13 अटी व शर्तींच्या अधिन राहून राबविली जाते.

● अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
● स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
● मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.50 लाख इतकी राहील, स्वयंसहायता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के रक्कम शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.

📑 *कागदपत्रे* :

★ रहिवाशी दाखला
★ जातीचा दाखला
★ बचत गट नोंदणी प्रमाणपत्र
★ हमीपत्र

💁‍♂ *लाभाचे स्वरूप* : मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने.

🏛 *संपर्क* : संबंधीत जिल्ह्यांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय.
उत्तर लिहिले · 5/12/2019
कर्म · 569205

Related Questions

बँकांमार्फत कर्ज देण्यासाठी अधिकर्ष सवलत ओव्हर ड्राफ्ट खालील पैकी केवळ कोणत्या खात्यावर दिली जाते.? * 2 points A) चालू खाते B) बचत खाते C) आवर्ती खाते D) मुदत खाते
बचत गट कसे स्थापन करायचे?
शेतकरी बचत गटाचे फायदे काय आहेत?
डिजिटल इंडिया पोर्टलवरून मला बचत गटाचा पॅन कार्ड काढायचा आहे तर लागणारे डॉक्युमेंट ?
बचत गटाची कार्ये कोणती ?
बचत गटाचे बँकेतिल पैसे कसे काढावे?
बचत गट नोकरी करणारे पुरुष सुरू करू शकता का? व त्याचे मासिक उपन्न किती आसवे?