अध्यात्म

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, यातील "नुरवी" या शब्दाचा अर्थ काय आहे?

3 उत्तरे
3 answers

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, यातील "नुरवी" या शब्दाचा अर्थ काय आहे?

8
तुम्ही टाईप करताना थोडे चुकले आहात मूळ शब्द असे आहेत,
"नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची"
नुरवी म्हणजे (न+उरवी)---(दुःख,संकटे न उरवणारा)
पुरवी म्हणजे पुरवणारा (देणारा)---(प्रेम,सुख देणारा)
कृपा जयाची ( ज्याची कृपा असेल तर)

म्हणजे "विघ्नहर्ता अशा गणरायाची ज्याच्यावर कृपा असेल त्याला दुःखातून सुटका करून,नष्ट करुन सुख प्रदान करणारा"

उत्तर लिहिले · 24/4/2017
कर्म · 20475
1
नूरवी म्हणजे न + उरवी.  गणपती विघ्न वार्ता म्हणजे दुःखाची गोष्ट उरवत नाही, दुर करतो असा याचा अर्थ आहे.
उत्तर लिहिले · 24/4/2017
कर्म · 99520
0

नुरवी या शब्दाचा अर्थ शांत करणे किंवा शमन करणे असा होतो.

या ओळीचा अर्थ असा आहे की ज्याची प्रेमळ कृपा (दया) शांती देते.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 220

Related Questions

सापेक्ष आर्द्रता या संज्ञेची व्याख्या लिहा.
गुरू करणे का गरजेचे असते?
अखेरचे कीर्तन गाडगे महाराजांनी कोठे केले?
चक्रधर स्वामी महात्मा कोणाला म्हटले जाते?
शिवलिंगाचा खरा अर्थ काय आहे?
दगडू शेठ हलवाई कोणत्या शहरात आहे?
संत मीराबाईची भक्तिगीते समाजाला कोणता संदेश देतात?