2 उत्तरे
2 answers

स्वतःचा पेट्रोल पंप उघडण्यासाठी काय करावे ?

143
पेट्रोल पंप खोलण्यासाठी तुमच्याजवळ २ गोष्टी असणे सर्वात गरजेचे आहे.

गोष्ट १:
जागा.
जर पंप हायवेवर टाकायचा असेल तर सुमारे १२ गुंठ्याचा प्लॉट (१२०० Square Meter).
जर पंप हायवेजवळ नसेल तर सुमारे ८ गुंठ्याचा प्लॉट (८०० Square Meter).

गोष्ट २: 
पैसे.
प्रत्येक ऑइल कंपनीच्या नियमानुसार पैसे कमी जास्त लागू शकतात. म्हणजे सेक्युरिटी डिपॉजिट सुमारे ३० लाख + भांडवल सुमारे ३० ते ५० लाख. म्हणजे मिळून ८० लाखाच्या आसपास पैसे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

या गोष्टींची तयारी केल्यानंतर ज्या कंपनीचा पंप टाकायचा आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन रेजिस्ट्रेशन करा आणि नवीन पम्पासाठी अर्ज भरा. अर्जात तुमचे नाव, पत्ता, पम्पाची जागा, या जागेच्या आसपास १० किमी मध्ये असलेले इतर पंप अशी सगळी माहिती तुम्हाला भरावी लागेल. तुमच्या अर्जानुसार कंपनी प्लॉट चे सर्वेक्षण करेल आणि तुमची आर्थिक तयारीसाठी पडताळणी करेल. कंपनीने परवानगी दिल्यानंतर काम सुरु होऊन पेट्रोल पंप उभा राहायला जास्त वेळ लागत नाही.

Example:
१. Essar कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्यासाठी हा PDF फॉर्म डाउनलोड करून, भरून, नंतर फॉर्म च्या शेवटी दिलेल्या पत्त्यावर पाठवा. 
किंवा या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन देखील ही प्रक्रिया करू शकता.

२. HP कंपनीचा पेट्रोल पंप सुरु करायला देखील सारखीच प्रोसिजर आहे.
http://vendor.hpcl.co.in/dealeradv4retail/index_apply.jsp या लिंकवर जाऊन, रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन फॉर्म भरा. तुमची सर्व माहिती योग्य आणि अचूक भरा. कंपनीची डिलरशिप टीम तुम्हाला संपर्क करून पुढील माहिती देईल.


उत्तर लिहिले · 12/3/2017
कर्म · 282915
16
 पेट्रोल पंपाचा ⛽ परवाना कसा काढावा       

  .         *_⛽ वरवर जरी सोपे वाटत असले तरी एखादा पेट्रोल पंप सुरू करणे हे काही सोपे काम नाही. यासाठी एखाद्या मोक्याच्या आणि बर्‍यापैकी मोठ्या जागेची गरज लागते. तसेच यात काही कडक नियम आणि अटीसुद्धा लागू आहेत ज्या तंतोतंत पाळणे आपल्याला अनिवार्य आहे._*
*⛽पेट्रोल पंप सुरू करण्यासाठीचे पात्रता निकष*
१. पेट्रोल पंप सुरू करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याजवळ एक मोक्याची जागा असली पाहिजे. साधारणत: सर्व नावाजलेल्या पेट्रोलियम कंपन्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर आणि त्यांच्या संकेतस्थळांवर त्यांच्या वितरणासाठी उपलब्ध जागांबद्दल जाहिरात देतात. त्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवून योग्य ती रक्कम तयार ठेवायला हवी. आपण एक तर ती जागा विकत घेऊ शकतो किंवा मोठ्या काळासाठी (कमीत कमी काळ नियमावली मध्ये दिलेला असतो) भाड्याने घेऊ शकतो.

2. आपण आयकर विभागाच्या कायद्यांनुसार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. या कायद्यांनुसार भारताचे नागरिक असण्यासाठी आपण गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल- ३१ मार्च) कमीत कमी १८२ दिवस भारतात राहिलेले असायला हवे.
3. आपली वयोमर्यादा २१-५५ वर्षांमधील असावी. तसेच CC2 अंतर्गत आपण जर स्वातंत्र्यसैनिक असाल तर या मर्यादेपुढेही आपण पेट्रोल पंपासाठी आपले नाव नोंदवू शकतो.
4. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आपले बोर्डाची १०+२ वर्षे (दहावी आणि बारावी) / युनिव्हर्सिटी/ चार्टर्ड अकाऊंटंट/ कंपनी सेक्रेटरी/ कॉस्ट अकाऊंटंट/ इंजिनीअरिंग डिप्लोमा पूर्ण झालेले असावे.
*⛽पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक :*
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थित भागभांडवल असण्याची गरज आहे. साधारणतः आपल्याकडे ५०-६० लाख रोख रक्कम तयार हवी. तसेच सध्या पेट्रोल पंपावेळी २५ लाख रुपयांची क्षमता, तर ग्रामीण भागात १२ लाख रुपयांची क्षमता दाखविणे गरजेचे असते.
*⛽गुंतवणुकीचे पुढील प्रकार भांडवल म्हणून पात्र आहेत :*
तसेच रोख रक्कम आणि दागिने यात मोजले जात नाहीत. तसेच करंट खात्यातील रक्कमसुद्धा धरली जात नाही.
साधारणतः नाममात्र फी भरून आपण डिलरशिप घेऊ शकतो. अर्ज देण्याची रक्कम ग्रामीण भागात १०० आहे आणि इतर ठिकाणी १,०००. अनुसूचित जातींसाठी यात पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे.
*_⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾_*
ही रक्कम डी.डी. रूपात आपण अर्ज देत असलेल्या ऑइल कंपनीच्या नावावर अनुसूचित बँकांमध्ये भरणे अनिवार्य आहे. ही रक्कम परत केली जात नाही. तसेच एक व्यक्ती एकाहून अधिक जागांसाठी अर्ज करू शकत नाही.
अचूक किंमत ही जागांनुसार आणि कंपनीनुसार बदलते. अर्ज करत असलेल्या कंपनीची वेबसाइट डिलरशिप घेण्याआधी व्यवस्थित अभ्यासा.
*⛽ पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी अर्ज कसा करावा :*
सर्वप्रथम आपण पेट्रोलियम कंपनीच्या जाहिरातीची वाट पाहा. साधारणपणे सर्व नावाजलेल्या वृत्तपत्रांत आणि कंपनीच्या संकेतस्थळावर ही जाहिरात येते. यातून आपल्याला कोणत्या ठिकाणी डिलरशिप उपलब्ध आहे हे समजते. त्यातून आपल्याला हव्या त्या ठिकाणच्या डिलरशिपसाठी आपण अर्ज करू शकतो.
पेट्रोलपंपची डिलरशिप घेण्यासाठी उपयुक्त असलेली काही संकेतस्थळे :
परवाना मिळाल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार आपण पुढील व्यवसाय उभा करू शकाल.

Related Questions

गॅस वितरकाची तक्रार कोठे करायची?
आम्हाला व्यावसायसाठी काही वितरक हवे आहेत . कुणाला इच्छा आहे का ??
Royal Enfield डीलर शिप साठी किती खर्च येईल ?