1 उत्तर
1
answers
वर्णभेद या बद्दल कायद्यात काही तरतुदी आहेत का?
4
Answer link
वर्णभेद याबद्दल स्वतंत्र असा कायदा भारतात नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला रंगावरून किंवा जातीवरून चिडवणे किंवा अपमान करणे याविरोधात कुठलीही शिक्षा भारतीय कायद्यात नाही.
अनुसूचित जाती आणि जमाती (SC आणि ST) यांच्या रक्षणासाठी कायद्यात विशेष उल्लेख आहे, तो असा
"promotion of enmity between classes on grounds of religion, race, place of birth, residence, language, caste or community"
म्हणजेच वरील कायद्यानुसार एखाद्या कम्युनिटीविरोधात तुम्ही धर्म, रंग, भाषा, जात यांवरून जर द्वेष निर्माण करत असाल तर तुम्ही शिक्षेस पात्र असता.
तसेच SC आणि ST या जातीतील लोकांवर होणारे हिंसक अत्याचार रोखण्यासाठी असणारा Atrocity Act तर सर्वांना माहीतच आहे. पण Atrocity Act च्या तरतुदी वर्णभेदावर जास्त जोर देत नाहीत.
नुकत्याच एका कायदेविषयक कमिटीने वर्णभेदाविरुद्ध नवीन कायदा करण्यासाठी सरकारकडे शिफारस केली आहे. या कमिटीच्या शिफारशीनुसार कुणा व्यक्तीला तुम्ही जर जात, रंग, वंश, धर्मावरून अपमानित केले किंवा द्वेषपूर्ण बोलले तर तुमच्याविरोधी ती व्यक्ती गुन्हा दाखल करू शकते आणि तुम्हाला ३ वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो अशी तरतूद कायद्यात करण्यात येणार आहे. अजून तरी यासंदर्भात कुठलेही विधायक सरकारने संसदेत मांडलेले नाही. संदर्भ
म्हणजेच वर्णभेदाविरोधात कडक कायदा येण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागेल.