स्टार्टअप्स व्यवसाय व्यावसाईक डावपेच

मला एक स्मॉल स्केल बिझनेस चालू करायचा आहे, तर पर्याय कोणते आहेत?

6 उत्तरे
6 answers

मला एक स्मॉल स्केल बिझनेस चालू करायचा आहे, तर पर्याय कोणते आहेत?

319
सध्या भारतामध्ये उद्योगासाठी फार पोषक वातावरण तयार होत आहे. उद्योग सुरु करण्यासाठी सरकारही स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांमधून प्रोहत्सान देत आहे. स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी खालिल काही स्टेप्स आहेत.
१) उद्योग चालवण्याचा प्लॅन तयार करा.
 म्हणजे आपाल्याला कोणता व्यवसाय सुरु करायचाय हे आधी ठरावा. त्या व्यवसायातून नफा कसा मिळेल, व्यवसायाचा मुख्य ग्राहक वर्ग कोण असेल, या उद्योगासाठी योग्य कामगार वर्ग कसा उपलब्ध होईल या गोष्टी एका ठिकाणी लिहून ठेवा. याचा उपयोग तुम्हाला तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी होईल.
2) व्यवसायासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे का हे तपासून पहा. उदाहारानार्थ शेळीपालन कसे करावे यासाठी काही विद्यापीठे तसेच खाजगी संस्था प्रशिक्षण देतात. गरजेनुसार प्रशिक्षण घ्या.
३) उद्योगासाठी योग्य जागा निवडा. ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि तिथल्या सरकारच्या नियमात बसेल अशी जागा निवड.
४) उद्योगासाठी किती आर्थिक तरतूद लागेल याचा अंदाज काढा. त्यानुसार कर्ज हवे असेल तर सरकारी योजना किंवा सबसिडी मिळेल का याची चाचपणी करा. यासाठी तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या तत्सम विभागात संपर्क करू शकता.
५) कायदेशीर बाबींचा विचार करून व्यवसाय पार्टनरशिप मध्ये करायचा कि स्वतःच्या नावाने proprietorship करायचे हे ठरवा.
६) व्यवसायाची नोंद सारकारी दप्तरी करून घ्या. तुम्हाला कोणता कर भरावा लागेल हे लक्षात घ्या.
७) उद्योगासाठी अवश्यक तो परवाना घ्या. उदाहरणार्थ, किराणा मालाचे दुकान सुरु करण्यासाठी शॉप ऍक्ट काढा.
८) योग्य ते मनुष्यबळ शोधा

वरील सर्व गोष्टी सोडून त्या व्यवसायातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन सुद्धा खूप उपयुक्त ठरते. भारत सरकारने नवीन उद्योगांसाठी ठराविक उत्पनाखालील व्यवसायांना कर सवलत दिलेली आहे. भारत सरकारची http://startupindia.gov.in हि वेबसाईट तुम्ही बघू शकता. 
  
लघुउद्योग पर्याय:
१) पाणी फिल्टर कंपनी
२) शेळीपालन
३) प्लास्टिक मोल्डिंग मशीन
४) कुकूटपालन
५) मसाला तयार करण्याचा व्यवसाय
६) पापड उद्योग
७) तेल मिल 
८) इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान
९) घरगुती मशरूम उत्पादन
१०) अगरबत्ती उद्योग
११) डाळी तयार करण्याचा उद्योग
१२) आइस-क्रीम उद्योग
१३) डेरी उद्योग 
१४) मेणबत्ती उद्योग
१५) वाशिंग डिटरजेंट पाउडर
१६) लैटेक्स रबर उद्योग
१७) प्लास्टिक वस्तू उत्पादन 
१८) पॉलीथीन शीट उद्योग,
१९) चिप्स व वेफर्स
२०) नूडल्स व सेवया 

घरगुती लघुउद्योगांची माहिती देणारे गजानन जोशी लिखित खालील पुस्तक विकत घेऊन आनखी माहिती मिळू शकते.


तुम्हाला जर हि माहिती उपयोगी वाटली तर तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेयर करा. यातून ज्ञान वाटण्याचे काम होऊन गरजवंताची मदत होईल.
उत्तर लिहिले · 16/10/2016
कर्म · 48240
15
व्यवसाय कोणता करावा, असा प्रश्‍न बर्‍याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास अनेक व्यवसाय असतात. आपल्या परिसरावर नजर फिरवली तर आपल्याला जी जी गोष्ट दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते. पण आपण त्याकडे व्यवसाय म्हणून बघत नाही. ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात आणि तो त्यातला कोणताही व्यवसाय करण्यास धजावतो. एकदा अशीच एक उद्योजक प्रवृत्तीची व्यक्ती स्वत:ची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एका डॉक्टरकडे गेली होती. त्याने डॉक्टरकडे जाऊन पाहिले तेव्हा रुग्णांची बरीच मोठी रांग लागलेली दिसली. त्याला रांगेत थांबावे 

लागले आणि त्याचा नंबर लागण्यास पाऊण तास लागला. मात्र तो रांगेतला पाऊण तास तो निवांत बसला नाही. त्याने आजूबाजूला नजर टाकली, काही निरीक्षणे केली आणि काही नोंदी केल्या. त्याचा नंबर लागून तो डॉक्टरसमोर तपासणीसाठी बसला तेव्हा त्याने आधी पाऊण तासभर केलेल्या निरीक्षणाचा कागद त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाल्या, मी गेला पाऊण तास तुमच्या रुग्णालयाचे निरीक्षण केले असून रुग्णालयाशी संबंधित असे किती व्यवसाय करता येतात याच्या नोंदी केल्या आहेत. मला असे आढळले आहे की, एका रुग्णालयाशी संबंधित व्यवसाय करायचेच ठरवले तर साधारणत: ४० व्यवसाय करता येतात असे म्हणत त्याने त्या व्यवसायाची यादी डॉक्टरना वाचून दाखवली. काय करावे, काय धंदा करावे हे सुचतच नाही असे म्हणणार्‍यांसाठी हा एक चांगला धडा आहे.

पुण्यात एका तरुणाने एक छान व्यवसाय शोधून काढला होता. त्याचा एक मित्र श्रीमंत लोकांच्या घरी शोभीवंत पुष्पगुच्छ नेऊन देण्याची सेवा करत असे. तो स्वत:च्या घरी अतीशय कलात्मक पुष्पगुच्छ तयार करायचा आणि लोकांच्या घरी नेऊन द्यायचा. त्यांच्या दिवाणखान्यामध्ये तो पुष्पगुच्छ टेबलवर ठेवला की, घराची शोभा वाढे आणि या पुष्पुगुच्छाच्या सेवेबद्दल त्याला पैसे मिळत. पैसे किती मिळावेत हे गुच्छ बदलण्याच्या वेळेवर अवलंबून असे. काही लोकांना रोज नवा पुष्पगुच्छ लागे, काही जण आठवड्याला एक गुच्छ मागत. त्यानुसार त्याला कमी-जास्त पैसे मिळत असत. त्याचे अनुकरण करून त्याच्या एका मित्राने दिवाणखान्याची शोभा वाढविणारी पोस्टर्स पोचवायला सुरुवात केली. घरात एकच एक पोस्टर लावून तेच रोज बघून लोकांना कंटाळा येतो. तेव्हा या तरुणाने त्यांच्या घरातले पोस्टर बदलण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्याला भांडवल काहीच लागले नाही, कारण तो एकाचे पोस्टर दुसर्‍याच्या घरी आणि दुसर्‍याचे पोस्टर तिसर्‍याच्या घरी असा बदल करत असे. सायकलवर टांग मारायची आणि पोस्टर बदलत रहायचे. साधारण १९७०-७२ साली घडलेली ही घटना आहे. त्याने ४० लोकांच्या घरात आठवड्याला एक पोस्टर बदलायचे ठरवले होते आणि त्या बदल्यात तो १५ रुपये घेत असे. म्हणजे दिवसामध्ये केवळ सात जणांच्या घरी पोस्टरची बदलाबदल करावी लागे आणि त्याला महिन्याला ६०० रुपये मिळत असत. त्या काळी तहसीलदारचा पगार ४५० रुपये होता. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए असे म्हणतात ते काही चुकीचे नाही. सध्या महाराष्ट्रात आघाडीचे उद्योगपती म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते डी.एस. कुलकर्णी आपल्या उमेदीच्या काळात टेलिस्मेल हा व्यवसाय करत असत. त्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या फोनचा रिसिव्हर पेट्रोलने स्वच्छ साफ करणे आणि जाताना त्यात अत्तराचा फाया ठेवून जाणे हाच तो व्यवसाय. त्यातूनच ते पुढे मोठे उद्योगपती झाले.

आता दिल्लीतल्या एका विद्यार्थ्याने गेले वर्षीच केलेला एक उद्योग किती चांगला आहे बघा. सध्याच्या शिक्षणामध्ये प्रॅक्टिकलला खूप महत्व आले आहे आणि आठवी, नववीच्या वर्गापासून ते अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच कधी तरी एखादा प्रोजेक्ट सादर करणे हे सक्तीचे झाले आहे. सध्या प्रोजेक्टचे नखरे ङ्गार वाढलेले आहेत. एखादा प्रोजेक्ट सादर करताना तो डी.टी.पी. करून सादर करावा लागतो. शिवाय त्यात काही चित्रे टाकावी लागतात. त्याचे उत्तम स्पायरल बायंडिंग करावे लागते. शिवाय त्याला सजवून, नटवून सादर करावे लागते. अनेकदा त्यात त्यात कसल्या कसल्या माहितीच्या झेरॉक्स प्रती जोडाव्या लागतात. ही सगळी कामे करताना विद्यार्थ्यांच्या नाकी नव येतात. ही कामे परीक्षा जवळ आल्यावरच केली जातात. आधीच परीक्षेचे टेन्शन, त्यात या कामाची घाई अशी परिस्थिती झाली की, विद्यार्थी थकून जातात आणि त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. अशी सगळी ही कामे कोणी आयती करून दिली तर बरी वाटतात. ही संधी शोधून दिल्लीतल्या अजय नावाच्या एका तरुणाने सगळ्या प्रकारच्या विद्याशाखांचे प्रोजेक्ट तयार करून देणे हा व्यवसायच सुरू केला आहे. तसे तर डी.टी.पी. करणारे अनेक लोक अाहेत. सायबर कॅङ्गेतून माहिती काढता येते आणि ङ्गोटो सुद्धा काढता येतात. बायंडिंग करणारेही अनेक लोक आहेत. परंतु या प्रत्येक कामासाठी या चार दुकानांत ङ्गिरून विद्यार्थ्यांची दमणूक होते. मग ही मुले अजयकडे आपले काम सोपवतात. तो एका प्रोजेक्टमागे साधारण ५०० रुपये ते २००० हजार रुपये असा दर लावून त्याची ही सारी कामे करून देतो. त्यामुळे मुलांची पायपीट टळते. या कामाची त्याला एवढी सवय झालेली आहे की, तो आता विद्यार्थ्यांना प्रोजेक्टचे विषय सुद्धा सुचवायला लागला आहे आणि त्या विषयाची माहिती तोच मिळवून द्यायला लागला आहे. शैक्षणिक दृष्ट्या ही गोष्ट चूक आहे, परंतु त्याला अजयचा नाईलाज आहे. त्याला व्यवसाय मिळत आहे. त्याने एक कॉम्प्युटर, झेरॉक्स मशीन, इंटरनेट कनेक्शन, बायंडिंग वर्क असे सगळे एकत्र करून एक प्रोजेक्ट व्यवसायच सुरू केलेला आहे. अन्यथा बेकार राहिला असता तो अजय आता महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमावतो आणि त्याने आपल्या सोबतच तिघांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.


Raje

उत्तर लिहिले · 12/4/2018
कर्म · 65405
0

स्मॉल स्केल (Small Scale) बिझनेस सुरु करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. खाली काही संभाव्य पर्याय दिले आहेत:

  1. उत्पादन व्यवसाय (Manufacturing Business):

    • उदाहरणे: अगरबत्ती बनवणे, मेणबत्ती बनवणे, मसाले बनवणे, पापड बनवणे, लोणचे बनवणे, बेकरी प्रोडक्ट (baking product) बनवणे.
    • टीप: ह्या व्यवसायात तुम्हाला स्वतः उत्पादन करावे लागते.
  2. सेवा व्यवसाय (Service Business):

    • उदाहरणे:
      • डिजिटल सेवा: वेबसाईट डिझाईन (Website design), सोशल मीडिया मार्केटिंग (social media marketing), कंटेंट रायटिंग (content writing).
      • शैक्षणिक सेवा: कोचिंग क्लासेस (coaching classes), होम ट्युशन (home tuition).
      • इतर सेवा: ब्यूटी पार्लर (beauty parlor), लॉन्ड्री (laundry), दुरुस्ती सेवा (repairing service).
    • टीप: ह्यात तुम्ही तुमच्या कौशल्यांचा वापर करून लोकांना सेवा पुरवता.
  3. व्यापार व्यवसाय (Trading Business):

    • उदाहरणे:
      • किराणा दुकान, स्टेशनरी दुकान, कपड्यांचे दुकान.
      • ऑनलाईन (Online) वस्तू विकणे.
    • टीप: ह्यात तुम्ही उत्पादने विकत घेऊन ती नफा घेऊन विकता.
  4. कृषी व्यवसाय (Agriculture Business):

    • उदाहरणे:
      • सेंद्रिय शेती (Organic farming), फुलशेती, भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन (Poultry), मधमाशी पालन.
    • टीप: ह्या व्यवसायात शेती आणि पशुपालन यांचा समावेश होतो.
  5. तंत्रज्ञान आधारित व्यवसाय (Technology Based Business):

    • उदाहरणे: ॲप डेव्हलपमेंट (app development), वेबसाईट डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा (cyber security).
    • टीप: ह्या व्यवसायात तुम्हाला तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

व्यवसाय निवडताना खालील गोष्टी लक्षात घ्या:

  • तुमची आवड आणि कौशल्ये (Skills).
  • बाजारपेठ मागणी (market demand) आणि संभाव्य नफा.
  • गुंतवणूक (Investment) करण्याची क्षमता.
  • स्थान आणि आवश्यक संसाधने (Resources).

तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार योग्य व्यवसाय निवडू शकता.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 300

Related Questions

मला सोन्याचे दुकान टाकायचे आहे, तर थोडे मार्गदर्शन मिळेल का?
मला अटल इनोव्हेशन मिशन (AIM) बद्दल सविस्तर माहिती द्या किंवा माहिती मिळेल अशी लिंक द्यावी, प्लीज?
स्टार्टअप इंडिया/स्टँडअप इंडिया बद्दल माहिती मिळेल का?
स्टार्टअप चालू करायचा आहे. ई-कॉमर्स (उदा. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन) कसा करू? गुंतवणूकदारांना कसे पटवू?
मी सिट्रस (रॉयल ट्विंकल स्टार क्लब) मध्ये गुंतवणूक केली होती. त्यातील पैसे परत मिळतील का? कृपया मार्गदर्शन करावे?
स्टार्टअप बद्दल माहिती मिळेल का?
मला Google Play Store मधून फक्त 5 स्टार रेटिंग असलेले ॲप्स डाउनलोड करायचे आहेत, त्यासाठी सेटिंग काय आहे?