स्टार्टअप्स

स्टार्टअप इंडिया/स्टँडअप इंडिया बद्दल माहिती मिळेल का ?

2 उत्तरे
2 answers

स्टार्टअप इंडिया/स्टँडअप इंडिया बद्दल माहिती मिळेल का ?

4
सध्या भारतामध्ये उद्योगासाठी फार पोषक वातावरण तयार होत आहे. उद्योग सुरु करण्यासाठी सरकारही स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांमधून प्रोहत्सान देत आहे. स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी खालिल काही स्टेप्स आहेत.

१) उद्योग चालवण्याचा प्लॅन तयार करा.

 म्हणजे आपाल्याला कोणता व्यवसाय सुरु करायचाय हे आधी ठरावा. त्या व्यवसायातून नफा कसा मिळेल, व्यवसायाचा मुख्य ग्राहक वर्ग कोण असेल, या उद्योगासाठी योग्य कामगार वर्ग कसा उपलब्ध होईल या गोष्टी एका ठिकाणी लिहून ठेवा. याचा उपयोग तुम्हाला तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी होईल.

2) व्यवसायासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे का हे तपासून पहा. उदाहारानार्थ शेळीपालन कसे करावे यासाठी काही विद्यापीठे तसेच खाजगी संस्था प्रशिक्षण देतात. गरजेनुसार प्रशिक्षण घ्या.

३) उद्योगासाठी योग्य जागा निवडा. ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि तिथल्या सरकारच्या नियमात बसेल अशी जागा निवड.

४) उद्योगासाठी किती आर्थिक तरतूद लागेल याचा अंदाज काढा. त्यानुसार कर्ज हवे असेल तर सरकारी योजना किंवा सबसिडी मिळेल का याची चाचपणी करा. यासाठी तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या तत्सम विभागात संपर्क करू शकता.

५) कायदेशीर बाबींचा विचार करून व्यवसाय पार्टनरशिप मध्ये करायचा कि स्वतःच्या नावाने proprietorship करायचे हे ठरवा.

६) व्यवसायाची नोंद सारकारी दप्तरी करून घ्या. तुम्हाला कोणता कर भरावा लागेल हे लक्षात घ्या.

७) उद्योगासाठी अवश्यक तो परवाना घ्या. उदाहरणार्थ, किराणा मालाचे दुकान सुरु करण्यासाठी शॉप ऍक्ट काढा.

८) योग्य ते मनुष्यबळ शोधा


वरील सर्व गोष्टी सोडून त्या व्यवसायातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन सुद्धा खूप उपयुक्त ठरते. भारत सरकारने नवीन उद्योगांसाठी ठराविक उत्पनाखालील व्यवसायांना कर सवलत दिलेली आहे. भारत सरकारची  http://startupindia.gov.in हि वेबसाईट तुम्ही बघू शकता. 

  

लघुउद्योग पर्याय:

१) पाणी फिल्टर कंपनी

२) शेळीपालन

३) प्लास्टिक मोल्डिंग मशीन

४) कुकूटपालन

५) मसाला तयार करण्याचा व्यवसाय

६) पापड उद्योग

७) तेल मिल 

८) इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान

९) घरगुती मशरूम उत्पादन

१०) अगरबत्ती उद्योग

११) डाळी तयार करण्याचा उद्योग

१२) आइस-क्रीम उद्योग

१३) डेरी उद्योग 

१४) मेणबत्ती उद्योग

१५) वाशिंग डिटरजेंट पाउडर

१६) लैटेक्स रबर उद्योग

१७) प्लास्टिक वस्तू उत्पादन 

१८) पॉलीथीन शीट उद्योग,

१९) चिप्स व वेफर्स

२०) नूडल्स व सेवया 


घरगुती लघुउद्योगांची माहिती देणारे गजानन जोशी लिखित खालील पुस्तक विकत घेऊन आनखी माहिती मिळू शकते.





तुम्हाला जर हि माहिती उपयोगी वाटली तर तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेयर करा. यातून ज्ञान वाटण्याचे काम होऊन गरजवंताची मदत होईल
सौजन्य:- प्रशांत गोंटे
मला एक स्मॉल स्केल बिझनेस चालू करायचा आहे तर पर्याय कोणते आहेत ?
उत्तर लिहिले · 6/5/2018
कर्म · 210095
2
*स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया*🕑

स्टार्टअप इंडिया , स्टँड अप इंडिया स्कीमची मूलभूत पात्रता निकष

म्हणजे कंपनी खाजगी मर्यादित / एलएलपी किंवा भागीदारी फर्म असावी.

कंपनी / फर्मचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त नसावे. कंपनीचे वार्षिक उलाढाल रु. २५ कोटी पेक्षा जास्त नसावे.

25 कोटी व्यावसायिक सामुग्रीवर काम करणारी कंपनी किंवा डीआयपीपी (औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग) कडून मंजुरी मिळाल्यानंतर उपभोक्ता वस्तूंचे नूतनीकरण करणे केवळ कर्जासाठी पात्र असेल.

कंपनीने अर्ज केल्यावर काही अधिक अक्षरे / कागदपत्रे तयार केली पाहिजेत.

स्टँड अप इंडिया लोनसाठी नावनोंदणी / अर्ज कसा करावा?

केंद्र सरकार ने एक समर्पित वेब पोर्टल टायर केले आहे जेथे इच्छुक उमेदवार योजने अंतर्गत कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्याच प्रयोजनासाठी स्वत: प्रमाणन प्रणाली देखील लाँच केली आहे .

स्वारस्य असणारे अर्जदार वैयक्तिक माहिती, प्रस्तावित व्यवसाय तपशील इत्यादी सर्व आवश्यक माहिती भरून ऑनलाईन अर्ज भरवू शकतात.
उत्तर लिहिले · 14/6/2019
कर्म · 569205

Related Questions

स्टार्टअप बद्दल माहिती मिळेल का ?
मला Google play द्वारे फक्त 5 स्टार चे अॅप डाउनलोड करायचे आहे तर त्यासाठी सेटिंग काय ?
डिस्ट्रिब्युशनशिप बिझनेस कसा स्टार्ट करावा, त्यासाठी काय रेजिस्ट्रेशन लागते, डिस्ट्रिब्युशनशिप कसे मिळवावी?
we want start a business with very small investment means max 20K what can I do ?
Each and every moments start with the Permission of #brain ....then why people says that love start from #heart....but actually heart is just pumping organ of human body. It has no emotions....????...can u tell me truth...
job consultant mhanun business karnyacha plan chalu aahe pn koni HR bhetat nahiye... koni Changla HR asel tr Partnership madhe start karayach aahe koni ready aahe ka ??
मला टॉपची स्टार्टअप कंपनी चालू करायची आहे काय करावे ?