Topic icon

स्टार्टअप्स

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
सध्या भारतामध्ये उद्योगासाठी फार पोषक वातावरण तयार होत आहे. उद्योग सुरु करण्यासाठी सरकारही स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांमधून प्रोहत्सान देत आहे. स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी खालिल काही स्टेप्स आहेत.

१) उद्योग चालवण्याचा प्लॅन तयार करा.

 म्हणजे आपाल्याला कोणता व्यवसाय सुरु करायचाय हे आधी ठरावा. त्या व्यवसायातून नफा कसा मिळेल, व्यवसायाचा मुख्य ग्राहक वर्ग कोण असेल, या उद्योगासाठी योग्य कामगार वर्ग कसा उपलब्ध होईल या गोष्टी एका ठिकाणी लिहून ठेवा. याचा उपयोग तुम्हाला तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी होईल.

2) व्यवसायासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे का हे तपासून पहा. उदाहारानार्थ शेळीपालन कसे करावे यासाठी काही विद्यापीठे तसेच खाजगी संस्था प्रशिक्षण देतात. गरजेनुसार प्रशिक्षण घ्या.

३) उद्योगासाठी योग्य जागा निवडा. ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि तिथल्या सरकारच्या नियमात बसेल अशी जागा निवड.

४) उद्योगासाठी किती आर्थिक तरतूद लागेल याचा अंदाज काढा. त्यानुसार कर्ज हवे असेल तर सरकारी योजना किंवा सबसिडी मिळेल का याची चाचपणी करा. यासाठी तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या तत्सम विभागात संपर्क करू शकता.

५) कायदेशीर बाबींचा विचार करून व्यवसाय पार्टनरशिप मध्ये करायचा कि स्वतःच्या नावाने proprietorship करायचे हे ठरवा.

६) व्यवसायाची नोंद सारकारी दप्तरी करून घ्या. तुम्हाला कोणता कर भरावा लागेल हे लक्षात घ्या.

७) उद्योगासाठी अवश्यक तो परवाना घ्या. उदाहरणार्थ, किराणा मालाचे दुकान सुरु करण्यासाठी शॉप ऍक्ट काढा.

८) योग्य ते मनुष्यबळ शोधा


वरील सर्व गोष्टी सोडून त्या व्यवसायातील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन सुद्धा खूप उपयुक्त ठरते. भारत सरकारने नवीन उद्योगांसाठी ठराविक उत्पनाखालील व्यवसायांना कर सवलत दिलेली आहे. भारत सरकारची  http://startupindia.gov.in हि वेबसाईट तुम्ही बघू शकता. 

  

लघुउद्योग पर्याय:

१) पाणी फिल्टर कंपनी

२) शेळीपालन

३) प्लास्टिक मोल्डिंग मशीन

४) कुकूटपालन

५) मसाला तयार करण्याचा व्यवसाय

६) पापड उद्योग

७) तेल मिल 

८) इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान

९) घरगुती मशरूम उत्पादन

१०) अगरबत्ती उद्योग

११) डाळी तयार करण्याचा उद्योग

१२) आइस-क्रीम उद्योग

१३) डेरी उद्योग 

१४) मेणबत्ती उद्योग

१५) वाशिंग डिटरजेंट पाउडर

१६) लैटेक्स रबर उद्योग

१७) प्लास्टिक वस्तू उत्पादन 

१८) पॉलीथीन शीट उद्योग,

१९) चिप्स व वेफर्स

२०) नूडल्स व सेवया 


घरगुती लघुउद्योगांची माहिती देणारे गजानन जोशी लिखित खालील पुस्तक विकत घेऊन आनखी माहिती मिळू शकते.





तुम्हाला जर हि माहिती उपयोगी वाटली तर तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेयर करा. यातून ज्ञान वाटण्याचे काम होऊन गरजवंताची मदत होईल
सौजन्य:- प्रशांत गोंटे
मला एक स्मॉल स्केल बिझनेस चालू करायचा आहे तर पर्याय कोणते आहेत ?
उत्तर लिहिले · 6/5/2018
कर्म · 210095
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
  स्टार्ट अप इंडिया  अंतर्गत लोन करण्यासाठी काय प्रोसिजर आहे.: 

  .         'स्टार्ट अप इंडिया स्टँडअप इंडिया स्कीम' ची मुख्य उद्दीष्ट उद्योजकतांना प्रोत्साहन देणे, यामुळे देशातील रोजगार संधी वाढविणे हे आहे. योजना सुलभतेने चालविण्यासाठी ही योजना औद्योगिक धोरण व प्रमोशन (डीआयपीपी) कडे देण्यात आली. डीआयपीपीने या योजनेच्या पहिल्या टप्प्यास अंमलबजावणीसाठी अनेक स्टॉकहोल्डर्सशी चर्चा केल्यानंतर तपशीलवार फ्रेमवर्क तयार केले आहे.

उद्योजकता आणि विशेषत: महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना भारतामध्ये प्रोत्साहन देणे या योजनेचा उद्देश आहे. बाबा जगजीवन राम, दलित चिन्हाच्या पुण्यतिथीच्या प्रसंगी 5 एप्रिल रोजी हा उपक्रम सुरू झाला.
*♦स्टँड-अप इंडिया लोन योजनेसाठी पात्रता निकष*
▪अर्जदार अनुसूचित जाति / अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजकांकडून असले पाहिजेत.
▪अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
▪या योजने अंतर्गत फक्त ग्रीन फील्ड प्रोजेक्टसाठी कर्ज उपलब्ध आहे. या संदर्भात, ग्रीनफिल्ड म्हणजे लाभार्थी बांधकाम किंवा सेवा किंवा व्यवसाय क्षेत्रातील पहिल्यांदा इमारत बनवित आहे.
▪गैर-वैयक्तिक उपक्रमांच्या बाबतीत, 51% हिस्सा आणि नियंत्रण भाग एकतर अनुसूचित जाति / अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजकांनी आयोजित करावा.
▪अर्जदार कोणत्याही बँक / आर्थिक संस्थेकडून डिफॉल्टर नसावेत.

*♦स्टँड-अप इंडिया लोन स्कीमसाठी आवश्यक कागदपत्रे*
▪आधार कार्ड म्हणून ओळख पुरावा
▪निवास पुरावा
▪व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा
▪पॅन कार्ड
▪अनुसूचित जाती / अनुसूचित जमातींसाठी जात प्रमाणपत्र
▪पासपोर्ट आकाराचे फोटो
▪बँक खाते तपशील
▪मालमत्ता आणि दायित्वाच्या प्रमोटर्स / जमानतीचे स्टेटमेन्ट
▪नवीनतम आयकर परतावा
▪भाडे करार (भाड्याने घेतलेले व्यवसाय परिसर असल्यास)
▪प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून क्लिअरन्स प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
▪प्रकल्प अहवाल
📎संपर्क तपशीलः -
अधिक माहितीसाठी किंवा ईमेलद्वारे स्पष्टीकरण देण्यासाठी कृपया support@standupmitram.in वर संपर्क साधा .
help@standupmitra.in
नॅशनल हेल्पलाइन टोल फ्री नंबरः 18001801111

0
आपण 5 स्टार रेटींग चे अॅप डाऊनलोड करण्यापेक्षा editors choice चे अॅप डाऊनलोड करा
उत्तर लिहिले · 2/1/2018
कर्म · 240