Topic icon

7/12

2
हो, जमिनीच्या उताऱ्यात 7/12 गटाचा असतो तर घराची मिळकत पत्रिका असते . घराची पक्की नोंद c t सर्व्ह ऑफिस मध्ये होते बाकी गावठाण व इतर जागेच्या नोंदी ग्रामपंचायत कडे होतात. जमिनीची नोंद तलाठी कार्यालया कडे असते.
उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 11745
4
आर्य मूळचे भारतीय होते की बाहेरून आले या प्रश्नावर गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा चर्चा, वाद-विवाद झाले आहेत. उजव्या विचारधारेच्या अनेक हिंदुत्ववादी संघटना आर्य हे बाहेरून आले नाहीत, ते मूळचे भारतीयच होते असा दावा करतात.

काही जण तर हडप्पा संस्कृती ही आर्य किंवा वैदिक संस्कृती असल्याचंही म्हणतात. या दाव्यांमधलं नेमकं तथ्य काय आहे हे शोधणं आता सोपं होणार आहे. नवीन संशोधनानुसार प्राचीन DNAचा अभ्यास करून भारतातील प्रागैतिहासिक कालखंडाचं पुनर्लेखन करण्यात आलं आहे. प्राचीन भारतीय संस्कृती ही एका विशिष्ट समुदायामुळं नाही तर वेगवेगळ्या स्थलांतरितांमुळं विकसित होत गेली आहे.

भारतीय संस्कृती ही स्वतःला आर्य म्हणवून घेणाऱ्या लोकांपासून विकसित झाली असं हिंदू उजवे अभ्यासक मानतात. आर्य हे मुळात भटके होते. घोडेस्वारी, पशुपालन करणारे आर्य कुशल योद्धेही होते. हिंदू धर्माचे सर्वांत प्राचीन धार्मिक ग्रंथ अर्थात वेदांची रचना ही आर्यांनीच केल्याचं मानलं जातं. आर्य हे मूळचे भारतीयच होते आणि भारतातूनच ते आशिया तसंच युरोपच्या अन्य भागात पसरले, असा युक्तिवादही हिंदुत्त्ववादी करतात.

कोकणात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी कुणी काढल्या या गूढ आकृत्या?
सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं
इंडो-युरोपियन भाषासमूह, ज्यांतील भाषा आजही भारत आणि युरोपमधले लोक बोलतात, त्यांचा विकास आर्यांमुळेच झाल्याचं मानलं जातं.

19व्या शतकातील युरोपियन अभ्यासकांनीही आर्य हा एकमेव शुद्ध वंश असल्याचं मानलं होतं. अडॉल्फ हिटलरचं आर्यांच्या वांशिक शुद्धतेबद्दलचं मतही सर्वांना परिचित आहे. युरोप जिंकणाऱ्या आर्यांचे आपण वंशज आहोत, असं हिटलर अभिमानानं सांगायचा.

आर्य ही संकल्पना भाषिक

अभ्यासक जेव्हा 'आर्य' ही संज्ञा वापरतात, तेव्हा त्यांना 'इंडो-युरोपियन' भाषा बोलणारा समुदाय अपेक्षित असतो. मीदेखील या लेखात 'आर्य' हा शब्द त्याच संदर्भानं वापरला आहे. हिटलर किंवा उजव्या कट्टरपंथी विचारवंतांप्रमाणे आर्यांचा उल्लेख वांशिक संदर्भाने केलेला नाही.

अनेक भारतीय विद्वान आर्य हे भारताबाहेरून आले होते, या सिद्धान्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आर्य किंवा इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्या समुदायांपैकी एक समूह भारतातील एका संस्कृतीचा अस्त होत असतानाच्या कालखंडात इथे आला. ही लोप पावणारी संस्कृती म्हणजेच हडप्पा किंवा सिंधू संस्कृती. ज्यावेळी जगाच्या अन्य भागात इजिप्शियन आणि मेसोपोटेमियन संस्कृती अस्तित्त्वात होत्या, त्याच काळात भारताच्या वायव्य भागात (जो आता पाकिस्तानात आहे) हडप्पा संस्कृती अस्तित्त्वात होती. मात्र हिंदू उजवे विचारवंत हे हडप्पन संस्कृती आर्य किंवा वैदिक संस्कृतीचाच एक भाग असल्याचं मानतात.
उत्तर लिहिले · 18/1/2020
कर्म · 16430
4
शासकीय जमिन नेमकी कशी आहे ? वनीकरण ,गायरान इत्यादी की,तुम्हाला इनामी भेटलेली आहे.जर तुम्ही त्या जमिनीचे भोगवटा दार म्हणून वापर करत असाल किंवा मालक असाल तर तुम्ही तुमचे तालुका भूमिअभिलेख कार्यालयात जाऊन मोजणी कामी लेखी अर्ज देऊन तातडी अति तातडी हद्दनिश्चिती मोजणी फी भरून मोजणी तारखी घ्या दिलेले तारखेला संबधित मोजणी अधिकारी येऊन तुमचे क्षेत्र मोजून खुणा करून देतील व सात दिवसात भूमिअभिलेख कार्यालयात मोजणी नकाशा तयार करून देतील त्यामध्ये तुमचे एकूण क्षेत्र व हद्द दाखविले जाईल त्यानुसार तुमचे कमी भरत असलेले क्षेत्र कुणाकडे गेले याबाबत रेखांकन पाहून कोर्टात केस दाखल करून मागणी करू शकतात.
रामकृष्ण हरी
उत्तर लिहिले · 12/4/2019
कर्म · 3570
3
(1)सातबारा उतारा मध्ये नावाची नोंद केली आहे तर सातबारा मध्ये नाव लागलेले आहे , (2) जर का नावाची नोंद इतर हक्कात केली असेल तर फेरफार  ( गाव नमुना सहा ) काढून घ्या फेरफार वर शेरा असेल नावाची नोंद इतर हक्कात का केली आहे , (3) जर का नावाची नोंद फेरफार  (गाव नमुना सहा ) मध्ये झाली असेल तर मडल अधिकारी किंवा सर्कल अधिकारी यांनी फेरफार नोंद प्रमाणित (नोंदीवर अमल दिल्यास) केल्यावर लगेच फेरफार वरून नावाची नोंद सातबारा वर करण्यात येते
उत्तर लिहिले · 19/12/2018
कर्म · 1350
0
तहसिल ला जावुन तुमच्या विभागाच्या मंडळ अधिकार्याला संपर्क करा.
उत्तर लिहिले · 22/10/2018
कर्म · 20