Topic icon

हरवले आणि सापडले

0
जर तुमचे बँक पासबुक हरवले असेल आणि तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक माहीत नसेल, तरी तुम्ही बँकेत अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे:

1. बँकेत जा: तुमच्या बँकेच्या शाखेत जा जिथे तुमचे खाते आहे.

2. अधिकाऱ्याशी बोला: बँकेतील अधिकाऱ्याशी संपर्क साधा आणि त्यांना तुमच्या समस्येबद्दल सांगा की तुमचे पासबुक हरवले आहे आणि तुम्हाला तुमचा खाते क्रमांक आठवत नाही.

3. ओळखपत्र सादर करा: तुम्हाला तुमचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड,Driving license) आणि पत्त्याचा पुरावा सादर करण्यास सांगितले जाईल. त्यामुळे ते सोबत ठेवा.

4. अर्ज भरा: बँक तुम्हाला एक अर्ज देईल, जो तुम्हाला पासबुक हरवल्याबद्दल आणि खाते क्रमांक मिळवण्यासाठी भरावा लागेल.

5. आवश्यक शुल्क भरा: डुप्लिकेट पासबुक जारी करण्यासाठी बँक काही शुल्क आकारू शकते, ते भरा.

6. खाते क्रमांक मिळवा: अर्ज भरल्यानंतर आणि शुल्क भरल्यानंतर, बँक तुम्हाला तुमचा खाते क्रमांक देईल.

7. नवीन पासबुकसाठी अर्ज करा: खाते क्रमांक मिळाल्यानंतर, तुम्ही नवीन पासबुकसाठी अर्ज करू शकता.

अर्ज करताना खालील माहिती बँकेला द्या:

  • तुमचे नाव
  • तुमचा पत्ता
  • तुमचा मोबाईल नंबर
  • तुमच्या खात्यावरील शेवटचा व्यवहार (Transaction)
  • इतर माहिती जी बँक मागेल

टीप:

  • तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा (Customer Care) क्रमांकावर संपर्क साधून देखील माहिती मिळवू शकता.
  • आजकाल बहुतेक बँका इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा देतात, ज्यामुळे तुम्ही तुमचा खाते क्रमांक ऑनलाइन पाहू शकता.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 740
2
होय, तुमच्याकडे आधार नंबर, एनरोलमेंट आयडी किंवा व्हर्च्युअल आयडी असेल, तर खालील लिंकवर क्लिक करून योग्य माहिती भरून तुम्ही तुमचे डिजिटल म्हणजेच पीडीएफ स्वरूपातील आधार डाउनलोड करू शकता व पुन्हा आधार मागणीसाठी अर्ज करू शकता. (व्हर्च्युअल आयडी किंवा एनरोलमेंट आयडी हा तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड काढताना मिळालेल्या पावतीवर असतो.) https://eaadhaar.uidai.gov.in/#/
उत्तर लिहिले · 23/11/2020
कर्म · 45560
5
आपली ओरिजिनल टीसी केव्हा व कोठे हरवली आहे याची माहिती आपणास न्यूज पेपरमध्ये द्यावे लागेल. त्यानंतर आपण ज्या शाळेतून टीसी घेतले आहे, त्या शाळेत अर्ज करावा लागेल. अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागेल. सोबत आपण दिलेल्या न्यूज पेपरमधील कात्रण जोडावे लागेल. प्रतिज्ञापत्रात माझी मूळ टीसी हरवली असून मला दुसरी प्रत देण्यात यावी आणि मी माझ्या दुसऱ्या प्रतीचा गैरवापर करणार नाही याची लेखी हमी द्यावी लागते. त्यानंतर आपणास आपल्या टीसीची दुसरी प्रत आपल्या शाळेतून मिळून जाते.
धन्यवाद.
उत्तर लिहिले · 3/9/2020
कर्म · 2570
9
मूळ लायसन्स खराब झाल्यास किंवा हरवल्यास फॉर्म एल.एल.डी. (L.L.D.) नमुन्यात अर्ज करावा लागतो. अर्जासोबत खराब झालेले लायसन्स जमा करावे लागते. लायसन्स हरवले असल्यास तसा पोलीस अहवाल सादर करावा लागतो.
अर्ज कसा करावा?
अर्ज नमुना – फॉर्म क्र. L.L.D.
सोबत : १) खराब झालेले लायसन्स अथवा हरवले असल्यास पोलीस अहवाल.
२) छायाचित्रे – २ प्रती.
उत्तर लिहिले · 24/7/2020
कर्म · 230
7
नमस्कार.
आपली दहावी आणि बारावीची मार्कशीट https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/
या साईटवरून डाउनलोड करता येते. प्रथम इथे
Sign up करा. नंतर आपला सीट नंबर टाका, आईचे नाव टाका आणि मार्कशीट डाउनलोड होईल.
उत्तर लिहिले · 15/6/2020
कर्म · 330
5
झेरॉक्स असेलच, तर आपल्या जवळच्या युटिलिटी सर्व्हिसेस लिमिटेड सेंटरमध्ये जा. तेथे पॅन कार्ड हरवल्याची मिळवण्यासाठी अर्ज भरा. सोबतच त्याची झेरॉक्स जोडून त्याची जी काही ₹ ११० शुल्क फी आहे, ती भरा आणि नंतर वाट पाहा. तुम्हाला १५ ते २० दिवसात घरी येईल.
उत्तर लिहिले · 29/2/2020
कर्म · 7680
0
ह्याचे साधारण उत्तर असे आहे की तुम्हाला आधार केंद्र मध्ये जाऊन तो मोबाईल नंबर द्यायचा आहे जो आधार सोबत जोडलेला आहे. त्यानुसार तुम्हाला 'आपण पहिलेच उपभोक्ता आहात' असे सांगितले जाईल. त्यानुसार तुम्हाला तिथे संपूर्ण तपशील भेटेल.
उत्तर लिहिले · 22/2/2020
कर्म · 3860