2 उत्तरे
2
answers
नालंदा विद्यापीठ कोणी जाळले?
0
Answer link
बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठ जाळले. तो दिल्ली सल्तनतीमधील एक तुर्की सेनापती होता. ११९३ मध्ये त्याने या विद्यापीठावर आक्रमण केले आणि ते नष्ट केले, कारण त्याला भारतीय ज्ञान आणि संस्कृती नष्ट करायची होती.
या घटनेमुळे भारतातील बौद्ध धर्माच्या अभ्यासाला मोठा धक्का बसला.
संदर्भ:
0
Answer link
*🏪 बख्तियार खिलजीची ‘भारतीय’ असूया आणि नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी!*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
नालंदा विद्यापीठाबद्दल तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. https://bit.ly/3GdWNL8 ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठ हे जगातील ज्ञानाचे केंद्र होते. जगभरातील विद्यार्थी या विद्यापीठामध्ये येऊन शिक्षण घेत होते. कोरिया, जपान,चीन, तिबेट, तुर्कीस्तान मधील ज्ञानवंत शिक्षक देखील या विद्यापीठाला लाभले होते. संपूर्ण जगभरात केवळ नालंदा विद्यापीठाचा डंका होता. परंतु बख्तियार खिलजी नावाच्या एका वेड्या सुलतानाने ज्ञानाची ही नगरी जाळून उध्वस्त केली.

पूर्वी भारत म्हणजे सोन्याने-संपत्तीने मढलेला देश म्हणून सर्वदूर प्रचलित होता. त्यामुळे परकीय नेहमीच आपल्या देशावर आक्रमण करून लुटी करायचे. तसेच आपलाप्रदेश देखील बळकवायचे. याच परकीय शत्रुंपैकी एक होता इख्तियारुद्दीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी!त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये त्याचा दबदबा होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. या कालखंडात नालंदा विद्यापीठ राजगिर चे उपनगर होते. याविद्यापीठामध्ये जगभरातून आलेले १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि त्यांना देशोविदोशीचे २००० शिक्षक शिकवीत होते.एकदा बख्तियार खिलजी खूप आजारी पडला. कोणत्याच औषधाने त्याला गुण येईना. तेव्हा कोणीतरी त्याला नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे प्रमुख राहुल श्रीभद्र यांच्याकडून इलाज करवून घेण्याचा सल्ला दिला.
पण खिलजीला एखाद्या हिंदू वैद्यांपेक्षा आपल्या हकीमांवर जास्त विश्वास होता. एखाद्या हिंदू वैद्याकडून इलाज करवून घेणे त्याला अपमानकारक वाटत होते. पण हकीमांना काही त्याची तब्येत सुधारण्यात यश मिळत नव्हते, शेवटी नाईलाजाने खिलजीने राहुल श्रीभद्रयांना आपल्या उपचारासाठी बोलावून घेतले.पण त्यान राहुल श्रीभद्र यांच्यापुढे एक अट ठेवली ती म्हणजे,मी कोणतेही भारतीय बनावटीचे औषध घेणार नाही आणि जर मी बरा झालो नाही तर तुम्हाला मृत्युदंड देण्यात येईल.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫ही अट ऐकून राहुल श्रीभद्र विचारात पडले, पण त्यांनी खिलजीचे म्हणणे मान्य केलं.
काही दिवसांनी ते खिलजीजवळ आले, त्यांनी त्याच्या हातात कुरण दिले आणि सांगितले की,यातील ठराविक पाने वाचली की त्याच्या प्रकृतीमध्ये फरक पडेल.आणि आश्चर्य! खिलजीच्या प्रकृतीमध्ये फरक पडू लागला. खरंतर हा कोणताही चमत्कार नव्हता. जी जी पाने राहुल श्रीभद्र यांनी खिलजीला वाचायला सांगितली होती, त्या पानांवर त्यांनी औषधाचा लेप लावला होता, ज्यामुळे बोटाला थुकी लावून खिलजी जेव्हा पान उलटायचा, तेव्हा ते औषध मुखावाटे त्याच्या पोटात जायचं.खिलजी हळूहळू पूर्ण बरा झाला, पण राहुल श्रीभद्र यांचे उपकार मात्र तो साफ विसरला. एखाद्या भारतीय वैद्याने मला बरे करावे ही भावना त्याच्या अंगाचा तिळपापड करू लागली. आपले हकीम हिंदू वैद्यांपेक्षा श्रेष्ठ ठरले नाहीतहा विचार त्याला स्वस्थ बसू देईना, म्हणून त्याने रागाने संपूर्ण नालंदा विद्यापीठच उध्वस्त करून टाकण्याचे ठरवले. त्याने आपल्या सैनिकांना विद्यापीठाला आग लावून देण्याचा हुकुम सोडला.
असं म्हणतात की विद्यापीठामध्ये इतकी पुस्तके होती की आग जवळपास ३ महिने सतत धुमसत होती. एवढं करूनही खिलजीचं मन शांत झालं नाही, म्हणून त्याने नालंदा विद्यापीठातील हजारो धार्मिक नेत्यांची आणि बौद्ध भिक्षूंची हत्या केली.अश्याप्रकारे क्रूर बख्तियार खिलजीने केवळ असूयेपोटी, भारतीय आयुर्वेदाला, हिंदू-बौद्ध तत्वज्ञानाला जगातून हद्दपार करण्यासाठी नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी केली.