मोबाईल तंत्रज्ञान

मोबाईल मध्ये एअरप्लेन मोड का असतो?

2 उत्तरे
2 answers

मोबाईल मध्ये एअरप्लेन मोड का असतो?

1
*📱 मोबाईल मध्ये एअरप्लॅन मोड का दिलेला असतो?*






————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
मोबाईल कोणत्याही कंपनिचा असो त्यामध्ये एअरप्लॅन मोड हा असतोच. https://bit.ly/3DXekXi स्मार्टफोनमध्ये दिलेला एअरप्लेन मोड हे खूपच खास फीचर आहे. एअरप्लेन मोड सक्रिय केल्यानंतर तुमच्या फोनवरून नेटवर्क निघून जाते आणि तुम्ही कॉल करू शकत नाही आणि कॉल रिसिव्हही करू शकत नाही. मात्र, असे असेल तर हे फीचर का दिले जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो.


मोबाईल मध्ये असणाऱ्या चिन्हाप्रमाणे व नावाप्रमाणेच या फीचरचा उपयोग विमानामध्ये केला जातो. तुम्ही विमानामध्ये चढताच फोन एअरप्लेन मोड म्हणजेच फ्लाईट मोडवर ठेवा, अशी घोषणा केली जाते. उड्डाणादरम्यान वैमानिकाला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही सूचना केली जाते. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫विमानात मोबाईल कनेक्शन चालू राहिले, तर त्याचा पायलटच्या संवादावर परिणाम होतो आणि समस्या निर्माण होतात.
 याशिवायही, एअरप्लेन मोडचे इतर अनेक उपयोग आहेत. स्मार्टफोनमध्ये नेटवर्कची समस्या असेल, तर प्रथम एअरप्लेन मोड अ‍ॅक्टिव्हेट आणि नंतर तो पुन्हा डिअ‍ॅक्टिव्हेट केल्यास नेटवर्कची समस्या दूर होते. https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24


0

मोबाईलमध्ये एअरप्लेन मोड असण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • विमानातील हस्तक्षेप टाळण्यासाठी: विमानांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून एअरप्लेन मोड सुरू केल्यावर मोबाईलचे सर्व वायरलेस कनेक्शन ( cellular, Wi-Fi, Bluetooth) बंद होतात आणि विमानातील उपकरणांना कोणताही धोका निर्माण होत नाही.
  • बॅटरी वाचवण्यासाठी: एअरप्लेन मोड सुरू केल्याने मोबाईलचे सतत सुरू असलेले नेटवर्क सर्चिंग थांबते, ज्यामुळे बॅटरीची बचत होते.
  • एकाग्रता वाढवण्यासाठी: जेव्हा तुम्हाला कोणाशीही संपर्क साधायचा नसेल आणि शांतपणे काम करायचे असेल, तेव्हा एअरप्लेन मोड उपयुक्त ठरतो. यामुळे तुम्हाला calls आणि messages चा व्यत्यय येत नाही.
  • नेटवर्क समस्या निवारण: कधीकधी नेटवर्कमध्ये काही समस्या असल्यास, एअरप्लेन मोड सुरू करून बंद केल्यास नेटवर्क रीसेट होते आणि समस्या सुधारायला मदत होते.

अधिक माहितीसाठी हे पाहा: Android Authority

उत्तर लिहिले · 8/4/2025
कर्म · 680

Related Questions

कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईल वरील त्यांनी केलेली कॉल लिस्ट बघायची असल्यास काय करावे, तेही बिना OTP?
माझ्याकडे oppo A37 मोबाईल आहे. मला वाय-फायचा पासवर्ड हॅक करण्यासाठी चांगले सॉफ्टवेअर सांगा आणि मोबाईल रूट कसा करता ते पण सांगा?