फरक
फरक स्पष्ट करा :फुलपाखरू आणि वटवाघूळ?
2 उत्तरे
2
answers
फरक स्पष्ट करा :फुलपाखरू आणि वटवाघूळ?
1
Answer link
* उत्तर - फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे अनुक्रमे स्पष्ट केले आहेत
<
• फुलपाखरू
१) फुलपाखरू याचे वर्गीकरण उपसृष्टी असमपृष्ठरज्जू यात केले आहे.
२) संधीपाद संघातील कीटक वर्गात याचा समावेश केला जातो.
३) फुलपाखराला पायांच्या तीन जोड्या आणि दोन पंखाच्या जोड्या असतात. हे पंख कायटिनयुक्त असतात.
४) फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे.
●वटवाघूळ
१) वटवाघूळ या प्राण्याचे वर्गीकरण उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात केले आहे.
२) पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो.
३) वटवाघूळाला पायाची एक जोडी असते आणि पंखाप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. यात हाडे असतात.
४) वटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे.
0
Answer link
- फुलपाखरू हे लहान असते . व ते खूप छान असते. फु लपाखरू हे अनेक रांगा मध्ये असते.ते खूप नाजूक असते.
- वटवाघूळ हे कळ्या कलरचे असते. ते दिवस भर झोपते आणि रात्री आपले शिकार शोधायला बाहेर निघत.