कुटुंब

कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे परिणाम काय होतात ते स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे परिणाम काय होतात ते स्पष्ट करा?

2
सर्वांसोबत समान प्रकारचा मनमोकळा संवाद नसणे (एखाद्यासोबत प्रत्येक बाबतीत बोलणे, त्याच मत जाणुन घेण आणि एखाद्याला कायम दुर्लक्षित ठेवणे, त्याची मते कधीच न विचारणे. काही सदस्यांमधे आपल्याला कुटुंबात काही किंमत नाही अशी भावना तयार होउ लागते, याने असंतोष वाढत जाऊन शांतीला तडा जातो. अशा वागण्याचे दुरदर्शी परिणाम होतात.)
संवाद म्हणजे संभाष. दोन किंवा अधिक व्यक्तींमधले बोलणे म्हणजे संवाद. प्रत्येकजण आपापल्या बोलण्यातून आपले मत मांडत असतो. आपली बाजू सांगत असतो. 

कोणतेही नाते टिकवण्यासाठी, मजबूत बनवण्यासाठी त्यांच्यात संवाद साधला जाणे हे अतिशय आवश्यक असते. 

प्रत्येक व्यक्तीसाठी कुटुंब हे अत्यंत जवळ असते. प्रत्येकाचे जग हे कुटुंबापासूनच सुरु होते. मग जर कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहणे आवश्यक असते. असे असल्यास कुटुंबात चांगला संवादही होतो. 

पण जर कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास याचे बरेच विपरित परिणाम पहायला मिळतात. त्यातली काही पुढीलप्रमाणे :

1. आपापसातील ओलावा कमी होतो. 
2. प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याचाच विचार करायला लागतो. 
3. एकमेकांबाबतचा आदर, आपुलकी, प्रेम नष्ट व्हायला लागते. 
4. नातेसंबंध तुटू लागतात. 
5. एकमेकांबद्दल वैर निर्माण होऊ लागते. 
6. वैचारिक, भावनिक, बलशाली एकीला तडा जातो. 
7. कुटुंबातील सर्वच सदस्य एकमेकांपासून अनेक गोष्टी लपवायला लागतात. 
8. वाईट सवयी लागण्याची दाट शक्यता असते. 
9. कुणाला कुणाची भिती राहत नाही, यामुळे मन हवे तसे वागायला लागतात. 
10. व्यसनाधीन होण्याची सुद्धा शक्यता असते. 
11. कुटुंबाचे विभाजनही होऊ शकते. इत्यादी
उत्तर लिहिले · 5/1/2024
कर्म · 48555
0
कुलूप

उत्तर लिहिले · 5/1/2024
कर्म · 0

Related Questions

कुटुंब गुणधर्म कुटुंब गुणधर्म?
ग्रामीण कुटुंबाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा?
कुटुंब कुटुंब संस्थेचे बदलते स्वरूप स्पष्ट करा?
गणपतीच्या कुटुंबाची माहिती?
लोकसंख्या नियंत्रण कुटुंब कल्याण घोषवाक्य?
कुटुंबात मनमोकळा संवाद न झाल्यास त्याचे काय परिणाम होतात?
विभक्त कुटूंबाचे वैशिष्ट कोणते आहे?