अपंग

मी अपंग आहे मला आधार सेंटर चालू करायचे आहे काय करावे लागेल ?

1 उत्तर
1 answers

मी अपंग आहे मला आधार सेंटर चालू करायचे आहे काय करावे लागेल ?

0

आता तुम्ही सुरु करु शकता आधार कार्ड सेंटर; पैसे कमावण्याचा हमखास मार्ग

आधारकार्ड तुमच्यासाठी कमाईचा चांगला मार्ग ठरू शकते. | Aadhar card center

आता तुम्ही सुरु करु शकता आधार कार्ड सेंटर; पैसे कमावण्याचा हमखास मार्गया Appचा अजून एक फायदा म्हणजे आधारची एक सॉफ्ट कॉपी कायमस्वरुपी तुमच्या जवळ असेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आधारची हार्ड कॉपी कायम सोबत ठेवण्याची गरज उरणार नाही.

हल्लीच्या काळात कोणत्याही कामासाठी आधार कार्ड (Aadhar card) ही अत्यावश्यक बाब झाली आहे. अगदी बँकेत अकाऊंट उघडण्यापासून ते पासपोर्ट तयार करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी तुमचे आधार कार्ड गरजेचे असते. मात्र, आता हेच आधारकार्ड तुमच्यासाठी कमाईचा चांगला मार्ग ठरू शकते. त्यासाठी तुम्ही एखादे आधार कार्ड केंद्र सुरु शकता. याठिकाणी तुम्ही लोकांच्या आधार कार्डासंबधी तक्रारींचे निवारण करुन पैसे कमावू शकता


आधार कार्ड केंद्र सुरु करून कशी कराल कमाई?
आपल्या देशात सध्या आधारकार्ड धारकांची संख्या खूप मोठी आहे. आधार कार्डमध्ये एखादी दुरूस्ती करावयाची असल्यास प्रत्येकवेळी आधार केंद्रात जावे लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या परिसरात एखादे आधार केंद्र सुरु केल्यास त्या माध्यमातून चांगली कमाई होऊ शकते.

आधार केंद्र सुरु करण्यासाठी काय करावे लागते?
तुम्हाला आधार कार्ड केंद्र सुरु करायचे असल्यास त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तुम्ही आधार केंद्र सुरु करू शकता. त्यासाठी सरकारकडून तुम्हाला एक प्रमाणपत्र दिले जाते.


– सर्वप्रथम uidai.nseitexams.com या संकेतस्थळावर न्यू युजरसाठी जाऊन अर्ज करावा. – न्यू युजर म्हणून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला नोंदणीप्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरू शकता. – नोंदणी केल्यानंतर एका दिवसाने तुम्हाला लॉग इन करून परीक्षा देण्यासाठी आगाऊ वेळ घ्यावी लागेल. – परीक्षा देण्यासाठी तुम्हाला केंद्र निवडावे लागते. परीक्षेसाठी नोंदणी केल्यावर तुम्हाला प्रवेश पत्र मिळेल. – ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळेल.

सरकारी केंद्र कशाप्रकारे मिळवाल?
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार केंद्र सुरु करण्यासाठीही नोंदणी करावी लागते. त्यासाठी सीएससी या संकेतस्थळावर जाऊन Interested to become a CSC नोंदणी करावी. यानंतर पुढील सोपस्कार पार पाडल्यानंतर तुम्हाला अधिकृत आधार केंद्र मिळेल.

आधार केंद्रातून कमाई कशी होते?
तुम्ही आधार कार्ड केंद्र सुरु केल्यानंतर एका आधार कार्डापाठी तुम्हाला पैसे मिळतात. प्रत्येक आधार कार्डातील सुधारणांवर तुमच्या कमाईचा आकडा ठरतो. तुम्ही नवीन आधार कार्ड तयार केल्यास तुम्हाला 35 रुपये मिळतात. मात्र, यासाठी तुम्हाला लॅपटॉप, वेबकॅम, लॅम्प, फिंगर प्रिंटर स्कॅनर या साहित्याची गरज लागते.


उत्तर लिहिले · 3/8/2023
कर्म · 48555

Related Questions

मला अपंग प्रमाणपत्र (certificate) काढायचे आहे, मला एक कान नाहीये आणि दुसऱ्या कानाने ऐकू येते मी औरगाबादमध्ये राहतो आहे तर अपंग प्रमाणपत्र कसे काढावे कुणी मदत करणारे आहे का?
अपंग वृध्दाश्रम महाराष्ट्रात कुठे आहे किंवा संपर्क क्रमांक मिळेल का?
व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
अपंग प्रमाणपत्र कसे काढता येईल?
अपंगांसाठी पगार चालू करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
अपंगांना दिव्यांग हा शब्द कोणी दिला?
अपंग सर्टिफिकेट साठी मला complant कंrachi आहे तर मी कशी करू आणि कोणी हेल्प करू शकता का ?